Home /News /lifestyle /

Friendship Day 2022: खूपच रंजक आहे ‘फ्रेंडशिप डे’चा इतिहास, जाणून व्हाल चकित

Friendship Day 2022: खूपच रंजक आहे ‘फ्रेंडशिप डे’चा इतिहास, जाणून व्हाल चकित

Friendship Day 2022: दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. परंतु मैत्रीच्या पवित्र्य नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हाच दिवस का निवडला गेला असावा? यामागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

Friendship Day 2022: दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. परंतु मैत्रीच्या पवित्र्य नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हाच दिवस का निवडला गेला असावा? यामागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

Friendship Day 2022: दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. परंतु मैत्रीच्या पवित्र नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हाच दिवस का निवडला गेला असावा? यामागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

    मुंबई 05 ऑगस्ट : मैत्रीचे नातं शब्दात व्यक्त करता येणार नाही अशा बंधानं बांधलं गेलेलं असतं. तसं पाहिलं तर मैत्रीचा उत्सव हा सदैव सुरुच असतो, तो साजरा करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची गरज नसते. परंतु तरीही फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो? दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी भारतात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकाला आपल्या खास मित्रांसोबत संपूर्ण दिवस एन्जॉय करायचा असतो आणि आपलं नातं घट्ट करायचं असतं. यावर्षी 07 ऑगस्ट (रविवार) रोजी फ्रेंडशिप डे (Friendship Day 2022) साजरा केला जाणार आहे. फ्रेंडशिप डेच्या सेलिब्रेशनच्या तयारीदरम्यान एक प्रश्न नक्कीच मनात येतो की दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो तो का? त्याऐवजी दुसरा दिवस का निवडला गेला नाही? असा प्रश्न तुमच्या मनात कधी आला असेल तर आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत. अशी झाली फ्रेंडशिप डेची सुरुवात- फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात पॅराग्वेपासून झाल्याचं सांगितलं जातं. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा 1958 मध्ये मांडण्यात आला होता. यानंतर संयुक्त राष्ट्रानं 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. परंतु भारत, बांगलादेश, अमेरिका असे अनेक देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात. हेही वाचा-  कसं शक्य आहे? महिलेच्या पोटात होती 'तिळी'; पण एकत्र नव्हे तर 2-2 वर्षांनी जन्माला आली ही कथाही आहे लोकप्रिय- ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागील कथाही लोकप्रिय आहे. असं म्हटलं जातं की अमेरिकेत 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. खून झालेल्या व्यक्तीचा एक खास मित्र होता, त्याला ही घटना कळताच त्यानंही निराश होऊन आत्महत्या केली. दोन मित्रांमधील अशी मैत्री पाहून अमेरिकन सरकारनं ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू हा दिवस प्रचलित झाला. यानंतर भारतासह इतर देशांमध्ये ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात आला.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Celebration, Festival, Friendship

    पुढील बातम्या