मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Tur Dal Health Benefits: रोजच्या जेवणात वरण खात नसाल, तर हे आधी वाचा..

Tur Dal Health Benefits: रोजच्या जेवणात वरण खात नसाल, तर हे आधी वाचा..

तूर डाळ ही महाराष्ट्रीय जेवणाचा अविभाज्य भाग आहे. संतुलित आहारात प्रथिन्यांचा स्रोत म्हणून प्रामुख्याने तूर डाळच खाल्ली जाते. रोजच्या जेवणात वरण नसेल तर तुम्ही किती मोठी चूक करताय वाचा...

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : डाळी आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. (health Benefits of pulses in diet) डाळींना प्रथिनांचा चांगला स्त्रोत मानलं जातं. शाकाहारी लोकांनी (protein source for vegetarians) प्रथिनांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आपल्या आहारात डाळींचा समावेश करावा. तसं पाहिलं तर आपण कोणतीही डाळ खाऊ शकतो आणि ती आरोग्यासाठी उपयुक्तच असते. यापैकी आज आम्ही आपल्याला तूर (tur dal) डाळीविषयी माहिती देणार आहोत. तूर डाळीच्या सेवनानं वजन नियंत्रित करता येतं. तूर डाळीत कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, तांबं, सेलेनियम, मॅंगनीज आणि प्रथिनं हे घटक आढळतात. एवढंच नाही तर, हा फायबरचा चांगला स्त्रोत मानला जातो. फायबर पचन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. जाणून घेऊ तूर डाळ खाण्याचे (benefits of eating tur dal every day) आणखी फायदे. वजन कमी करणे: तूर डाळीच्या सेवनाने वजन नियंत्रित करता येते. तूर डाळीत प्रथिनांच्या अस्तित्वामुळे ते खाल्ल्यानंतर बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळं ही डाळ जास्त प्रमाणात खाणं टाळावं. मात्र, याच कारणामुळं ही डाळ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हे वाचा - धोनीशिवाय CSK ​​नाही अन् सीएसकेशिवाय धोनी नाही’, संघ मालकाचे मोठे भाष्य रोग प्रतिकारशक्ती ( इम्यूनिटी – Immunity) : तूर डाळीमध्ये इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म आहेत, जे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करू शकतात. दररोज एक वाटी तूर डाळ खाल्यानं रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. मधुमेह (Diabetes): तूर डाळ मधुमेहावर फायदेशीर आहे. या डाळीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. एवढंच नाही तर, हे जटिल कर्बोदकांचाही (कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट - complex carbohydrates) चांगला स्त्रोत आहे. तो मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकतो. हे वाचा - SBI PO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये PO पदाच्या तब्बल 2056 जागांसाठी भरती; इतका मिळेल पगार पचन: तूर डाळीनं पचन चांगलं ठेवता येतं. तूर डाळ फायबरचा (Fiber) चांगला स्रोत मानला जातो. फायबर पचनासाठी उपयुक्त ठरू शकते. दररोज एक वाटी तूर डाळ खाल्ल्यानं पचनक्रिया उत्तम राहू शकते. रक्तातील साखर (Blood Sugar) : तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, तूर डाळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तूर डाळ पोटॅशियमनं समृद्ध आहे. ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या