मुंबई, 19 नोव्हेंबर : आपल्या मनात सतत काहीतरी विचारमंथन चालू असतं. बर्याच गोष्टी, अनेक विचार डोक्यात येत असतात. त्यातील काही विचार असे असतात, ज्याबद्दल आपल्याला वाटतं की डिलीट बटण असतं तर या सगळ्या आठवणी किंवा गोष्टी आपण आपल्या मनातून काढून टाकू शकलो असतो. तुम्हालाही असं वाटत असेल की, डोक्यातील एखादी गोष्ट कायमची डिलीट करून टाकावी. तर असं करणं अशक्य नाही, तुम्ही ते करू शकता. फक्त लर्न आणि अनलर्न करण्याची पद्धत (Tips to unlearn for mental health) फॉलो करा.
जास्त विचारांचा, मनाला त्रास होईल अशा विचारांचा नेहमी डोक्यात काहूर माजणं मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतं. आपल्या मेंदूवर या गोष्टींचं विनाकारण ओझं राहतं, खरंतर त्याची गरज नाही. त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टी विसरून जाण्यानं अनेक गोष्टी पुन्हा शिकण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच काही गोष्टी विसरून आपण आपले मानसिक आरोग्य बरोबर ठेवू शकतो. यासाठी तुम्ही खालील टिप्स देखील फॉलो करू शकता-
हुशारीने विश्वास ठेवा
आयुष्यात आपल्याला कोणाची ना कोणाची तरी गरज असते, पण ज्याला आपण सोबत घेतो तो आपल्या विश्वासाला पात्र असतोच असे नाही. त्यामुळे कोणावरही अवलंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवा.
हे वाचा - Foods for Zinc : या 5 गोष्टींच्या मदतीनं भरून काढा शरीरातील झिंकची कमतरता
ब्लेम गेमला बाय
दोष देणं सोपं आहे, म्हणूनच आपण आपल्या चुकांसाठी इतरांनाही दोष देतो. असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्याऐवजी तुम्ही तुमच्या चुकांची जबाबदारी तुमच्या डोक्यावर घ्या आणि गिल्टमधून बाहेर पडा.
नेहमी "होय" म्हणणे बरोबर नाही
प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची गरज नाही. आपण करू शकत नसलेल्या गोष्टींना नाही म्हणण्यास लाजू नका. हो म्हटल्यानंतर जर तुम्हाला ते काम करताना मानसिक ताण येत असेल तर ते तुमच्यासाठी योग्य नाही. त्यामुळे नेहमी हो म्हणणे टाळा. जमणार नसेल सरळ चांगल्या भाषेत नाही म्हणा.
हे वाचा - Vegan Tea: तुम्ही कधी प्यायलाय का व्हेगन टी? जाणून घ्या कसा बनवायचा आणि त्याचे फायदे
लोक काय म्हणतील
जर तुम्ही "लोक काय म्हणतील" याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर ही सवय बंद करा. आयुष्य तुमचे आहे, ते तुमच्या पद्धतीने जगा. लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची जबाबदारी तुमची नाही. लोक काही केलं तरी चर्चा करतातच, त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष द्या.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Mental health