जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ऐकावं ते नवल! फिट राहण्यासाठी नव्हे परफेक्ट लाइफ पार्टनरच्या शोधात जॉगिंग करते ही महिला

ऐकावं ते नवल! फिट राहण्यासाठी नव्हे परफेक्ट लाइफ पार्टनरच्या शोधात जॉगिंग करते ही महिला

चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे उपाय - 
सक्रीय रहा - 
तुम्ही जितके जास्त सक्रिय असाल तितके तुमच्या शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल चांगले राहील. यासाठी तुम्ही दररोज किमान अर्धा तास व्यायाम करू शकता. यासाठी तुम्ही चालणे, जॉगिंग, योगा, सायकलिंग इत्यादी करू शकता.

चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे उपाय - सक्रीय रहा - तुम्ही जितके जास्त सक्रिय असाल तितके तुमच्या शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल चांगले राहील. यासाठी तुम्ही दररोज किमान अर्धा तास व्यायाम करू शकता. यासाठी तुम्ही चालणे, जॉगिंग, योगा, सायकलिंग इत्यादी करू शकता.

महिलेने आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी हटके मार्ग निवडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 02 मार्च :  पूर्वी लग्न ठरवताना चहापान, कांदेपोह्यांचा कार्यक्रम व्हाययचा. आता तरुण-तरुणी स्वतःच स्वतःसाठी लाइफ पार्टनर शोधतात. यासाठी आता मॅर्टिमोनीअल वेबसाईट आणि डेटिंग अॅपची मदत घेतली जाते. जिथं आधी ऑनलाईन जोडीदार निवडला जातो त्यानंतर त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन पुढील निर्णय घेतला जातो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक महिला मात्र परफेक्ट लाइफ पार्टनर हवा यासाठी जॉगिंग करते (Woman run in park to find perfect life partner). आता जॉगिंग म्हणजे फिटनेस तुमच्या डोळ्यासमोर येतं. म्हणजे फिट राहण्यासाठी सामान्यपणे आपण वॉकिंग, रनिंग, जॉगिंग अशी एक्सरसाइझ करतो. पण ही महिला नवरा शोधण्यासाठी हे करते. दर आठवड्याला ती पार्कमध्ये जाते आणि आयुष्याचा जोडीदारा मिळावा यासाठी धावते. मिनरीत कौर असं या महिलेचं नाव आहे ती यूकेमध्ये राहते. मिनरीत कौर एक पत्रकार आहे. आता स्विमिंग टिचर होण्यासाठी ट्रेनिंग घेत आहे. 13 वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे. आता ती आपल्यासाठी नवरा शोधत आहे. पण तिने आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी हटके मार्ग निवडला आहे. हे वाचा -  2 वर्षांतच 219 किलोच्या महिलेने घटवलं 141 किलो वजन; 78 किलोची होताच भयंकर अवस्था आज तक ने डेली मेलच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार दर शनिवारी ती वेगवेगळ्या पार्कमध्ये जॉगिंग करायला जाते. जेणेकरून तिला तिचं खरं प्रेम, स्वप्नातला जोडीदार भेटेल.

जाहिरात

मिनरीत सांगते, तिने घटस्फोट घेतला तेव्हा लोक तिला वेगळ्या नजरेने पाहू लागले. घटस्फोटाला त्यांच्या समाजात योग्य समजलं जात नाही. खूप दिवसांपासून मला याची लाज वाटत होती. कारण लग्न एकदाच होतं, असं मला नेहमी सांगण्यात आलं. त्यामुळे हा सर्वांना सांगणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. त्यामुळे डेटिंग अॅपची मदत घेणार नाही, हे मी ठरवलं होतं. ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून डेटवर मी विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे फेस टू फेस ड्रीम हसबँड शोधायला सुरुवात केली. हे वाचा -  जिमला जाणं होत नाही, पण बॉडी तर बनवायचीय; चिंता नको, घरीच फॉलो करा या 5 टिप्स मिनरीतने सांगितलं की ती पार्करनची मदत आहे. पार्करन ही कंपनी आहे, जी दर आठवड्याला शनिवारी लोकांसाठी 5 किलोमीटर दौडचं आयोजन करते. ‘फ्री वीकली टाइम्‍ड’ पॉडकास्टशी बोलतना मिनरीतने सांगितलं की पार्करनचा उपयोग डेटिंग अॅपसारखा करते. संपूर्ण ब्रिटनमध्ये पार्करन 2000 ठिकाणी होतं. मिनरीतकडे अशी बरीच ठिकाणं आहेत, जिथं ती आपला आयुष्याचा जोडीदार शोधू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात