• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • जगातला सर्वात महागडा Condom; किंमत वाचूनच येईल चक्कर

जगातला सर्वात महागडा Condom; किंमत वाचूनच येईल चक्कर

World's most expensive condom : एखादं कंडोम महाग म्हणजे किती महाग असू शकतं, याचा विचार कधी तुम्ही केला आहे का?

  • Share this:
    मुंबई, 12 जुलै : सध्या कंडोम (Condom) काही नवं राहिलेलं नाही. गर्भनिरोधक म्हणून कंडोम पर्याय उत्तम मानला जातो. कंडोम अगदी सहजपणे उपलब्ध होतं आणि अगदी प्रत्येकाच्या खिशाला परवडेल इतक्या किमतीत कंडोम (Condom price) मिळतो. अगदी स्वस्तापासून ते महागापर्यंत जसं तुम्हाला हवा तसा कंडोम तुम्ही घेऊ शकता. पण एखादं कंडोम महाग म्हणजे किती महाग असू शकतं, याचा विचार कधी तुम्ही केला आहे का? जगातील सर्वात महाग कंडोमची किंमत (World's most expensive condom) किती आहे माहिती आहे का? किंमत वाचूनच तुम्ही चक्रावून जाल. जगातील सर्वात महाग कंडोमची किंमत आहे £460 म्हणजे जवळपास  44 हजार रुपये.  काही मीडिया रिपोर्टनुसार स्पेनच्या एका छोट्याशा गावात एक बॉक्स सापडला. या बॉक्समध्ये कंडोम होता. याची लांबी 19 सेमी असल्याचं सांगितलं जातं आहे. या कंडोमचा अभ्यास केल्यानंतर ते 200 वर्षे जुनं असल्याचं समजलं. हे वाचा - या आहेत गर्भनिरोधकांच्या विविध पद्धती, कोणत्या ते पाहा अॅमस्टरडॅममधील एका व्यक्तीने हा ऐतिहासिक कंडोम आणला. या कंड़ोमचा ऑनलाइन  लिलाव करण्यात आला, तेव्हा अंदाजित रकमेच्या दुप्पट किमतीने त्याचा लिलाव झाला. हा जगातील सर्वात महागडा आणि दुर्मिळ कंडोम असल्याचं सांगितलं जातं आहे. असे कंडोम फक्त म्युझियममध्येच पाहायला मिळतात. हे वाचा - कोरोनाची लस घेतल्यावर किती दिवस करू नये सेक्स? वाचा शास्त्रज्ञांचा सल्ला त्यावेळी फक्त उच्च समाजातील लोकच कंडोमचा वापर करू शकत होते. तेव्हा सामान्यपणे कंडोमची लांबी  15सेमी असायची. हा कंडोम मेंढ्यांच्या आतड्यांपासून बनवलेला आहे. जेव्हा 19 व्या शतकात रबरी कंडोम बनवले जाऊ लागले. तेव्हा मेंढ्यांच्या आतड्यांपासून बनवलेला कंडोम नाहीसे झाले.
    Published by:Priya Lad
    First published: