Home /News /heatlh /

कसं शक्य आहे? महिलेच्या पोटात होती 'तिळी'; पण एकत्र नव्हे तर 2-2 वर्षांनी जन्माला आली

कसं शक्य आहे? महिलेच्या पोटात होती 'तिळी'; पण एकत्र नव्हे तर 2-2 वर्षांनी जन्माला आली

एका महिलेच्या पोटात एकाच वेळी 3 भ्रूण राहिले पण ते एकत्र जन्माला येण्याऐवजी दोन वर्षांच्या फरकाने जन्माला आले.

    लंडन, 05 ऑगस्ट : एकाच वेळी जुळी-तिळी मुलं जन्माला येणं आता नवं नाही. अशी काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. एकाच वेळी पोटात तीन गर्भ असतील तर त्यांचा जन्मही एकाच वेळी होती. फक्त त्यांच्या जन्मात काही मिनिटांचा फरक असतो. पण एका महिलेने मात्र एकाच वेळी गर्भात राहिलेल्या तिळ्यांना दोन वर्षांच्या अंतराने जन्म दिला आहे. प्रेग्नन्सीच्या या विचित्र प्रकरणामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. सामान्यपणे प्रेग्नन्सीचा कालावधी 9 महिन्यांचा असतो. म्हणजे 9 महिन्यांनी किंवा त्याआधी बाळांचा जन्म होतो. पण यूकेतील सॉमरसेटमध्ये राहणाऱ्या कॅरेनने तिळ्यांना दोन-दोन वर्षांच्या फरकाने जन्म दिला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हे वाचा - आश्चर्य! म्हशीच्या पोटी जन्माला आलं 4 डोळ्यांचं रेडकू; विचित्र पिल्लाला पाहून डॉक्टर म्हणाले, 'असे प्राणी...' कॅरेन आणि तिचा नवरा जेम्स मार्क्स यांना तिळ्या मुलांचे आईबाबा होण्याचं सुख लाभलं. आपल्याला तिळं होणार याचा त्यांना खूप आनंद झाला. कॅरेनच्या गर्भात तिन्ही भ्रूण एकाच वेळी विकसित होत झाले पण तिने त्यांना एकत्र जन्म दिला नाही. यासाठी तिने आयव्हीएफची मदत घेतली. तिने आपले भ्रूण फ्रीज केले आणि त्यानंतर एकाएका मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आईच्या गर्भात एकाच वेळी विकसित झाल्यानंतरही ही मुलं वेगवेगळ्या वर्षी जन्माला आली. कॅरेनने चार वर्षांपूर्वी 1 सप्टेंबर 2018 साली आपला पहिला मुलगा कॅमेरॉनला जन्म दिला. त्याच्या जन्माच्या दोन वर्षांनंतर 15 सप्टेंबर 2020 साली मुलगी इसाबेला या जगात आली आणि आता या वर्षात 03 जुलै 2022 म्हणजे गेल्या महिन्यात तिसरा मुलगा गॅब्रिएल जन्माला आला.  कॅरेनच्या मते, आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला तिळी झाली. काही लोक आयव्हीएफनंतर आपल्या मुलांना कन्सिव्हह करू शकत नाही. पण माझं नशीब चांगलं की माझी तिन्ही मुलं जन्माला आली. आता आमचं आयुष्य पूर्ण झालं. हे वाचा - Shocking! वयाच्या पन्नाशीत शारीरिक संबंध ठेवताना तुटला प्रायव्हेट पार्ट; लघवीचाही झाला वांदा 2014 साली या कपलचं लग्न झालं. बरेच वर्ष प्रयत्न करूनही त्यांना मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी आयव्हीएफची मदत घेतली. एकाच वेळी तिच्या पोटात 5 भ्रूण होते पण त्यापैकी दोघांचा गर्भपात झाला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant, Pregnant woman, Woman

    पुढील बातम्या