जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कारमध्ये रोमान्स पडला भारी! भयंकर परिस्थितीत अडकलं कपल, गाडीतून बाहेर पडणंही झालं मुश्किल

कारमध्ये रोमान्स पडला भारी! भयंकर परिस्थितीत अडकलं कपल, गाडीतून बाहेर पडणंही झालं मुश्किल

कारमध्ये रोमान्स पडला भारी! भयंकर परिस्थितीत अडकलं कपल, गाडीतून बाहेर पडणंही झालं मुश्किल

कारमध्ये सेक्स करता करता कपल भलत्याच अडचणीत अडकलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिटन, 23 सप्टेंबर : काही कपल्सना (Couple romance) वेगवेगळ्या पद्धतीने रोमान्स (Couple romance in car) करायला आवडतो. रोमान्समध्ये काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात (Couple sex in car). मग यामध्ये रोमान्स करण्याची पद्धत असो किंवा ठिकाण, ते वेगळं असावं याकडे त्यांचा जोर असतो. पण असा हटके रोमान्स करण्याच्या नादात हे कपल अनेकदा भलत्याच अडचणीत सापडतं. सध्या असंच एक कपल चर्चेक आहे. ज्यांनी ओसाड ठिकाणी कारमध्ये रोमान्स केला आणि तो त्यांना चांगलाच महागत पडला. यूकेच्या डर्बीशायरमधील ही घटना आहे. एक कपल कारमध्ये रोमान्य करता करता विचित्र परिस्थितीत अडकलं. हे कपल सेक्स करत असताना कार एका छोट्या डोंगरावरून खाली  कोसळली. त्यानंतर ती उलटी झाली. त्यामुळे कपलला कारमधून बाहेरही पडता येईल. द सन च्या रिपोर्टनुसार डर्बीशायरमधील एका ओसाड ठिकाणी छोट्या डोंगराजवळ या कपलने कारला हँडब्रेक लावला आणि सेक्स करत होतं. सेक्स करताना चुकीने हँडब्रेक सुटला आणि मग गाडी सुरू होऊन ती घसरत रस्त्यावर आली. पण गाडी अशा पद्धतीने आडवी झाली की कपलला बाहेर पडायला जमलंच नाही. हे वाचा -  ही अशी कसली GF! स्वतःचे हातपाय बांधून BF ला दुसऱ्या महिलेसोबत करायला लावते सेक्स पोलिसांनी नंतर त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. कपलला कारमधून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामध्ये एक आडवी झालेली कार रस्त्याच्या मधोमध दिसेल.  पोलिसांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार  या कपलला दुखापत झालेली नाही. सोशल मीडियावर या कपलची स्टोरी पाहिल्यानंतर नेटिझन्सची त्यांची चांगलीच मजा घेतली आहे. त्यांच्यावर किती तरी कमेंट येत आहेत. हे वाचा -  पुरुषांवर आता नाही चालणार I Love You ची जादू, या तीन शब्दांनी लगेच होतात खूश! कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक निर्बंधांमुळे बहुतेक प्रेमीयुगुलांची कोंडी झाली. यादरम्यान बरेच कपल कारमध्ये सेक्स करताना आढळले. पाश्चिमात्य देशात तर वारंवार अशा घटना समोर आल्या. पोलिसांनी अशा अनेक जोडप्यांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. मार्चमध्ये डर्बिशायर पोलिसांना मोर्ले भागात रात्री उशीरा गस्त घालत असताना एक कार आढळली. जवळ जाऊन बघितलं असता त्यांना कारमध्ये एक जोडपं सेक्स करताना आढळलं. पोलिसांनी आपल्याला अशा आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्याचं लक्षात आल्यावर जोडप्याला अतिशय  ओशाळवाणं वाटलं. पोलिसांनी त्यांना लॉकडाऊनचा नियम मोडल्याबद्दल नोटीस बजावली आणि प्रत्येकी 400 डॉलर्सचा दंड ठोठावला. हे वाचा -  Relationship Promises : प्रेमळ नात्यासाठी आपल्या पार्टनरची अशी घ्या काळजी तर एप्रिलमध्येही दक्षिण डर्बीशायर पोलिसांनीही कारमध्ये सेक्स करणाऱ्या एका जोडप्याला दंड केला होता. त्या जोडप्यातील तरुण मुलगा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी 100 मैल ड्राईव्ह करून आला होता. भेटल्यानंतर त्यांना स्वतःला आवरणं कठीण झालं आणि त्यांनी कारमध्ये सेक्स करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पोलीस तिथं आल्यानं या जोडप्याला मोठा दंड भरून सुटका करून घ्यावी लागली. विलिंगटन इथंही एका जोडप्याला पोलीसांनी कारमध्ये सेक्स करताना पकडलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात