• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Winter Season: हिवाळ्याच्या काळात आहारात असाव्यातच या गोष्टी; मिळतील आरोग्यदायी फायदे

Winter Season: हिवाळ्याच्या काळात आहारात असाव्यातच या गोष्टी; मिळतील आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात आपल्या आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे, जे आपल्या शरीराला आतून उष्णता देतात. तसंच, आपली रोगप्रतिकारक शक्ती (immunity) मजबूत करतात.

 • Share this:
  नवी दिल्ली,19 नोव्हेंबर: थंडीच्या मोसमाने (winter season) दमदार सुरुवात केली आहे. या ऋतूमध्ये थोडीशाही निष्काळजीपणामुळं लोक आजारी पडू शकतात. थंडीपासून (cold) शरीराचा बचाव करण्यासाठी लोक वरपासून खालपर्यंत लोकरीचे कपडे घालतात. परंतु अनेक वेळा शरीर आतून अशक्त असतं, तेव्हा खूप थंडी जाणवते आणि लोकरीचे कपडे वापरूनदेखील थंडीपासून पूर्णपणे बचाव करण्यात यश मिळत नाही. हिवाळ्यात आपल्या आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे, जे आपल्या शरीराला आतून उष्णता देतात. तसंच, आपली रोगप्रतिकारक शक्ती (immunity) मजबूत करतात. इथं जाणून घ्या अशाच 5 सुपरफूड्सबद्दल जे हिवाळ्यात तुमचे खरे मित्र ठरतील. त्यांचा आहारात समावेश केल्यानं तुमच्या आरोग्यासह त्वचाही सुधारेल. 1. फ्लेक्ससीड (Flaxseed) विशेषत: शाकाहारी लोकांसाठी फ्लेक्ससीड हे सुपरफूड (super food) मानलं जातं. हे ओमेगा 3 फॅटी अ‌ॅसिडनं समृद्ध आहे, जे सहसा मांसाहारातून मिळतं. फ्लेक्ससीडस हे पोषक तत्त्वांचा खजिना मानलं जातं. याचं सेवन केल्यानं तुमचं शरीर आतून उबदार राहतं. डायबिटीज, बीपी, सांधेदुखी, ह्रदयाचा त्रास आदी आजारांनी त्रस्त असलेल्यांनी हिवाळ्यात फ्लेक्ससीड जरूर खावेत. यामुळं त्यांची सर्व गुंतागुंत कमी होते. 2. खजूर (Dates/ khajur) खजूरामध्ये कॅल्शियम, सेलेनियम, मॅंगनीज, फायबर आणि तांबं भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व गरम गुणधर्मांचे असतात. हिवाळ्यात हे खाल्ल्यानं पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हे वाचा - Chemical Castration: केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय? बलात्काऱ्यांना अशी दिली जाणार ही शिक्षा 3. शेंगदाणे (Peanuts) शेंगदाणे हा पोषक तत्त्वांचा खजिना मानला जातो. शेंगदाण्यांना गरिबांचा बदाम असंही म्हणतात. प्रथिनं, जीवनसत्त्वं, झिंक, लोहानं समृद्ध असल्यानं शेंगदाण्याला हा बहुमान मिळाला आहे. तसंच, शेंगदाण्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आढळतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात. हिवाळ्यात रोज किमान मूठभर शेंगदाणे खाल्ल्यानं शरीराला सर्व प्रकारच्या आजारांपासून वाचवता येतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. 4. गूळ (Jaggery) गूळ ही अशीच एक गोष्ट आहे, जी प्रत्येक स्वयंपाकघरात सहज मिळते. गुळामध्ये उष्णता असते. गूळ खाण्यास चविष्ट तर असतोच. शिवाय, तो औषध म्हणूनही काम करतो. गूळ तुमचं शरीर उबदार ठेवतो आणि तुमचा चयापचयही सुधारतो. याच्यामुळं शरीरातील रक्ताची कमतरता दूर करून पोटाचे सर्व विकार दूर होतात. तुम्ही याचा स्वयंपाकात वापर करू शकता किंवा याचं मिठाईच्या स्वरूपातही सेवन करता येईल. सर्दी, खोकला, अशक्तपणा, अ‌ॅलर्जी, अशक्तपणा यांसारख्या समस्या गूळ खाल्ल्यानं दूर होतात. हे वाचा - Boyfriend सोबतचा अश्लील Video viral झालेली महिला आमदार कोण आहे? 5. मनुका (Raisins/ kismis) मनुका ही एक अशी गोष्ट आहे की, ती तुम्ही सहज खिशात ठेवू शकता आणि सोबत घेऊन बाहेर जाऊ शकता. थोड्या-थोड्या वेळानं खाऊ शकता. बेदाण्यामध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. रोज खाल्ल्यानं शरीरातील अशक्तपणा (weakness) दूर होतो आणि अॅनिमियाचा (anemia) त्रास होत नाही.
  Published by:News18 Desk
  First published: