जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना डास चावण्याचं प्रमाण जास्त का? यामागे आहे मजेशीर वैज्ञानिक कारण

स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना डास चावण्याचं प्रमाण जास्त का? यामागे आहे मजेशीर वैज्ञानिक कारण

स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना डास चावण्याचं प्रमाण जास्त का? यामागे आहे मजेशीर वैज्ञानिक कारण

नुकतंच एका संशोधनातून असं समोर आलं आहे, की डास स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त चावतात. हे काही चमत्कारामुळे घडत नाही. तसंच त्यामागे कोणतंही रहस्य नाही, तर यामागे वैज्ञानिक कारण आहे.

    नवी दिल्ली 28 मे : जगात अनेक प्रकारचे जीव राहतात. काही जंगलात, तर काही माणसांसोबत राहतात. त्यातले काही जीव खूप मोठे आहेत आणि काही खूप लहान आहेत. डासांची (Mosquito) गणना या लहान जीवांमध्ये केली जाते. उन्हाळ्यात डास जास्त चावतात. नुकतंच एका संशोधनातून असं समोर आलं आहे, की डास स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त चावतात. हे काही चमत्कारामुळे घडत नाही. तसंच त्यामागे कोणतंही रहस्य नाही, तर यामागे वैज्ञानिक कारण (Scientific Reason) आहे. Anemia Symptoms: लोहाच्या कमतरतेमुळे होतो अ‍ॅनिमिया, जिवालाही निर्माण होऊ शकतो धोका! काय असतात लक्षणं? तुम्हाला वाटत असेल, की स्त्रियांचं रक्त (Women Blood) गोड नसतं किंवा पुरुषांचं रक्त (Men Blood) जास्त गोड असतं, त्यामुळे पुरुषांना मच्छर जास्त चावतात, तर तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. डास माणसांना उगाच चावत नाहीत. पुरुषांचं रक्त स्वादिष्ट असतं किंवा स्त्रियांच्या रक्ताला चव नसते, असं काही नाहीये. शिवाय डासांचं पुरुषांशी कसलं वैरदेखील नाही. यामागे एक खास कारण आहे आणि आज आम्ही तुम्हाला हेच कारण सांगणार आहोत. हे आहे मजेदार कारण संशोधन असं सांगतं, की स्त्रियांच्या तुलनेत डास पुरुषांना जास्त चावतात. असं का होतं, हे जाणून घेऊ या. खरं तर डास अशा व्यक्तींना जास्त चावतात, ज्यांचं शरीर जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करतं. श्वासोच्छ्वास आणि घामामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइडकडे (Carbon dioxide) डास आकर्षित होतात. याच वेळी त्यांना लॅक्टिक अॅसिड (Lactic acid) आणि ऑक्टॅनॉल हे घटकदेखील आकर्षित करतात. पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक स्वच्छ असतात. घामाने (Sweat) भिजलेले पुरुष आंघोळ न करता तसेच आराम करतात, अशी बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. घाम त्यांच्या शरीरावरच सुकतो. त्यामुळे त्या घामाचा वास डासांना पुरुषांकडे आकर्षित करतो आणि ते डास त्या पुरुषांना चावतात. Milk store tips: दूध नेहमी अशा भांड्यामध्ये ठेवायचं; उन्हाळा असला तरी खराब नाही होणार फक्त मादी डासच माणसाला चावते डासांशी संबंधित आणखी एक मनोरंजक तथ्य आहे. ते म्हणजे माणसाला फक्त मादी डासच (Female Mosquito) चावतात. नर डास कधीच कुणाला चावत नाहीत. विशेष म्हणजे मादी डास जेव्हा गर्भवती असते, तेव्हाच ती माणसाला चावते. अन्यथा चावत नाही. आपण शरीरातून कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो, त्याला एक विशिष्ट प्रकारचा गंध, वास असतो. मादी डास हा वास घेते आणि माणसाच्या जवळ पोहोचते आणि मग ती त्यांना चावते. मादी डास आपल्या गर्भातली अंडी वाढवण्यासाठी मानवी शरीराच्या रक्तातून प्रोटीन घेते. या प्रोटीनमुळे अंडी लवकर विकसित होतात. म्हणजेच, एखादा डास तुम्हाला चावत असेल, तर ती गर्भवती मादी डास आहे, असं समजून जा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: health
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात