मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /याला तर कोणतीच मुलगी नाही म्हणणार नाही, तरुणानं केलं असं हटके प्रपोज; VIDEO VIRAL

याला तर कोणतीच मुलगी नाही म्हणणार नाही, तरुणानं केलं असं हटके प्रपोज; VIDEO VIRAL

असं प्रपोज (propose) पाहून तुम्हीही शॉक व्हाल.

असं प्रपोज (propose) पाहून तुम्हीही शॉक व्हाल.

असं प्रपोज (propose) पाहून तुम्हीही शॉक व्हाल.

मुंबई, 02 मार्च :  प्रत्येक मुलीनं आपल्या जोडीदाराबाबत काही स्वप्नं रंगवलेली असतात. त्यापैकी एक म्हणजे तिला भेटणाऱ्या जोडीदारानं तिला रोमँटिक असं प्रपोज करावं. बरं आपल्या आवडत्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी मुलंदेखील काय काय नाही करत. प्रत्येकाचा वेगळ्या पद्धतीनं प्रपोज करण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून तरुणीकडून होकार आलाच पाहिजे. मग कुणी तिला बीचवर नेतं, कुणी डोंगरावर नेतं तर कुणी तिला तिच्या आवडत्या ठिकाणी नेतं. सध्या सोशल मीडियावर प्रपोजचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो तुम्ही कधी पाहिलाच नसेल.

एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडला चक्क आकाशात प्रपोज केलं आहे. हजारो फूट उंचावर नेऊन त्यानं आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी मागणी घतली आहे. मॅरेज प्रपोजलता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Wingman (@wingmanskydive)

wingmanskydive या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक तरुण आणि तरुणी स्कायडायव्हिंग करत आहेत. तरुणाच्या तोंडात एक अंगठी आहे. जेव्हा दोघंही आकाशात उंचावर जातात तेव्हा तरुण आपल्या तोंडातील अंगठी बाहेर काढतो आणि तरुणीसमोर धरतो. तिला लग्नासाठी प्रपोज करतो. हे पाहून तरुणीदेखील हैराण होते. ती लगेच त्याला होकारही देते. तेव्हा हा तरुण मोठ्याने 'ती हो म्हणाली', असं ओरडतो.

हे वाचा - 'डुकराच्या बड्डे'ला मधमाशांनी आणला केक, पुण्याच्या क्युट चिमुरडीचा भन्नाट VIDEO

मीडिया रिपोर्टनुसार या तरुणाचं नाव रे आहे. तो पायलट आहे. त्याच्यासोबत असलेली तरुणी ही त्याची गर्लफ्रेंड आहे. जितं नाव केटी आहे. रेला आपलं नात आता नेक्स्ट लेव्हलवर न्यायाचं आहे. म्हणजे त्याला आपल्या गर्लफ्रेंडला आपली बायको बनवायचं आहे. त्यासाठी तिला मॅरेज प्रपोज करायचं होतं. पण ते एका हटके पद्धतीने जेणेकरून हा दिवस दोघांच्याही कायम लक्षात राहिल.

हे वाचा - Apple iPhone चा झाला ॲपल ज्युस; डिलीव्हरी पार्सल उघडताच महिलेला शॉक

रेने केटीला स्कायडायव्हिंगवर नेलं आणि भर आकाशात त्यानं तिला लग्नाची मागणी घातली. असं हटके प्रपोज केटीच काय आपणही विसरू शकत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. पण अनेकांनी या कपलला भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

First published:

Tags: Proposal, Relationship