Home /News /lifestyle /

ब्रेकअप के बाद गर्लफ्रेंडचा 'कार'नामा; धोखेबाज बॉयफ्रेंडचा घेतला सॉलिड बदला

ब्रेकअप के बाद गर्लफ्रेंडचा 'कार'नामा; धोखेबाज बॉयफ्रेंडचा घेतला सॉलिड बदला

चिटर बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी गर्लफ्रेंडने असा मास्टर प्लॅन आखला ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

    बीजिंग, 12 जुलै : ब्रेकअपचं (Breakup) दुःख कुणालाच सहन होत नाही. ज्याच्यावर आपण इतका विश्वास ठेवला, ज्याच्यासोबत आपण आयुष्य जगण्याची स्वप्नं रंगवतो अशा जोडीदाराने (Couple) दगा दिला तर काय होतं, हे कुणालाच वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या बॉयफ्रेंडने (Boyfriend) किंवा गर्लफ्रेंडने (Girlfriend) फसवलं तर साहजिकच मनात एक राग निर्माण होतो. सुडाची भावना पेटून उठते. अशीच एक तरुणी सुडाने पेटून उठली आणि तिने बॉयफ्रेंडचा सॉलिड बदला घेतला (Solid Revenge to Cheater Boyfriend). चीनच्या जेजिआंग प्रांतातील शाओशिंगमध्ये राहणारी लोऊ. तिच्या बॉयफ्रेंडने तिला फसवलं. एका दुसऱ्या मुलीसाठी त्याने तिला सोडून दिलं. सुरुवातीला ती खूप रडली पण नंतर तिने बॉयफ्रेंडचा बदला घ्यायचं ठरवलं. असा तसा बजला नाही तर तिने चक्क मास्टरप्लॅन आखला. या मास्टर प्लॅनमध्ये बऱ्याच लोकांना तिनं सहभागी करून घेतलं. बॉयफ्रेंडचं बँक खातंही रिकामं होईल आणि त्याच्यावर गुन्हेही दाखल होती अशी योजना तिने बनवली. यासाठी तिने  त्याच्याच कारची मदत घेतली. त्याच्या कारने तिने शक्य तितके जास्तीत जास्त ट्रॅफिक रूल मोडायचं ठरवलं. अवघ्या दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी 49 सिग्नल या कारमार्फत मोडण्यात आले. वाहतुकीच्या जितक्या नियमांचं उल्लंघन करता येईल तितके तिने केले. जेणेकरून बॉयफ्रेंडवर जास्तीत जास्त चार्ज लागेल. हे वाचा - VIDEO - भरमांडवात फुटला वराच्या अश्रूचा बांध; नवरीऐवजी स्वत:च ढसाढसा रडू लागला पोलिसांनी जेव्हा एकाच गाडीला इतके ट्राफिक रूल तोडताना पाहिले तेव्हा त्यांनासुद्धा थोडं आश्चर्य वाटलं. नक्कीच यात काही तर गौडबंगाल आहे, याचा संशय त्यांना आला आणि त्यांनी तपास सुरू केला. ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी ही कार भाड्याने घेणाऱ्या शोध घेतला तेव्हा चेन नावाच्या व्यक्तीने ती भाड्याने घेतल्याचं समजलं. ज्याने कियान नावाच्या व्यक्तीकडून ही कार भाड्याने घेतली होती. पोलिसांनी चेनची खोदूनखोदून चौकशी केली. तेव्हा त्याने आपला मित्र जूच्या सांगण्यावरून ही कार भाड्याने घेतल्याचं सांगितलं. त्यानेच सिग्नल तोडले असावेत, असंही तो म्हणाला. पोलिसांनी जूचीसुद्धा चौकशी केली. तेव्हा त्याने आपण की कार लोऊच्या सांगण्यानुसार भाड्याने घेतल्याचं सांगितलं. लोऊने त्याला कार भाड्याने घेण्याच्या बदल्यात डेटचं वचन दिलं होतं. कारण तिला आपल्या एक्स बॉयफ्रेंडचा बदला घ्यायचा होता. हे वाचा - सज्ञान जोडप्याला Live-in मध्ये राहण्याचा हक्क; हायकोर्टानेच दिली सुरक्षा एक्स बॉयफ्रेंडची कार भाड्याने घेऊन त्याच्यावर जितके चलन कापता येतील तितके कापण्याचा प्रयत्न करायचा असा प्लॅन लोऊचा होता. दंडाची रक्कम जितकी जास्त असेल तितकंच तिला समाधान मिळणार होतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Boyfriend, Couple, Girlfriend, Love, Relationship

    पुढील बातम्या