मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

FAQ- कोरोना लस घेतल्यावर मद्यपान करणं ठरेल घातक? वाचा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

FAQ- कोरोना लस घेतल्यावर मद्यपान करणं ठरेल घातक? वाचा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

Coronavirus Vaccination: देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. दरम्यान लोकांमध्ये अद्यापही कोरोना लशीबाबत काही संभ्रम आहेत. जाणून घेऊयात काही प्रश्नांची उत्तरं

Coronavirus Vaccination: देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. दरम्यान लोकांमध्ये अद्यापही कोरोना लशीबाबत काही संभ्रम आहेत. जाणून घेऊयात काही प्रश्नांची उत्तरं

Coronavirus Vaccination: देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. दरम्यान लोकांमध्ये अद्यापही कोरोना लशीबाबत काही संभ्रम आहेत. जाणून घेऊयात काही प्रश्नांची उत्तरं

    नवी दिल्ली, 05 मार्च: गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus Cases in India) संख्येत वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा (Corona Vaccination Second Phase) सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आदींना लस देण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील व्यक्ती तसेच अन्य आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे दीड कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 70 वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एम्समध्ये (AIIMS) भारत बायोटेकची स्वदेशी कोवॅक्सिन (Covaccine) चा पहिला डोस घेतला. कोरोना आणि लसीकरणाच्या अनुषंगाने अशी परिस्थिती असताना लसीबाबत अजूनही नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आरोग्य मंत्रालयाने नागरिकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. नेमके नागरिकांच्या मनात कोणते प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर काय आहेत, हे जाणून घेऊया... प्रश्न- लसीकरणानंतर मद्यपान करु नये का? उत्तर - आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) म्हणण्यानुसार, तज्ज्ञांच्या मते लसीकरणानंतर मद्यपान केल्याने आरोग्यावर काही विपरित परिणाम होतो, असे दर्शवणारे पुरावे अद्याप तरी मिळालेले नाहीत. याचा अर्थ मद्यपान केल्याने दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलेलं नाही. (हे वाचा-मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या स्टाफमधील 10 जण पॉझिटिव्ह, कोरोना;चं संकट वाढलं) प्रश्न- कोविड-19ची लस घेतल्याने महिलांमधील प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो, असा दावा सोशल मिडीयावर केला जात आहे. हा खरा आहे का? उत्तर – आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या सर्व अफवा आहेत. ही बाब खरी नसून निराधार आहे. लशीचा प्रजननक्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. सर्व लशींची प्राणी आणि माणसांवर ट्रायल घेतली जाते. या ट्रायलमध्ये काही दुष्परिणाम दिसले तर त्या लशीला परवानगी दिली जात नाही. प्रश्न- लसीकरणानंतर कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? उत्तर- लसीचे दोन्ही डोस हे सुरक्षित आहेत, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. परंतु, लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम दिसू लागल्यास संबंधित रुग्णाने नजीकच्या आरोग्य सुविधा केंद्राशी (Health Service Center) संपर्क साधावा. तसेच अशा स्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांशी देखील फोनद्वारे संपर्क साधू शकता. संपर्कसाठीचे फोन क्रमांक लसीकरणानंतर कॉइन एसएमएसमध्ये दिलेले आहेत.
    First published:

    Tags: Corona, Corona hotspot, Corona vaccination, Corona vaccine

    पुढील बातम्या