नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: अनेक वेळा वासामुळे लोक कांदा खाणं टाळतात. या यादीत महिला आघाडीवर असतात. अनेक महिलांना कच्चा कांदा खायला आवडत नाही, कारण तो खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर तुम्ही कांद्यापासून मिळणाऱ्या फायद्यांपासून वंचित (Benefits of Onion for Women) राहाल. महत्त्वाचे म्हणजे कांद्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. एवढेच नाही तर कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, आयरन, फोलेट आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. जे उत्तम आरोग्यासाठी कामी येतात. सर्दी आणि फ्लूवरही कांदा फायदेशीर आहे. कांद्यामध्ये फायटोकेमिकल्स, एलियम आणि एलिल डिसल्फाइड सारखे घटक देखील असतात, जे सेवन केल्यानंतर एलिसिनमध्ये रूपांतरित होतात. टीव्ही 9 ने याबाबत बातमी दिली आहे. आज आपण कांदा महिलांसाठी किती फायदेशीर आणि महत्त्वाचा आहे, याबाबत जाणून घेऊया. रजोनिवृत्तीची लक्षणं होतात कमी रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते. त्यामुळे महिलांच्या शरीराला आहारातून कॅल्शियम कमी मिळू लागते. यामुळेच ऑस्टिओपोरोसिसची समस्या टाळण्यासाठी कॅल्शियम सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत महिलांसाठी कांदा गुणकारी ठरतो. हे वाचा - Vegan Tea: तुम्ही कधी प्यायलाय का व्हेगन टी? जाणून घ्या कसा बनवायचा आणि त्याचे फायदे अकाली वृद्धत्व अकाली वृद्धत्व टाळायचे असेल तर कांदा खूप उपयुक्त आहे. कांद्यामध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे आढळतात. यामुळेच ते त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. कांद्यामध्ये असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म तुम्हाला बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या त्वचेसाठी कांदा वापरावा. मुरूमे कांद्यामध्ये अँटीबॅक्टीरियल, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे अनेक फायदे आहेत. याचा अर्थ मुरुमांना कारणीभूत असलेले बॅक्टेरिया त्यातून काढून टाकता येतात. असे म्हटले जाते की कांदा खाल्ल्याने मुरुमांची समस्या देखील कमी होते. यासोबतच कांद्याच्या रसात 1 चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्स करून चेहऱ्यावर लावा, 20 मिनिटे चेहऱ्यावर लावल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. याचा फायदा होईल. हे वाचा - 2014 पासून खरं स्वातंत्रय मिळालं हे आजही माझं प्रामाणिक मत, माझं मत मी बदलणार नाही : विक्रम गोखले कांदा केसांच्या वाढीसाठी उपयुक्त कॅरोटीन हा एक प्रकारचा प्रोटीन आहे, जो केस, नखे आणि आपल्या त्वचेच्या समस्या दूर करण्याचे काम करतो, तर कांद्यामध्ये सल्फर मुबलक प्रमाणात आढळते. सल्फर केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. तसेच केस पातळ होण्याची समस्याही त्यामुळे दूर होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.