मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बापरे! Hotdog ने घेतला खेळाडूचा जीव; स्पर्धा जिंकण्याच्या नादात मृत्यू

बापरे! Hotdog ने घेतला खेळाडूचा जीव; स्पर्धा जिंकण्याच्या नादात मृत्यू

हॉटडॉगची स्पर्धा खेळाडूसाठी ठरली जीवघेणी.

हॉटडॉगची स्पर्धा खेळाडूसाठी ठरली जीवघेणी.

हॉटडॉगची स्पर्धा खेळाडूसाठी ठरली जीवघेणी.

    वॉशिंग्टन, 22 ऑक्टोबर : बऱ्याच लोकांना खायला खूप आवडते. असे फूडी लोक अनेकदा खाण्याच्या स्पर्धा लावतानाही दिसतात (Food eating competition). पण ही खाण्याची स्पर्धाही जीवावर बेतू शकते. अशीच एक धक्कादायक घटना घडली ती अमेरिकेत (United States). एका तरुणीसाठी खाण्याची स्पर्धा जीवघेणी ठरली (Woman dies after chocking). हॉटडॉग खाणं तिच्या जीवावर बेतलं. नेमकं झालं तरी काय पाहुयात (Woman dies during hotdog eating competition). 20 वर्षांची मॅडलीन मॅडी (Madelyn “Madie” Nicpon)  टफ्ट्स युनिव्हर्सिटीची (The Tufts University) विद्यार्थिनी. मॅडलिनी युनिव्हर्सिटीत खूप प्रसिद्ध होती. कारण ती लॅक्रोसची उत्तम खेळाडू होती. त्यामुळे स्पर्धा म्हटली की तिथं ती असायचीच. युनिव्हर्सिटी कॅम्पेसबाहेरही हॉटडॉग खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मॅडलीननेही हॉटडॉग  खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धा जिंकण्यासाठी ती भराभर हॉटडॉग खाऊ लागली. त्याचवेळी हॉटडॉग तिच्या घशात अडकला. ज्यामुळे तिचा श्वास कोंडला. तिला तात्काळ बोस्टन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं तिच्यावर उपचार सुरू होती. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी खूप धडपड केली. पण अथक प्रयत्नांनंतरही तिला वाचवता आलं नाही. दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. हे वाचा - रोजच्या जेवणात वरण खात नसाल, तर हे 5 मुद्दे आधी वाचा नाहीतर होईल पश्चात्ताप दरम्यान भारतातही घशात असे खाण्याचे पदार्थ अडकून श्वास कोंडून मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. मे, 2019 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये  एका व्यक्तीचा चिकनचा तुकडा घशात अडकल्यामुळे मृत्यू झाला होता. कुमार सिंह असं त्या व्यक्तीचं नाव.  36 वर्षाचे कुमार यांनी रात्री जेवणात चिकन खाल्लं. त्यावेळी चिकनचा तुकडा त्यांच्या घशात अडकला आणि त्यांना त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शिमलामध्ये आयजीएससी रुग्णालयात भरती करण्यात आलं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर कुमार यांना मृत घोषित करण्यात आलं. अन्ननलिकेमध्ये चिकनचा तुकडा अडकल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. हे वाचा - निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी उपवास आहे गरजेचा; नवं संशोधन आलं समोर महाराष्ट्रात तर लहान मुलांनाही असा जीव गमावला आहे. मार्च 2021 मध्ये सोलापूरमधील 11 वर्षीय रोहन सिद्धेश्वर निळेचं साबुदाण्यामुळे जीव गेला. माढा तालुक्यातील वडाची वाडी राहणारा रोहन हा दिव्यांग होता. त्याला अधून मधून झटकेही येत होते. महाशिवरात्री निमित्त घरात साबुदाणा करण्यात आला होता. या मुलाने दुपारी 4 च्या सुमारास हा साबुदाना खाल्ला होता. मात्र जेवणानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला माढ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यानंतर त्याची रवागनी माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. मात्र उपचारापूर्वीच तो मरण पावला होता. हे वाचा - कोंबड्यांमुळे कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचं संकट; नव्या महासाथीसाठी तयार राहा तर त्याआधी एप्रिल 2020 मध्ये अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा चॉकलेट घशात अडकल्याने मृत्यू झाला होता.  चॉकलेट म्हणजे लहाण मुलांचा जीव की प्राण. पण हेच चॉकलेट भिवंडीतील रिशी सचिन लसने या चिमुकल्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. रिशी याने चॉकलेट खाल्ले असता ते घशात अडकल्याने त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागला. ही बाब त्याच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने रिशीला भिवंडी शहरातील रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हे वाचा - Private part सोबत नको तो प्रयोग पडला महागात; असह्य वेदना झाल्या आणि शेवटी... त्यामुळे कोणताही पदार्थ कितीही आवडत असला तरी तो खाताना सावध राहायला हवं हेच यातून स्पष्ट होतं. त्यामुळे मनसोक्त खा पण अशा पद्धतीने मृत्यू होण्याची वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: America, Food, Health, Lifestyle, Viral, World news

    पुढील बातम्या