मुंबई, 25 जून : काही दिवसांपूर्वी प्राणायाम करणाऱ्या एका खारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा खार चर्चेचा विषय बनली आहे. त्याचं कारणही तेवढंच खास आहे. एका फोटोग्राफरनं खारीचं पिल्लू खात असताना त्याचा आवाज आणि हावभाव आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत. खार खात असताना आवाज करते हे आतापर्यंत आपल्याला ऐकायला मिळालं नाही. त्यामुळे हे खारीचं पिल्लू सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे.
प्राणीशास्त्रज्ञ आणि वाइल्डलाइफ डॅनी कॉनरने अलीकडे मायक्रोफोन वापरुन सात आठवड्यांच्या खारीच्या पिल्लाचा खात असताना आवाज रेकॉर्ड केला. खारीनं काढलेल्या या विचित्र आवाजामुळे हा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.
I put my microphone in front of a 7 week old baby red squirrel. pic.twitter.com/JrRRvE9ngN
— Dani Connor Wild 🐺 (@DaniConnorWild) June 23, 2020
हे वाचा- शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला सरड्यानं दिला 'जोर का झटका', काय केलं पाहा VIDEO
हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 7 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 5 लाखहून अधिक लोकांनी लाईक्स आणि रिट्वीट केलं आहे. डॅनी कॉनरने 4 खारींना आपल्या घरी आणलं आहे. ते या खारींचा संपूर्ण काळजी घेतात. आपल्या आईच्या मृत्यूनंतर त्याने मुलांना दत्तक घेतले. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर खारीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.
खारीचा आवाज ऐकायला मिळणं खूप दुर्मीळ असतं. जवळपास अशक्य अशावेळी त्यांनी खारीच्या 7 महिन्यांचं पिल्लू खात असताना रेकॉर्ड केलेल्या आवाजातला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.