Home /News /lifestyle /

Superfood : फक्त एक चमचा मध महिलांना अनेक त्रासांतून करेल मुक्त; सेवनाची योग्य पद्धत समजून घ्या

Superfood : फक्त एक चमचा मध महिलांना अनेक त्रासांतून करेल मुक्त; सेवनाची योग्य पद्धत समजून घ्या

महिलांनी काही गोष्टींची आधीची काळजी घेतली त्यांना अनेक संभाव्य त्रासांपासून सुटका मिळू शकते. आपल्याला सहज उपलब्ध होणारा आणि सहसा घरात असणारा एक पदार्थ म्हणजे मध (Benefits Of Honey). हा मध महिलांसाठी खूप गुणकारी असतो.

  मुंबई, 17 जून : सध्याच्या धावपळीच्या काळात तब्येतीकडे फार लक्ष देणे आपल्याला जमत नाही. त्यातही महिलांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण जास्त असते. महिला आपल्या छोट्या छोट्या त्रासांकडे फारसं लक्ष देत नाही. मात्र छोट्या छोट्या दुखण्यांवर आपण घरगुती उपाय करून अराम मिळवू शकतो आणि केवळ त्रास झाल्यानंतरच त्यावर उपचार करावा असेही काही नाही. महिलांनी काही गोष्टींची आधीची काळजी घेतली त्यांना अनेक संभाव्य त्रासांपासून सुटका मिळू शकते. आपल्याला सहज उपलब्ध होणारा आणि सहसा घरात असणारा एक पदार्थ म्हणजे मध (Benefits Of Honey). हा मध महिलांसाठी खूप गुणकारी असतो. घर, घरातील लोक आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांचे नकळत आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. अशात दररोज एक चमचा मधाचे सेवन महिलांसाठी खूप लाभदायक ठरू शकते. महिलांना मासिक पाळीच्या काळात अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. हार्मोनल चेंजेस, पोटामध्ये आणि पायात होणाऱ्या वेदना, चिंता, नैराश्य आणि अशक्तपणा असे खूप त्रास या काळात महिलांना होतात (Honey Helps To Relieve Menstrual Pain In Women). यादरम्यान गरम पाण्यामध्ये किंवा आल्याच्या चहामध्ये एक चमचा मध मिसळून घेतल्यास वेदनेपासून अराम मिळतो.

  Diet for healthy Hair: केसांसाठी वेळ देता येत नाही ना? मग या गोष्टी तरी आहारात नक्की घ्या

  स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल चेंजेस होणे सामान्य आहे. शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी असंतुलित झाल्यामुळे हे हार्मोनल चेंजेस होत असतात. यादरम्यान स्त्रियांचा मूड सतत बदलत राहतो. याचा कधी कधी त्यांना आणि त्यांच्यासोबत इतरांनाही त्रास होतो. रोज एक चमचा मधाचे सेवन केल्यास हार्मोनल संतुलन सुधारु शकते (Honey Improves Hormonal Imbalance). मधाच्या सेवनामुळे कॅन्सरपासूनही आपला बचाव होऊ शकतो. मध अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतो. त्यामुळे याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. मधाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, सर्दी, खोकला, ताप अशा त्रासांवर मध लाभदायक ठरतो.

  Health Care Tips: पायऱ्या चढताना लगेच धाप लागते? या गंभीर आजाराचा धोका असू शकतो

  मध केवळ आजार बरे करण्यासाठीच उपयुक्त आहे असे नाही. तर मधाचा वापर करून आपण त्वचेचीदेखील काळजी घेऊ शकतो. मधाचे नित्य सेवन केल्याने वयानुसार तवचेवर दिसणारे परिणाम म्हणजेच सुरकुत्या कमी होतात. या सर्व फायद्यांसाठी रोज सकाळी एखाद्या पेयांमध्ये मधाचे सेवन करणे योग्य राहील. मात्र तुम्हाला कोणताही त्रास असेल किंवा मधाची ऍलर्जी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मधाचे सेवन करा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health, Health Tips, Lifestyle, Superfood

  पुढील बातम्या