मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /40 नंतर महिला अशा जाडजुड का बरं होतात? एक्सपर्टसने सांगितले कारण आणि उपाय

40 नंतर महिला अशा जाडजुड का बरं होतात? एक्सपर्टसने सांगितले कारण आणि उपाय

पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी (Nutritionist Anjali Mukherjee) यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांचे वजन वाढण्याची कारणे सांगितली आहेत. कोणते उपाय करावेत याविषयी त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी (Nutritionist Anjali Mukherjee) यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांचे वजन वाढण्याची कारणे सांगितली आहेत. कोणते उपाय करावेत याविषयी त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी (Nutritionist Anjali Mukherjee) यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांचे वजन वाढण्याची कारणे सांगितली आहेत. कोणते उपाय करावेत याविषयी त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

नवी दिल्ली, 08 जून : वजन नियंत्रणात (Weight management) ठेवणं हे सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. मग ते पुरुषांसाठी असो वा महिलांसाठी. प्रत्येकाला काही काळानंतर निरोगी वजन राखण्यासाठी कठोर परिश्रम करावं लागतं. वजन कमी करण्याचे अनेक मार्ग असले तरी, एक गोष्ट जी नेहमी आपल्या मनात घर करून राहते ती म्हणजे आपले वजन कशामुळे वाढते. आपण निरोगी आहाराचे पालन केले, व्यायाम करत आहोत आणि चांगली जीवनशैली जगत आहोत, तरीही आपले वजन वाढत राहते. ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. महिलांच्या शरीरामध्ये अधिक गुंतागुंती असतात. कालांतराने त्यांना अनेक बदलांमधून जावं लागतं. जसजसे वय वाढत जाते, तसतसे विविध हार्मोन्स आणि मासिक पाळीत (menstruation) होणारे बदल वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात आणि गर्भधारणेनंतर इतर अनेक घटकही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांचे वजन तरुण स्त्रियांपेक्षा जास्त असते. हे असे का आहे? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी (Nutritionist Anjali Mukherjee) यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांचे वजन वाढण्याची कारणे सांगणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

.

न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांच्या मते, “40 पेक्षा जास्त वयाच्या महिलांचे वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची चयापचय क्रिया मंदावणे. अशा महिला कॅलरीज इतक्या कार्यक्षमतेने बर्न करू शकत नाहीत, जशा त्या काही वर्षांपूर्वी करत होत्या. व्यायाम करणाऱ्या स्त्रियांच्या देखील पोटाभोवती चरबी वाढलेली दिसते.

40 नंतरही महिलांनी वजन कसं नियंत्रणात ठेवायचं याविषयी पोषणतज्ज्ञांनी सांगितलेल्या काही सोप्या आणि उपयुक्त टिप्स जाणून घेऊयात.

जर तुम्हाला स्नॅक्स खायचे असेल तर बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया यांसारखे ड्रायफ्रुट्स खायला घ्या.

आपल्या शरीराला सक्रिय राहण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी भरपूर प्रथिनांची गरज असते, त्यामुळे प्रथिनांचे सेवन वाढवा.

हे वाचा - पिंपल्स, काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याचा रस आहे फायदेशीर; असा करा घरगुती उपाय

दिवसातून फक्त 30 मिनिटे व्यायाम करून तुम्ही वजन कमी करू शकता आणि ताकद आणि लवचिकता मिळवू शकता.

फायबर युक्त आहार घ्या. दिवसातून एक किंवा दोनदा आपल्या आहारात सब्ॆजा, चिया बिया किंवा इसबगोलचा समावेश करा.

हे वाचा - 20 ते 25 वर्षांच्या तरुणांनी आहारात घ्यावेत हे पदार्थ; राहाल दीर्घायुष्य निरोगी

पौष्टिकतेच्या कमतरतेशी लढण्यासाठी व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि लोह पूरक आहार घ्या.

दररोज संपूर्ण धान्य (whole grain), डाळी, ताजी फळे आणि ताज्या भाज्या खा.

किमान 8 तास चांगली झोप घ्या.

First published:

Tags: Weight, Weight loss tips