• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Chicken मुळे कोरोनापेक्षाही भयंकर Virus चं संकट; Avian Flu च्या महासाथीशी लढण्यासाठी तयार राहा

Chicken मुळे कोरोनापेक्षाही भयंकर Virus चं संकट; Avian Flu च्या महासाथीशी लढण्यासाठी तयार राहा

कोंबड्यांमुळे पसरणारा हा व्हायरस (Chicken virus) माणसांमध्ये वेगाने पसरतो.

  • Share this:
रोम, 22 ऑक्टोबर : 2019 या वर्षाच्या अखेरीला कोरोना विषाणूच्या संसर्गाचा (Corona Pandemic) प्रादुर्भाव फैलावायला सुरुवात झाली होती. मार्च 2020 नंतर तर या विषाणूने जगभरात आपलं रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली. या विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सगळ्यांनाच आपल्या घरात अडकून पडावं लागलं. आता या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लशी विकसित झाल्या आहेत. मात्र दरम्यानच्या काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता पोटात भीतीचा गोळा निर्माण करणारी एक बातमी समोर येत आहे. कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचं संकट आलं आहे. कोंबड्या नवा व्हायरस पसरवू शकतात (Chickens spread virus). सध्या पोल्ट्री फार्ममध्ये (Poultry Farm) अत्यंत घातक असे आठ विषाणू पसरत असल्याचं सांगितलं जात आहे. त्या विषाणूंचा फैलाव झाला, तर त्याचे परिणाम कोरोनापेक्षाही भयंकर असतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी रशियात लाखो कोंबड्या (Chickens) अचानक मेल्या होत्या. त्या कोंबड्यांना एव्हियन फ्लूचा (Avian Flu) संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे कोंबड्या मेल्यानंतर ती पोल्ट्री बंद करण्यात आली होती. हा एव्हियन फ्लू माणसांमध्येही वेगाने फैलावतो. एव्हियन फ्लूच्या त्या स्ट्रेनला H5N8 असं नाव देण्यात आलं होतं. त्या पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीलाही या स्ट्रेनचा संसर्ग झाला. त्यानंतर बघता बघता तिथल्या आणखी सात कर्मचाऱ्यांनाही एव्हियन फ्लूची लागण झाली. त्यांच्यामध्ये रोगाची लक्षणं सौम्य होती आणि ते उपचारांनंतर बरेही झाले. मात्र विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकाच वेळी 9 लाख कोंबड्या माराव्या लागल्या होत्या. त्या कोंबड्या पुरवठासाखळीत आल्या असत्या, तर त्यांच्या माध्यमातून एव्हियन फ्लूचा संसर्ग बराच पसरला असता. हे वाचा - धोक्याची घंटा ! चीन, रशिया, ब्रिटनमध्ये कोरोना रिटर्न्स, अनेक ठिकाणी Lockdown रशियातल्या (Russia) या घटनेची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली होती. मात्र त्या वेळी जागतिक आरोग्य संघटना (WHO) कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात व्यग्र होती. आता रशियन फेडरेशनच्या चीफ कंझ्युमर अॅडव्हायझर अॅना पोपोव्हा यांनी सांगितलं की, जगभरातल्या शास्त्रज्ञांनी लवकरात लवकर H5N8 विषाणूविरोधातलं इंजेक्शन विकसित करण्यासाठी एकत्र यायला हवं. तसं झालं नाही आणि हा विषाणू माणसात पसरू लागला तर परिस्थिती कोरोना संसर्गापेक्षाही अधिक बिकट होईल. आतापर्यंत एव्हियन फ्लूच्या आठ व्हेरिएंट्सचा शोध लागला असून, हे सगळे व्हेरिएंट्स माणसासाठी प्राणघातक ठरू शकतात. हे वाचा - धोक्याची घंटा ! चीन, रशिया, ब्रिटनमध्ये कोरोना रिटर्न्स, अनेक ठिकाणी Lockdown कोरोना संसर्गाच्या जागतिक महासाथीमुळे एव्हियन फ्लूबद्दल फारशी चर्चा झाली नाही. मात्र एव्हियन फ्लूदेखील महाभयंकर आहे. गेल्या आठवड्यात चीनमध्ये (China) 48 नागरिकांना H5N8 चा संसर्ग झाल्याचं वृत्त असून, त्यांच्यावर गोपनीय रितीने उपचार सुरू आहेत. त्यापैकी बहुतांश व्यक्ती पोल्ट्री फार्ममध्ये काम करत होत्या. संसर्ग झालेल्यापैकी निम्म्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे. चीनसोबतच ब्रिटनमध्येही एव्हियन फ्लूच्या संसर्गावर लक्ष ठेवलं जात आहे. थोडीशी बेपर्वाई झाली, तरी कोंबड्यांच्या माध्यमातून मृत्यूचे दूत माणसांपर्यंत पोहोचू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
First published: