Home /News /lifestyle /

Garlic Benefits : रात्री झोपताना उशीखाली जरूर ठेवा लसूण; बहुगुणी लसणाचा हा फायदा तुम्हाला माहिती नसेल

Garlic Benefits : रात्री झोपताना उशीखाली जरूर ठेवा लसूण; बहुगुणी लसणाचा हा फायदा तुम्हाला माहिती नसेल

लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो. यामुळे अनेक लोक लसणाची पाकळी (Garlic Cloves Benefits) आपल्या उशाखाली घेऊन झोपतात. उशीखाली लसणाची पाकळी उशीखाली ठेऊन झोपल्याने शांत झोप लागते.

  मुंबई, 17 जून : लसूण खाण्याच्या अनेक फायद्यांविषयी आपल्याला माहित असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का लसणाचं फक्त सेवन करण्यानेच नाही तर रात्री झोपताना उशाखाली ठेवणंही खूप फायद्याचं आहे. आहारात लसणाचा समावेश करण्यासोबत दररोज रात्री झोपताना उशीखाली लसणाची एक पाकळी जरूर ठेवा. आता याचा नेमका काय फायदा आहे, तेसुद्धा पाहुयात. पूर्वीच्याकाळी लसूण घराच्या एखाद्या कोपऱ्या ठेवला जायचा. यामुळे घरातील हवेमध्ये असलेले रोगजंतू नाहीसे व्हायचे. त्याचसोबत लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो. यामुळे अनेक लोक लसणाची पाकळी (Garlic Cloves Benefits) आपल्या उशाखाली घेऊन झोपतात. उशीखाली लसणाची पाकळी उशीखाली ठेऊन झोपल्याने शांत झोप लागते.

  Superfood : फक्त एक चमचा मध महिलांना अनेक त्रासांतून करेल मुक्त; सेवनाची योग्य पद्धत समजून घ्या

  हल्ली आपली जीवनशैली खूपच धावपळीची आणि व्यस्त झाली आहे. आपण सतत शरीराने असो किंवा मेंदूने कुठेतरी गुंतलेले असतो. अशा परीस्थितीत आपला शरीराला आणि मेंदूला शांततेची आणि आरामाची नितांत गरज असते. मात्र अनेकदा आपल्यालों अशी शांत झोप लागत नाही. मग यासाठी आपण काही घरगुती उपाय वापरतो. अन्यथा टॅब्लेट्स घेतो. पण यासाठी एक लसणाची पाकळीही पुरेशी आहे.

   लसणामध्ये झिंकचे (Garlic Is Rich In Zinc) प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही लसणाची पाकळी उशीखाली ठेवता. तेव्हा लसणाच्या पाकळीमधून येणारा सुगंध आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि आपल्या मेंदूमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. यामुळे आपल्याला शांत झोप लागते (Garlic Make Us Asleep) आणि आपला मेंदूदेखील शांत होतो.

  Health Tips: दातांमधील पोकळी त्रास देतेय? मग करा 'हे' घरगुती उपाय

  लसणाची पाकळी उशीखाली ठेवण्यासोबतच लसूण खाल्यानेदेखील तुम्हाला फायदा होतो. खूप थकल्यानंतर एखादेवेळी आपल्याला झोप लागत नाही आणि अशावेळी आपल्या शरीराला झोपेची जास्त गरज असते. तेव्हा लसणाची एक पाकळी ठेचून घ्यावी. एक ग्लास कोमट कोमट दूध आणि मध घ्यावे. यामध्ये ती ती ठेचलेली लसणाची पाकळी टाकून प्यावे. याची चव थोडी वेगळी लागते मात्र याचा तुम्हाला झोपेसाठी नक्कीच फायदा होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Garlic peel off, Health, Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या