मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

2 वर्षांतच 219 किलोच्या महिलेने घटवलं 141 किलो वजन; 78 किलोची होताच झाली भयंकर अवस्था

2 वर्षांतच 219 किलोच्या महिलेने घटवलं 141 किलो वजन; 78 किलोची होताच झाली भयंकर अवस्था

वजन घटवून सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही महिला आता अंथरूणाला खिळली.

वजन घटवून सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही महिला आता अंथरूणाला खिळली.

वजन घटवून सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही महिला आता अंथरूणाला खिळली.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 01 मार्च : वजन घटवण्यासाठी लोक काय काय नाही करत. डाएट, एक्सरसाईज, योगा, जीम अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात. एका लठ्ठ (Obesity) महिलेनेही अथक प्रयत्नांनंतर आपलं वजन घटवलं. 2 वर्षांतच 141 किलो वजन घटवून ती 78 किलो वजनाची झाली (Woman reduced 141 kg weight in 2 years). तिचा हा वजन घटवण्याचा प्रवास (Weight loss journey) सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असतानाच वजन कमी झाल्यानंतर तिची भयंकर अवस्था पाहून सर्वजण हादरले आहेत.

अमेरिकेतील इंडियानामध्ये राहणारी 30 वर्षांची लेक्सी रीड (Lexi Reed) आपल्यातील ट्रान्सफॉर्मेशनमुळे सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे. 2 वर्षांतच ती फॅट टू फिट झाली. 219 महिलेने 141 किलो वजन कमी केलं आणि आता तिचं वजन 78 किलो आहे. पण त्यानंतर मात्र तिची अवस्था भयंकर झाली आहे. वजन घटवल्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडू लागली.

हे वाचा - बापरे! पाण्याचा थेंब जरी पडला तरी जळते तरुणीची त्वचा; घाम आणि अश्रूंपासूनही धोका

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार लेक्सीचा नवरा डॅनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली. काही आठवड्यांपूर्वी लेक्सीची प्रकृती बिघडली असल्याचं त्याने सांगितलं. ती जे काही खात होती ते तिला पचतच नव्हतं. त्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आलं. आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांनी तिचे ऑर्गन फेल होत असल्याचं सांगितलं. परिणामी तिला डायलिसिसवर ठेवण्यात आलं. तिची किडनी काम करत नव्हती म्हणून काही कालावधी ते डालसिसिवरच राहिली.

हे वाचा - भारीच! फक्त झोपूनच लखपती झाला तरुण; नेमके कसे कमावतो पैसे पाहा VIDEO

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिने आपल्या उपचारासाठी क्राऊड फंडिंगचा मार्ग स्वीकारला आहे. आपल्याकडे इतके पैसे नाहीत की आपण आपल्या उपचाराचा खर्च उचलू शकतो. पण ऑलफेमस बर्थडे नावाच्या साइटवर ती 11 कोटी रुपयांची मालकीण असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता लेक्सीला लोक सोशल मीडियावर ट्रोल करू लागले आहेत.  तिच्याकडे इतके पैसे आहेत तर तिला आपल्या फॅन्सकडून पैसे मागण्याची गरज काय?, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना तिने या वेबसाईटवर चुकीची माहिती दिल्याचं म्हटलं आहे. तिच्याजवळ इतके पैसे नाहीतर असं तिने सांगितलं आहे. क्राऊड फंडिंगच्या माध्यमाचून तिने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे हवेत आहेत, आतापर्यंत तिला 52 लाख रुपये जमा झाले आहेत.

First published:

Tags: America, Health, Lifestyle, Weight, Weight loss