Home /News /lifestyle /

एका लग्नाची अनोखी गोष्ट! आपल्याच प्रेमात आकंठ बुडाली; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करून स्वतःशीच केलं लग्न

एका लग्नाची अनोखी गोष्ट! आपल्याच प्रेमात आकंठ बुडाली; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करून स्वतःशीच केलं लग्न

स्वत:वर प्रेम करावं असं म्हणतात ते या तरुणीनं भलतंच मनावर घेतलं.

वॉशिंग्टन, 03 मार्च : स्वतःवर प्रेम करणं हा दुसऱ्यावर प्रेम (Love) करण्याचा पहिला टप्पा आहे, असं म्हटलं जातं. अमेरिकेतल्या (USA) एका महिलेनं याचा वेगळाच अर्थ घेतला आहे. ज्याच्याशी लग्न ठरलेलं होतं, त्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप (Break-up) झाला आणि मग तिने काय केलं? 'बॉयफ्रेंड नाही तर नाही, माझं स्वतःवर तर प्रेम आहे ना,' असा विचार करून तिनं चक्क स्वतःच स्वतःशी लग्न (Self Marriage) केलं. विचित्रच वाटतंय ना! पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. मेग टेलर मॉरिसन (Meg Taylor Morrison) असं या महिलेचं नाव. ती जॉर्जियातल्या अटलांटा (Atlanta, Georgia) इथली रहिवासी आहे. लाइफ कोच आणि बिझनेस कोच असलेल्या मेग हिचं 31 ऑक्टोबर 2020 रोजी तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न होणार होतं. पण काही कारणांमुळे त्या दोघांचं जून 2020 मध्ये ब्रेकअप झाला. दोघांनी मैत्रीपूर्ण पद्धतीने वेगळं व्हायचं ठरवलं. पण मेगने त्यांच्या विवाहासाठी कोलोरॅडोमधल्या डेन्व्हर (Colorado) इथं सगळी व्यवस्था आधीच करून ठेवली होती. मग बुकिंग कॅन्सल करण्याच्याऐवजी तिच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली. तिनं स्वतःशीच लग्न करायचं ठरवलं. हे वाचा - याला कोणतीच मुलगी नाही म्हणणार नाही, तरुणानं केलं असं हटके प्रपोज; VIDEO VIRAL 'माझ्या लग्नासाठी मला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही, अगदी नवऱ्याचीसुद्धा,' असा विचार तिच्या डोक्यात आला आणि तिने त्या विचाराची अंमलबजावणी करायचं ठरवलं. तिने स्वतःच्या विवाहसोहळ्याची जंगी तयारी केली. त्या विशेष दिवसासाठी तिने अनेक महिने आधीपासून तयारी केली. खास वेडिंग केकचीही ऑर्डर देऊन ठेवली. एवढंच कशाला, लग्नासाठी खास ड्रेस आणि लखलखती हिऱ्याची अंगठीदेखील (Diamond Ring) मागवून ठेवली. अगदी कशाचीच कसर तिने ठेवली नाही. एका क्षणी मेगला वाटलं की आपल्या या निर्णयामुळे आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला कदाचित आपल्याला ऑब्सेसिव्ह नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी (स्वप्रतिमेवर अति प्रेम करण्याचा एक मनोविकार) असावा असं वाटेल. मेगच्या आईलाही सुरुवातीला मेगच्या या निर्णयाचा ताण आला होता. आपल्या मुलीचा हा निर्णय तिच्या 'इगो'तून आल्यासारखं सगळ्यांना वाटेल, असं आईला वाटत होतं. पण मेगने हा निर्णय घेतला तो म्हणजे दुसऱ्यांचा विचार करण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रीत करणं योग्य आहे, असं तिला वाटत होतं. हे वाचा - अभिनेत्रीला ब्युटी ट्रिटमेंट पडली महागात; सुंदर दिसण्याच्या नादात बिघडला चेहरा अखेर मेगचा विवाहसोहळा अगदी थाटात झाला. परंपरेप्रमाणे कझूस (Kazoos) या वाद्यावर 'हिअर कम्स दी ब्राइड' हे गाणं तिच्या फ्लॉवर गर्ल्सनी वाजवलं आणि ती मधून चालत आली. त्याच वेळी पाहुण्यांनी फुगे फुगवले आणि त्यांनी शँपेनचा आस्वादही घेतला. तिने स्वतः लिहिलेली प्रतिज्ञाही वाचली, वेडिंग रिंग अर्थात अंगठीही स्वीकारली. आरशात पाहून स्वतःचं (प्रतिमेचं) चुंबनही घेतलं आणि स्वतःवरचं प्रेम कायम ठेवण्याचं वचन दिलं. उपस्थित मित्रपरिवार आणि कुंटुबीयांनी मेगला केक भरवला, त्यानंतर सगळ्यांनी नृत्य केलं आणि जेवणाचा आस्वादही घेतला.
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Breakup, International, Lifestyle, Love, Marriage, PHOTOS VIRAL, USA

पुढील बातम्या