जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Parenting Tips : मुलं शाळेत जायला नकार देतायत? मुलांच्या मनातील शाळेच्या भीतीची 'ही' असू शकतात कारणं

Parenting Tips : मुलं शाळेत जायला नकार देतायत? मुलांच्या मनातील शाळेच्या भीतीची 'ही' असू शकतात कारणं

Parenting Tips : मुलं शाळेत जायला नकार देतायत? मुलांच्या मनातील शाळेच्या भीतीची 'ही' असू शकतात कारणं

मुलांना शाळेतील अॅक्टिव्हिटी, मित्र-मैत्रिणी आणि नवीन गोष्टी शिकणे आणि आव्हाने स्वीकारणे आवडते. मात्र काही मुलं अशीही असतात ज्यांना शाळेत जायला भीती वाटते. या मुलांसाठी शाळेत जाणे कधीकधी तणावाचे बनते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जुलै : जवळपास सर्व मुलांना शाळेत जायला आवडते. सकाळपासूनच अनेक मुले शाळेत जाण्यासाठी उत्सुक असतात. मुलांना शाळेतील अॅक्टिव्हिटी, मित्र-मैत्रिणी, नवीन गोष्टी शिकणे आणि आव्हाने स्वीकारणे आवडते. मात्र काही मुलं अशी असतात ज्यांना शाळेत जाण्यास भीती वाटते. या मुलांसाठी शाळेत जाणे कधीकधी तणावाचे बनते. मुलांना शाळेच्या नावाने राग येतो, डोकेदुखी, पोटदुखीची तक्रार असते. साधारणपणे 5 ते 6 वर्षांच्या वयोगटातील मुलांमध्ये शाळेत न जाण्याचा हट्ट दिसून येतो. पालकांनी मुलांची ही वृत्ती गांभीर्याने घ्यावी आणि मूल असे का करत आहे याचा शोध घ्यावा. मुले अशी नियमितपणे वागल्यास त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. मुले शाळेत न जाण्यामागील कारण जाणून घेऊया. मुलं खूप मुडी असतात. अशा परिस्थितीत शाळेत जाण्यास नकार देणे जवळजवळ सर्व मुलांसाठी सामान्य आहे. व्हेरी वेल फॅमिली नुसार, मुलांचे असे वागणे काहीतरी दाखवत असते. शाळेत इतर मुलांशी जुळवून न घेता येणे, शिक्षकांच्या बोलण्याची भीती किंवा मुलांमधील स्पर्धेची भावना यासारखी कारणे मुलांना शाळेत न जाण्यास प्रवृत्त करतात. अशा वेळी मुलांना रागावण्याऐवजी देण्याऐवजी त्यांच्याशी बोला आणि शाळेत न जाण्यामागचे कारण शोधा. पालकांपासून दूर जाण्याची भीती उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर किंवा कोणत्याही सुट्टीनंतर मुलं असंच वागतात. घरी पालकांसोबत जास्त वेळ घालवल्यामुळे मुलांना त्यांच्यापासून दूर राहायचे नसते. त्यामुळे मुले शाळेत जाण्यास नकार देतात. मुलांच्या अशा वागण्याला सेपरेशन अॅन्झायटी डिसऑर्डर म्हणतात. ज्यामुळे मुलांना त्यांच्या पालकांसोबत घरी सुरक्षित वाटते.

Monsoon Tips : पावसात भिजल्यानंतरही तुम्ही पडणार नाही आजारी; फक्त लगेच करा ‘हे’ काम

सामाजिक भीती कधीकधी मुलांना इतरांसोबत असण्याबद्दल असुरक्षित वाटते. त्यांना सोशल फोबिया असू शकतो. नवीन शिक्षक, नवीन मित्र किंवा नवीन व्हॅन ड्रायव्हर हे सर्व त्या मुलासाठी अनोळखी असतात. ज्यांच्यासोबत मुलांना असुरक्षित वाटू शकत नाही. मुलाची ही सामाजिक भीती कमी करण्यासाठी पालकांनी मुलाला नवीन लोकांशी संवाद साधण्यास आणि बोलण्यास शिकवणे आवश्यक आहे.

Women Expectations : जुने फंडे आता काम करत नाहीयेत; चाळीशी ओलांडलेल्या बायकोला असं करा इम्प्रेस

शाळेतील वाईट अनुभव मुलांना शाळेत अनेक अनुभव येतात. त्यात काही चांगले आणि काही वाईट असू शकतात. शाळेत आलेला वाईट अनुभव मुलांच्या मनात घर करून राहतो आणि त्यामुळे मुलं शाळेपासून दुरावायला लागतात. वर्गातील इतर मुलांकडून धमकावणे, शिक्षकांचे रागावणे ही अनेक कारणे आहेत जी मुलांना अस्वस्थ करू शकतात. त्यामुळे मुलांना शाळेत जाताना पोटदुखी, छातीत दुखणे आणि कोरडेपणा या समस्या जाणवतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात