मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /नवऱ्याने दिली अफेअर करायची सूट; काही दिवसांतच बायकोने दिली Shocking news

नवऱ्याने दिली अफेअर करायची सूट; काही दिवसांतच बायकोने दिली Shocking news

प्रेमात धोका मिळाल्यामुळे एका महिलेनं आपल्या प्रियकराला भयंकर शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  (File Photo)

प्रेमात धोका मिळाल्यामुळे एका महिलेनं आपल्या प्रियकराला भयंकर शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (File Photo)

नवऱ्याने आपली व्यथा सोशल मीडियावर मांडली आहे.

मुंबई, 28 सप्टेंबर : काही कपल (Couple) असे असतात जे लग्नानंतरही एकमेकांना स्वातंत्र्य देतात. म्हणजे आपल्या इच्छा जोडीदारावर लादत नाहीत. तर जोडीदाराला (Relatinship story) ज्यामध्ये आनंद मिळतो ते करण्याची मोकळीक देतात (Husband wife). जेणेकरून वैवाहिक आयुष्यात अडचणी येणारन नाहीत. नातं टिकून राहिल. अशाच एका नवऱ्याने आपल्या बायकोच्याही आनंदाचा आणि आपल्या नात्याचा विचार करून तिला एक सूट दिली (Husband wife story). पण आपण दिलेली ही छोटीशी सूट म्हणजे आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरेल याचा विचारही त्याने केला नसेल (Husband and wife disputes). बायकोला नवऱ्याने दिलेली ही सूट त्याला चांगलीच महागात पडली आहे (Husband allowed wife for affair). आपलं लग्न, संसार वाचवण्यासाठी त्याने निवडलेल्या मार्गावर आता त्यालाच पश्चाताप होतो आहे (Wife extra marital affair).

नवरा आपल्या बायकोला वेळ देऊ शकत नव्हता. पण बायको आनंदात राहावी असं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्याने आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर करायला सांगितलं आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं म्हणजे काय हे या नवऱ्याला पुरतं कळून चुकलं आहे. या बिचाऱ्या नवरदेवाने आपली व्यथा सोशल मीडियावर मांडली आहे.

रिपोर्टनुसार या व्यक्तीने सांगितलं, "मी माझ्या कामात खूप व्यस्त असायचो. बायकोला बिलकुल वेळ देऊ शकत नव्हतो. पण तरी माझी बायको आनंदात राहावी, तिने मजामस्ती करावी, असं मला वाटायचं. आम्ही आपसात काही मर्यादाही ठरवल्या होत्या. म्हणजे कधीच मुलं जन्माला घालायची नाही. लग्नानंतर एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं असं ठरवलं. पण हळूहळू आमच्या नात्यात दुरावा आला. एक दिवस माझ्या मनात कसा काय विचार आला काय माहिती. मी माझ्या बायकोला सांगितलं की तिने मला फसवून दुसऱ्या कुणासोबत अफेअर केलं तरी मला काही फरक पडणार नाही. सुरुवातीला मला नेमकं काय बोलायचं आहे हे बायकोला समजलं नाही. मग मी तिला तुला जे करायचं आहे ते कर मला काहीच सांगण्याची गरज नाही, असं रागात म्हटलं"

हे वाचा - कारमधील रोमान्स पडला भारी! भयंकर परिस्थितीत अडकलं कपल, गाडीबाहेर निघणं मुश्किल

आता नवऱ्यानेच दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवायला परवानगी दिल्यानंतर बायकोनेही त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्यालाच मोठा धक्का दिला.

व्यक्तीने सांगितलं, "काही दिवसांनंतर माझ्या बायकोने मला सांगितलं की तिच्या ऑफिसमधील सहकारी तिच्यासोबत फ्लर्ट करतो आणि मी तिला दुसऱ्या कुणासोबत अफेअर करायला परवानगी दिल्याने तीसुद्धा आता तिलासुद्धा त्या व्यक्तीमध्ये रस वाटू लागला आहे. महिनाभरातच दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आले. त्यांनी शारीरिक ंसंबंधही ठेवले. जेव्हा माझ्या बायकोने मला हे सर्व सांगितलं तेव्हा मी खूप हैराण झालो. तरी मी तिला समजावलं की काळजी करू नको. मी सर्वकाही ठिक करण्याच प्रयत्न करू लागलो.  मला काही करून माझं लग्न वाचवायचं होतं. मी जास्तीत जास्त वेळ घरी राहू लागलो. तिच्या आवडीचे पदार्थ बनवू लागलो. घर नीट ठेवू लागलो. घरातील कामात तिची मदत करू लागलो. ती घरी येण्याआधी मी घरी पोहोचेन आणि तिच्यासाठी जेवण बनवेन यासाठी मी प्रयत्न करायचो"

"एक दिवस माझ्या बायकोने मला सांगितलं की ती शहराबाहेर आपल्या एका फ्रेंडला भेटायला जाते आहे. जितं नाव तिने सांगितलं तिला मी ओळखायचो. माझी बायको आता त्या सर्व परिस्थितीतून बाहेर पडून आपल्या गर्ल्स ग्रुपसोब बाहेर जाते आहे हे ऐकून मला बरं वाटलं. त्या व्यक्तीपासून माझी बायको दूर होऊन आपल्या फ्रेंड्ससोबत वेळ घालवते आहे, याचा मला खूप आनंद झाला. पण माझा हा आनंद एक दिवसही टिकला नाही. बाहेर जाण्याच्या एक दिवस आधीच तिने आपण खोटं बोलल्याचा खुलासा केला. ती आपल्या कोणत्या नव्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जात होती. जे ऐकून मला जबरदस्त झटका बसला. मी तिला ट्रिप रद्दस करायला सांगितलं. तिच्यासमोर हात जोडले पण तरी तिच्यावर काहीच फरक नाही. त्या पुरुषाला आपण वचन दिलं आहे आणि आपण ते मोडणार नाही हेच ती सांगत होती", असं तो म्हणाला.

हे वाचा - One Sided Relationship : एकतर्फी प्रेमामुळे वाढत आहे एकटेपणा; जरा हे वाचा

बायको ट्रिपवरून आल्यानंतर तर त्याला आपली बायको पूर्णपणे बदलल्याचं दिसलं. आता बायकोला परत मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे.

या व्यक्तीने सांगितलं, "ती ट्रिपवरून परतल्यानंतर मी तिला आता त्या व्यक्तीला भेटणं बंद कर असं सांगितलं तर ती प्रयत्न करेन इतकंच म्हणाली. ती उशिरा घरी येऊ लागली. तिच्यासाठी जेवण बनवून मी तिची वाट पाहत बसायचो आणि ती आपल्याला भूक नाही सांगायची. मला माहिती आहे ती अजूनही त्या व्यक्तीला भेटते, त्याच्यासोबत डेटवर जाते. मी आता पूर्णपणे वेडा झालो आहे. काय करू काहीच समजत नाही आहे. मी तिला प्रेमळ मेसेज पाठवतो, तिला माझ्या आयुष्यात परत आणण्याचा प्रयत्न करतो. अगदी काऊन्सिंग सेशनलाही जाऊ लागलो आहे. मी स्वतःला अयशस्वी, अपयशी समजू लागलो आहे. आता मी माझ्या पत्नीला परत कसं मिळवू?", असा प्रश्न या व्यक्तीला पडला आहे.

या व्यक्तीची ही पोस्ट वाचल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी त्याची बायको आता त्याची राहिली नाही आहे. ती कदाचित परत कधीच मिळणार नाही, असंच म्हटलं आहे. तरी दोघांनीही समुपदेशकांकडे जाऊन पुन्हा एकत्र होण्याचा प्रयत्न करण्याचा सल्लाही काही जणांनी दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Couple, Lifestyle, Relationship, Wife and husband