जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / OMG! केस आहेत की सोनं? रॉकस्टराच्या 6 केसांच्या लिलावाची किंमत वाचूनच येईल चक्कर

OMG! केस आहेत की सोनं? रॉकस्टराच्या 6 केसांच्या लिलावाची किंमत वाचूनच येईल चक्कर

OMG! केस आहेत की सोनं? रॉकस्टराच्या 6 केसांच्या लिलावाची किंमत वाचूनच येईल चक्कर

प्रसिद्ध रॉकस्टार कर्ट कोबेनच्या सहा केसांसाठी लाखो रुपयांची बोली लागली (American rockstar kurt cobain hair strands auction). नुकताच या केसांचा लिलाव झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 19 मे : अनेकांना आपल्या फेव्हरेट स्टार्सचे फोटो, त्याचा ऑटोग्राफ किंवा त्याच्याशी संबंधित वस्तू जपायला खूप आवडतात. काही जण तर सेलिब्रिटीचे इतके मोठे फॅन असतात की त्यांच्या कोणत्याही वस्तूसाठी लाखो रुपये मोजण्यासाठीही तयार असतात. सध्या अशाच एका सेलिब्रिटीची चर्चा सोशल मीडियावर आहे आणि हा सेलिब्रिटी म्हणजे अमेरिकेतील प्रसिद्ध रॉकस्टार कर्ट कोबेन (R****ockstar kurt cobain). कर्ट कोबेन आता या जगात नाही. 26 वर्षांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पण त्याची प्रसिद्धी आणि त्याची क्रेझ आजही कायम आहे. त्यामुळेच त्याच्या फक्त सहा केसांची लाखो रुपयांची बोली लागली. नुकतंच आइकॉनिक ऑक्शनमध्ये त्याच्या केसांचा लिलाव झाला (American rockstar kurt cobain hair strands auction). त्यामध्ये त्याचे 6 केस 14145 डॉलर्स म्हणजे तब्बल 10 लाख रुपयांना विकले गेले. हे वाचा -  कोरोना लशीची कमाल! 10 वर्षांपासून असलेला आजारच गायब झाल्याचा व्यक्तीचा दावा निर्वाणा बँडचा प्रमुख असलेल्या कर्टनेने आपल्या बँडचा पहिला अल्बम रिलीज झाल्याच्या चार महिन्यांनंतर हेअरकट केला होता. हा अल्बम सुपरहिट ठरला आणि कर्ट स्टार झाला. त्यानंतर त्याची प्रत्येक गोष्ट ब्रँड म्हणून समजली जाऊ लागली. 1889 मध्ये त्याचमित्र टेसा ओसबॉर्नने इंग्लंडमध्ये हा हेअरकट केला होता. कित्येक वर्षांपासून एका पिशवीत हे केस जपून ठेवण्यात आले होते. याआधी जून 2020 मध्ये त्याच्या गिटारचाही लिलाव झाला. ही गिटार 6 दशलक्ष डॉलर्स म्हणजे  44 रुपयांना विकली गेली. त्यानंतर ही जगातील सर्वात महागडी गिटार ठरली. त्याशिवाय एका इंश्युरन्स लेटरचाही लिलाव झाला होता. ज्यावर कोबेनने आपली पूर्ण साइन केली होती. या लेटरसाठी तब्बल 13 लाख रुपये मिळाले होते. हे वाचा -  Yuck! सकाळी उठताच स्वतःची लघवी पिते ही महिला; कारण वाचून तर बसेल आणखी धक्का 1987 मध्ये त्याने निर्वाणा बँडची सुरुवात केली. डिप्रेशन, ड्रग्ज यामुळे त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. 1994 साली वयाच्या 27 व्या वर्षी त्याने आत्महत्या केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात