मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अभिनेत्रीला ब्युटी ट्रिटमेंट पडली महागात; अधिक सुंदर दिसण्याच्या नादात बिघडला चेहरा

अभिनेत्रीला ब्युटी ट्रिटमेंट पडली महागात; अधिक सुंदर दिसण्याच्या नादात बिघडला चेहरा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

अभिनेत्रीनं घेतलेल्या ब्युटी ट्रिटमेंटचा (tv actress beauty treatment) तिच्यावर उलटाच परिणाम झाला. तिचं नैसर्गिक सौंदर्यही तिनं गमावलं आहे.

  • Published by:  Priya Lad
पीव्ही रमना कुमार/हैदराबाद, 02 मार्च : आपण सुंदर (beautiful) दिसावं असं प्रत्येक तरुणीला वाटतं. त्यातही एखादी अभिनेत्री असेल तर मग तर तिला तिच्या सौंदर्याची अधिकच काळजी घ्यावी लागते. मग टोकदार नाक, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ, हरणासारखे डोळे, डाग, पिंपल्स आणि सुरकुत्या विरहित तुळतुळीत चेहरा हवा असतो. नैसर्गिकरित्या असं सौंदर्य नसलं तरी सध्या कॉस्मेटिक सर्जरी (cosmatic surgery) आणि ब्युटी ट्रिटमेंटचा (beauty treatment) पर्याय आहे. त्यामुळे अनेक अभिनेत्री (tv actress beauty treatment) या पद्धतीनं आपलं सौंदर्य टिकवण्याचं किंवा वाढवण्याचं प्रयत्न करतात. असंच जास्त सुंदर दिसण्याच्या नादात एका अभिनेत्रीचा चेहरा पूर्णपणे बिघडला आहे. सौंदर्य वाढवण्यासाठी तिनं घेतलेली ब्युटी ट्रिटमेंट तिला चांगलीच महागात पडली आहे. अभिनेत्री मेघना उर्फ निर्मलाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. या सुरकुत्या तिला घालवायच्या होत्या शिवाय केसांनाही कलर करायचा होता. यासाठी ती दराबादच्या श्रीनगर कॉलोनीतील लॅविनो कॉस्मेटिक्स आणि लेझर क्लिनिकमध्ये गेली. तिथं तिला 45 दिवसांची ट्रिटमेंट घेण्यास सांगण्यात आलं. यासाठी 62,000 रुपये घेतले. सौंदर्य खुलवण्यासाठी ती ब्युटी क्लिनिकमध्ये गेली खरी पण तिथं घेतलेल्या ब्युटी ट्रिटमेंटचा तिच्यावर उलटाच परिणाम झाला. तिचं नैसर्गिक सौंदर्यही तिनं गमावलं आहे. तिच्या त्वचेचा रंग अधिकच गडद झाला. तिच्या त्वचेचा नैसर्गिक पोत गायब झाला. हे वाचा - सहजसोपे उपाय करून सुंदर त्वचा मिळवायची आहे? हे टोमॅटोचे फेसपॅक आहेत मस्त मेघनाला जेव्हा आपल्या चेहऱ्यावर ट्रिटमेंटचे दुष्परिणाम दिसू लागले तेव्हा तिनं ब्युटी क्लिनिकडून पैसे परत मागितले. तिनं त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. पण क्लिनिककडून काही प्रतिक्रिया मिळाली नाही. तेव्हा तिनं जिल्हा ग्राहक मंचाशी संपर्क केला. फोरमनं क्लिनिकला 62,000 परत करण्यास सांगितलं आहे, शिवाय यामुळे झालेल्या मानसिक तणावासाठी भरपाई म्हणून  50,000 आणि खर्चासाठी 5,000 रुपये देण्याचेही आदेश दिले आहेत. जिल्हा फोरमच्या या आदेशाला क्लिनिकन आव्हान देत राज्य ग्राहक मंचाकडे याचिका दाखल केली. याचिकेत क्लिनिकनं म्हटलं, की जिल्हा फोरमनं उपचारात काही कमी होती का याची पडताळणी करण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची मदत घेतली नाही. शिवाय डॉ. आनंद यांच्या देखरेखीत या अभिनेत्रीवर कॉस्मेटोलॉजिस्ट उपचार करण्यात आले. अभिनेत्रीनं त्यांनाही हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्वांसमोर ब्लॅकमेल केलं. तसंच तिनं आआधीदेखील एका ब्युटी क्लिनिकमध्ये असं केलं आहे, असा आरोप या क्लिनिकनं केला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांचं नीट पालन न केल्यानं उपचाराचा असा परिणाम दिसून आल्याचं क्लिनिकनं सांगितलं. हे वाचा - सॅलड खाताना आवर्जून टाळा या चुका, नाहीतर हेल्दी फूडचा होईल भलताच परिणाम दरम्यान क्लिनिकनं याचिकेत जे काही म्हटलं आहे, त्याचे काही पुरावे नाहीत. त्यामुळे जिल्हा फोरमचा निर्णय योग्य आहे. असं म्हणते कोर्टानं क्लिनिकला फटकारलं. तेलंगणा राज्य ग्राहक विवाद आणि निवारण आयोग मंचानं ब्युटी क्लिनिकने या अभिनेत्रीला भरपाई द्यावी असे आदेश दिले आहेत.
First published:

Tags: Entertainment, Hyderabad, Telangana, Tv actress

पुढील बातम्या