Home /News /lifestyle /

नॅचरल पद्धतीनं बॉडी डिटॉक्स करण्याची ही आहे सर्वात सोपी पद्धत; जाणून घ्या फायदे

नॅचरल पद्धतीनं बॉडी डिटॉक्स करण्याची ही आहे सर्वात सोपी पद्धत; जाणून घ्या फायदे

आपण शरीराला नियमितपणे डिटॉक्स करत राहिलो तर ते शरीराला दूषित पदार्थ, कृत्रिम रसायने, जड आहार इत्यादींपासून होणाऱ्या त्रासापासून वाचवू शकतो. मात्र, आपण नैसर्गिक पद्धतींनीच शरीर डिटॉक्स करणे आवश्यक (How to Detox Body) आहे.

    नवी दिल्ली, 28 मे : अनेक वेळा आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे असे अनेक पदार्थ शरीरात जमा होऊ लागतात जे आरोग्यासाठी विषाचे काम करतात. हे विषारी घटक शरीरातून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक असते. आपल्या शरीराची रचना अशी आहे की, हे नको असलेले घातक पदार्थ आपोआप शरीराबाहेर जातात. परंतु असे असले तरी मूत्रपिंड, पचनसंस्था, यकृत इत्यादी डिटॉक्स करणं आवश्यक आहे. हेल्थलाइनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आपण शरीराला नियमितपणे डिटॉक्स करत राहिलो तर ते शरीराला दूषित पदार्थ, कृत्रिम रसायने, जड आहार इत्यादींपासून होणाऱ्या त्रासापासून वाचवू शकतो. मात्र, आपण नैसर्गिक पद्धतींनीच शरीर डिटॉक्स करणे आवश्यक (How to Detox Body) आहे. डिटॉक्सचे फायदे नियमित डिटॉक्स केल्याने त्वचा चमकदार आणि प्रॉब्लेम फ्री होते. शरीरातील विषारी घटक काढून टाकल्यामुळे शरीरावर सूज येत नाही. त्यामुळे चयापचय गतिमान होतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. डिटॉक्सच्या मदतीने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते. किडनी, यकृत आणि पोटाचे आजार टाळण्यासाठी तुम्ही डिटॉक्सची मदत घेऊ शकता. शरीर डिटॉक्सच्या पद्धती - दारू/ अल्कोहोल घेणं बंद करा. चांगली, शांत झोप घेणे हा देखील शरीर डिटॉक्स करण्याचा एक मार्ग आहे. दिवसभर भरपूर पाणी प्या. हे एक नैसर्गिक डिटॉक्स पेय आहे. प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड) आणि साखरेचे सेवन करू नका. अधिकाधिक अँटिऑक्सिडंट अन्न जसे की फळे, भाज्या इत्यादींचे सेवन करा. हे वाचा - असे देश जिथे सेक्स वर्कर्स सरकारला देतात Tax, महिलांना मिळतात हे लाभ अधिकाधिक प्रोबायोटिक्स म्हणजे दही, टोमॅटो, केळी, कांदा, लसूण इत्यादींचे सेवन करा. कमीत कमी मीठाचे सेवन करा. अधिक कसरत करा किंवा नेहमी सक्रिय रहा. काही दिवशी उपवास करा. ताजे रस, पाणी आणि सूप इत्यादी भरपूर प्या. हे वाचा - रात्री उशिरा जेवत असल्यानं तुमचं वजन वाढतंय का? तज्ज्ञांनी सांगितली आहार पद्धती - सकाळी रिकाम्या पोटी किमान 2 ग्लास लिंबूपाणी प्या. अशा प्रकारे आपण आपल्या शरीरातील विषारी घटक नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या