बंगळुरू, 05 मार्च : आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लस (covid 19 vaccine) दिली जाते आहे. पण त्यापैकी काहींना मोफत (free corona vaccine) तर काहींना पैसे देऊ ही लस (corona vaccine price) घ्यावी लागते आहे. सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रात लस दिली जाते आहे. जे लोक खासगी लसीकरण केंद्रात लस घेत आहेत, त्यांना या लशीसाठी शुल्क आकारलं जात आहे. मात्र लवकरच खासगी रुग्णालयातही कोरोना लस मोफत मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकतं.
खासगी रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी एका डोसमागे 250 रुपये आकारले जातात. मोदी सरकारनं खासगी रुग्णालयात कोरोना लशीसाठी जो शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबाबत पुन्हा विचार करावा, असं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरमैया (Siddaramaiah) यांनी म्हटलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्रही दिलं आहे.
हे वाचा - कोरोना लस घेतल्यावर मद्यपान करणं ठरेल घातक? वाचा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं
सिद्धरमैया यांनी पत्रात म्हटलं आहे की, "खासगी आरोग्य केंद्रांमध्ये लशीसाठी 250 रुपये शुल्क आकारण्याची परवानगी देण्याचा सरकारने निर्णय घेतला. पण यामुळे कोरोनापासून सर्वांना सुरक्षा देण्यात आणि कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांवर प्रतिकूल परिणाम होईल"
सिद्धरमैया यांनी सांगितलं, "भारतात लसीकरण मोहिमेचा वेग कमी आहे. देशषात आतापर्यंत निम्म्या लोकांचंच लसीकरण झालं आहे. इतर देशांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जाता आहे. इज्राइलमध्ये 36 टक्के नागरिकांचं लसीकरण झालं तर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अनुक्रमे सहा आणि चार टक्के लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे"
हे वाचा - Covaxin की Covishield; कोणती कोरोना लस आहे बेस्ट?
"भारतात लसीकरणाचा वेग तेव्हाच वाढेल जेव्हा ही लस मोफत उपलब्ध होईल. मी भारताच्या पंतप्रधानांना आवाहन करतो की त्यांनी या निर्णयावर पुन्हा विचार करावा. प्रत्येक भारतीयाला मोफत कोरोना लसीकरण उपलब्ध करून द्यावं. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं लसीकरणाचा भार उचलावा", असंही ते म्हणाले.