• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • हिवाळ्यात silky आणि smooth Skin हवी असेल तर फॉलो करा या 5 सोप्या स्टेप्स

हिवाळ्यात silky आणि smooth Skin हवी असेल तर फॉलो करा या 5 सोप्या स्टेप्स

हिवाळ्यात स्टेप बाय स्टेप बॉडी स्किन केअर रूटीन (Winter Body Skin Care Routine) फॉलो करणं गरजेचं ठरतं.

  • Share this:
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: चेहऱ्याचं सौंदर्य (Beauty) टिकवण्यासाठी नियमित क्लीन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग (Moisturizing) करणं आवश्यक असतं. हिवाळ्यामध्ये (Winter) तर आपण आपल्या चेहऱ्याची सर्वांत जास्त काळजी घेतो. चेहऱ्याप्रमाणे हिवाळ्यात शरीराच्या इतर भागांचीही विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. कारण, हिवाळ्यात शरीराची त्वचा कोरडी होते. कधी-कधी हातापायाची त्वचा काळीदेखील पडते. त्यामुळे हिवाळ्यात स्टेप बाय स्टेप बॉडी स्किन केअर रूटीन (Winter Body Skin Care Routine) फॉलो करणं गरजेचं ठरतं. तुम्हाला हिवाळ्यातलं बॉडी स्किन केअर रूटीन माहीत नसेल, तर इथे दिलेली माहिती उपयुक्त ठरेल. हे बॉडी स्किन केअर रूटीन फॉलो करून तुम्ही तुमच्या शरीराच्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेऊ शकता. हिवाळ्यात अशी घ्या शरीराच्या त्वचेची काळजी - 1. ड्राय ब्रशचा वापर करा त्वचेची काळजी घेताना सर्वांत अगोदर ड्राय ब्रशच्या मदतीनं, त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी (dead cells) काढून टाका. ड्राय ब्रशिंग (Dry Brushing) चांगल्या प्रकारे एक्सफोलिएट करतं आणि सेल्युलाइट कमी करतं. परिणामी तुमची त्वचा मुलायम आणि गुळगुळीत (Soft and Smooth) होते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा ड्राय ब्रशिंग करा. हेही वाचा- Benefits of Onion for Women: तुम्हीही कांदा खात नाही का? वाचा महिलांसाठी काय आहेत त्याचे फायदे
 2. त्वचा स्वच्छ करा
ड्राय ब्रशिंगनंतर त्वचेवरची धूळ आणि घाण काढून टाका. यासाठी तुम्ही क्रीमी शॉवर जेल वापरू शकता. यानंतर तुमची त्वचा आणखी मऊ आणि गुळगुळीत दिसेल. 3. स्क्रब करा चेहऱ्याप्रमाणे शरीरालाही स्क्रबिंगची (Scrubbing) गरज असते. स्क्रबिंगमुळे तुमच्या शरीरावरील त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि निस्तेज त्वचा टवटवीत होते. यासाठी तुम्ही होममेड स्क्रब (Homemade Scrub) वापरू शकता. स्क्रबिंग त्वचेला रेशमी, निरोगी आणि गुळगुळीत बनवतं. हेही वाचा-  Winter Season: हिवाळ्याच्या काळात आहारात असाव्यातच या गोष्टी; मिळतील आरोग्यदायी फायदे
 4. बॉडी लोशन (Body lotion) लावा
क्लिन्झिंग आणि एक्सफोलिएटिंग केल्यानंतर त्वचेला हायड्रेट करण्यासाठी तुम्ही बॉडी लोशन वापरू शकता. यासाठी खोबरेल तेल, बदाम तेल इत्यादींचा वापर करता येतो. यामुळं तुमची त्वचा दिवसभर हायड्रेट राहते. 5. हॅन्ड क्रीम वापरा आपले हात सतत काही ना काही काम करण्यात व्यग्र असतात. त्यामुळे हातांच्या त्वचेला एक्‍स्‍ट्रा नरिशमेंटची गरज असते. हात कोरडे होऊ नयेत यासाठी हॅन्ड क्रीमचा नक्की वापर करा. हातांना व्हॅसलिनदेखील लावू शकता. हेही वाचा-  Mental Health: डोक्यातून अशा गोष्टी काढून टाकणंच आहे फायदेशीर; या टिप्स येतील कामी
 वरच्या टिप्स अतिशय सोप्या आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराच्या त्वचेचं गारठ्यापासून संरक्षण करू शकता.
Published by:Pooja Vichare
First published: