जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घर आणि दुकानाबाहेर का लावली जाते लिंबू आणि मिरची, काय आहे यामागचे विज्ञान ?

घर आणि दुकानाबाहेर का लावली जाते लिंबू आणि मिरची, काय आहे यामागचे विज्ञान ?

घर आणि दुकानाबाहेर का लावली जाते लिंबू आणि मिरची, काय आहे यामागचे विज्ञान ?

Indian Culture, Superstition, Why Lemons And Chili Hang Outside The House, Lemon and Chili, What Is The Scientific Reason Behind Hanging Lemons And Chili Outside The House?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मे : भारतात रूढी व परंपरा जपणारा (Indian Culture) देश आहे. यातील काही प्रथांमागे काहीतरी तर्क दडलेला असतो. तर काही प्रथा मात्र फारच विचित्र आहेत. यातील अनेक प्रथा आपल्याला अंधश्रद्धा (Superstition) वाटत असतात. मात्र अशा अनेक प्रथांमागे विज्ञानही दडलेले आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी घराबाहेर किंवा दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची लटकवलेले (Why Lemons And Chili Hang Outside The House) पहिले असेल. लोकांच्या वाईट नजरांपासून संरक्षण करण्यासाठी हा उपाय केला जातो. दुकान किंवा घराबाहेर लिंबू आणि मिरची (Lemon and Chili) लावल्याने लोकांची वाईट नजर टळते असे म्हणतात. याची ताकद सर्वात जास्त असल्याचे मानले जाते. लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा माणसांच्या वाईट नजरा दूर ठेवतो असे म्हणतात. मात्र अनेकजण याला अंधश्रद्धा मानतात. आज आम्ही तुम्हाला ही केवळ अंधश्रद्धा नसून यामागे कोणते वैज्ञानिक कारण दडलेले आहे हे सांगणार आहोत. हेही वाचा…  स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना डास चावण्याचं प्रमाण जास्त का? यामागे आहे मजेशीर वैज्ञानिक कारण काय आहे यामागचे वैज्ञानिक कारण लिंबू आणि मिरच्या दुकानाच्या बाहेर किंवा अशा कोणत्याही ठिकाणी लटकवले जातात जिथे लोकांना इतर लोकांची वाईट नजर पडू नये असे वाटते (What Is The Scientific Reason Behind Hanging Lemons And Chili Outside The House?). यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे, जेव्हा अशा कोणत्याही जागी लिंबू लटकावले जाते. तेव्हा त्या लिंबाकडे पाहून मनात आंबट सदृश्य भावना निर्माण होतात आणि त्यामुळे लोकांना त्या दिशेने जास्तवेळ पाहावेसे वाटत नाही. याशिवाय आणखी एक वैज्ञानिक सिद्धांत याचे समर्थन करतो. विज्ञानानुसार, लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा खूप तीव्र गंध सोडत असतो. त्यामुळे लिंबू-मिरची दारावर लावल्याने माश्या आणि डास घरात येत नाहीत. हेही वाचा…  नॅचरल पद्धतीनं बॉडी डिटॉक्स करण्याची ही आहे सर्वात सोपी पद्धत; जाणून घ्या फायदे याबद्दल वास्तूशास्त्र काय म्हणते दारावर लिंबू आणि मिरची लावण्यास वास्तुशास्त्रही आधार देते. यानुसार लिंबू आणि मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म आहेत, ते दारावर लावल्याने वातावरण शुद्ध राहते. लिंबू मिरची दारावर लटकवल्यास घरात नकारात्मकता येत नाही. मात्र सकारात्मक भावना घरात टिकून राहते. त्यामुळे वास्तूशास्त्रामध्ये घराबाहेर लिंबाची झाडे लावण्याचा सल्ला दिला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात