नवी दिल्ली, 1 मार्च : चांगलं आरोग्य आणि शरीर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी अनेक जण जिममध्ये जातात. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या भरगच्च वेळापत्रकामुळं आणि नोकरी-व्यवसायामुळे इच्छा असूनही अनेकांना जिममध्ये जाता येत नाही. अशा लोकांना घरबसल्या काही टिप्सच्या माध्यमातून पिळदार शरीर कसं मिळवता येईल, हे जाणून घेऊ. या पद्धतींनी तुमचा लठ्ठपणाही वाढण्याचं थांबतं आणि शरीर सुडौल दिसू लागतं. दिवसभरात भरपूर पाणी प्या (Drink Enough water) झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, चांगली तंदुरुस्ती आणि स्नायूंमध्ये बळकटी येण्यासाठी, दररोज किमान साडेतीन लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. असं केल्यानं, स्नायू बळकट आणि पीळदार होण्यास मदत होते. यासोबतच, स्नायूंना आवश्यक पोषकतत्त्वंही पाण्यातून मिळतात. नियमित पाणी प्यायल्यानं डिहायड्रेशनची समस्याही दूर होते. तणाव कमी करा (Reduce stress) कोणत्याही प्रकारच्या तणावामुळं किंवा मानसिक ताणामुळं शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन बाहेर पडू लागतं. हे हार्मोन सोडलं जाणं शरीरासाठी चांगलं नसतं. कॉर्टिसोल हार्मोन सोडल्यामुळं, स्नायू बळकट आणि पीळदार होण्याची प्रक्रिया थांबते. म्हणून, नियमितपणे योग ध्यान करा. जेणेकरून अति मानसिक ताणाला बळी पडावं लागणार नाही. हे वाचा - नीट पचन न होणं अनेक गंभीर आजारांचं कारण बनतं; आहारातील या चुका ताबडतोब बदला प्रथिनेयुक्त आहार घ्या (Protein rich diet) उत्तम शरीर तयार करण्यासाठी भरपूर प्रथिनांची गरज असते. असं केल्यानं स्नायूंच्या ऊतींना पोषण मिळतं. जर एखाद्या व्यक्तीचं वजन 60 किलो असेल तर, त्याला दररोज सुमारे 90 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भात, कडधान्यं, ब्राऊन ब्रेड, ओट्स खाणं आवश्यक आहे. दररोज 7-8 तास गाढ झोप घ्या (Enough Sleep) दररोज रात्री 7-8 तासांची चांगली झोप घेणं आणि सकाळी लवकर उठणं हे उत्तम आरोग्याचं लक्षण मानलं जातं. रात्री चांगली झोप लागल्यानं स्नायूंची झीज भरून निघते आणि त्यांचा आकार वाढतो. तर, कमी झोपेमुळे शरीरातील प्रोटीन संश्लेषण कमी होऊ लागतं. त्यामुळं स्नायूंचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळं रात्री झोपण्याच्या कालावधीबाबत तडजोड करू नका. हे वाचा - घरात साठवलेल्या धान्यांमध्ये किडे लागतात का? हे सोपे उपाय करून वर्षभर टिकवा घरी नियमितपणे हलका व्यायाम करा (Home exercise) उत्तम शरीर बनवण्यासाठी जिममध्ये जाणं आवश्यक नाही. घरी बसूनही नियमितपणे व्यायाम केल्यास तुमचे स्नायू दणकट बनू शकतात. यामध्ये पुशअप्स, पुलअप्स, स्क्वॅट्स, लंग्ज, हँडस्टँड पुशअप्स, पुल-अप्स, डिप्स, बॉडी रो, अल्टरनेटिंग लंग्ज, साइड प्लँक्स, सिट-अप्स आदी व्यायामांचा समावेश आहे. या व्यायामासाठी दररोज एक तास काढण्याचा प्रयत्न करा. जर हे करणे शक्य नसेल तर, आठवड्यातून 3 वेळा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.