जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फक्त एक Vitamin सुद्धा हिरावू शकतं तुमचं आई-बाबा होण्याचं स्वप्नं; वेळीच ओळखा लक्षणं

फक्त एक Vitamin सुद्धा हिरावू शकतं तुमचं आई-बाबा होण्याचं स्वप्नं; वेळीच ओळखा लक्षणं

महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या गोष्टींना महत्व देतात.

महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या गोष्टींना महत्व देतात.

व्हिटॅमिनच्या (Vitamin) कमतरतेचा प्रजननक्षमतेवरही परिणाम होतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मे : आपण ज्या गोष्टी खातो किंवा पितो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे आहाराचा आपल्या लाईफस्टाईलवर (Lifestyle) परिणाम होत असतो. आहाराबरोबर (Diet)  पोषक तत्वही महत्त्वाची असतात. आपल्या शरीरात व्हिटॅमिन्सचं **(**Vitamins) प्रमाण योग्य असायला हवं. आहारातील पोषक तत्व शारीरिक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. रोगप्रतिकारक प्रणाली (Immune System), प्रजनन क्षमता, स्किन केयर आणि स्ट्रेसवरही आहारानुसार परिणाम होत असतो. पुरुष (Men) आणि महिला (Women) दोघांच्या फर्टिलिटीवर **(**Fertility) म्हणजे प्रजननक्षमतेवर एका व्हिटॅमिनचा जास्त प्रभाव पडतो आणि ते म्हणजे व्हिटॅमिन डी **(**Vitamin D). व्हिटॅमिन डीची **(**Vitamin D)  कमतरता महिला आणि पुरुषांच्या आरोग्यावर परिणाम करते. पुरुष आणि महिलांच्या फर्टिलिटीबरोबर गर्भवती महिला, स्तनदा माता, नवजात बालकांवरही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा परिणाम होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने व्हायरल इन्फेक्शन, गर्भधारणेच्या समस्या, हाडं तुटणं आणि त्वचेशी संबंधीत समस्या सुरू होतात. त्यामुळे शरीरातून काही संकेत मिळायला लागल्यावर लगेच योग्य उपचार सुरू करायला हवेत. ( ‘घरी जाऊन कोरोना लस देऊ शकाल का? तर आम्ही BMC ला परवानगी देतो’ - मुंबई हायकोर्ट ) व्हिटॅमिन डीच्या कमतरचेची लक्षणं थकवा जाणवायला लागतो. हाडं दुखणं आणि अशक्तपणा वाटायला लागतो. शरीराच्या वेगवेगळ्या भागातील मसल्स दुखायला लागतात. तणाव जाणवत राहणं. महिलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने डिप्रेशन किंवा स्ट्रेसची समस्या जास्त वाढायला लागते. पुरुष आणि महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही व्हिटॅमिन डीच्या कमतरने प्रभाव पडतो. केस पांढरे होणं आणि वेळेआधी पांढरे होणं. जखम झाल्यास बरी व्हायला जास्त वेळ लागणं. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने सेरोटोनिन हार्मोनवर परिणाम होतो. त्यामुळे  मूड स्विंग होण्यासारखी समस्या निर्माण व्हायला लागते. लागल्यानंतर हाडं तुटणं किंवा पेल्विस आणि हिप्समध्ये वेदना होतात. ( Corona Vaccination : कोरोना लसीकरणात मोठा बदल; मोदी सरकारने जारी केले नवे नियम ) व्हिटॅमिन डी कसं घ्यावं? व्हिटॅमिन डी सूर्याच्या किरणांमधून मिळतं. त्याबरोबर व्हिटॅमिन डी असलेला आहार घेतल्याने कमतरता दूर होते. त्यासाठी आपल्या आहारात फॅटी फिशचा समावेश करावा. अंड्याच्या सफेद भागामध्येही व्हिटॅमिन डी असतं. त्याशिवाय आपल्या आहारात सोया मिल्क, दूध, दही, चीजसारखे डेअरी प्रोडक्ट, मशरूम, तांदूळ, संत्र ज्युस घेऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात