जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Monsoon Tips : पावसात भिजल्यानंतरही तुम्ही पडणार नाही आजारी; फक्त लगेच करा 'हे' काम

Monsoon Tips : पावसात भिजल्यानंतरही तुम्ही पडणार नाही आजारी; फक्त लगेच करा 'हे' काम

Monsoon Tips : पावसात भिजल्यानंतरही तुम्ही पडणार नाही आजारी; फक्त लगेच करा 'हे' काम

पावसाळ्यात अनेकांना इच्छा नसतानाही भिजावे लागते. पावसात सतत भिजत राहिल्याने सर्दी, खोकला, तापाचीही समस्या वाढत जाते. मात्र आपण काही सामान्य पद्धती वापरून (Monsoon Tips) आजारी पडणे टाळू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जुलै : पावसाळ्यात हवामानात बदल होणे हे सामान्य आहे. कधी कधी अचानक पाऊस पडतो आणि वातावरण थंड होते. कधी कधी आर्द्रता आणि उन्हामुळे उष्णतेत वाढ होते. या दरम्यान पावसात भिजणेदेखील आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकते. यामुळेच बहुतांश लोक मान्सूनच्या पावसापासून दूर राहणे पसंत करतात. पण तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेऊन या पावसाळ्यात स्वतःचे रक्षण करू शकता. खरंतर पावसात भिजल्यामुळे अनेकदा लोक आजारी पडतात. याच कारणामुळे अनेकांना इच्छा असूनही पावसाचा आनंद घेता येत नाही. अशा वेळी लाख प्रयत्न करूनही पावसात भिजलो तर. त्यामुळे काही सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही स्वतःला आजारी पडण्यापासून वाचवू शकता. आज आम्ही तुम्हाला पावसात आजारी पडू नये (Monsoon Tips) यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. डोके झाकणे पावसामुळे भिजल्यानंतर तुम्ही अंग सहज पुसून कोरडे करू शकता. मात्र पावसात भिजलेले केस सुकवणे लोकांना कठीण होते. त्यामुळे तुम्हाला सर्दी होण्याचा धोका असतो. म्हणून अचानक पाऊस आल्यास सर्वप्रथम आपले डोके कशाने तरी झाकावे. त्यामुळे पावसाचे पाणी डोक्यावर राहणार नाही आणि आजारी पडण्याचा धोकाही कमी होईल.

Eating Fruits With Salt : मीठ किंवा मसाला घालून फळं खाणं योग्य की अयोग्य? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट

ओले कपडे त्वरित बदला पावसात भिजल्यानंतर जास्त वेळ ओले कपडे घालणे म्हणजे रोगाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे लवकरात लवकर ओले कपडे बदलण्याचा प्रयत्न करा. तसेच शरीरातील पाणी पूर्णपणे पुसल्यानंतर स्वच्छ आणि कोरडे कपडे घाला. त्याचबरोबर टॉवेलने डोके पूर्णपणे पुसून कोरडे करण्यास विसरू नका. अँटी-बॅक्टेरियल क्रीमची मदत घ्या पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे दाद, खरुज, खाज सुटणे यांसारख्या त्वचेच्या संसर्गालाही तुम्ही बळी पडू शकता. अशा परिस्थितीत भिजल्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी अँटी-बॅक्टेरियल क्रीमची मदत घ्या. अँटी-बॅक्टेरियल क्रीम शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरेल. गरम चहा प्या पावसात भिजल्यावर थंडी जाणवणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सर्दी आणि ताप टाळण्यासाठी गरम चहा पिण्यास विसरू नका. चहा प्यायल्याने तुमच्या शरीराचे तापमान तर सामान्य होईलच. त्याबरोबर मसाला चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठीही खूप प्रभावी ठरेल.

Hair Care Tips : केसांच्या घामामुळे टाळूला येणारी खाज त्वरित थांबवा, अशाप्रकारे करा मेथीचा वापर

पायांची काळजी घ्या काही लोक पावसात पायांची काळजी घेणे टाळतात. मात्र पावसात भिजल्यानंतर पायांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे घरी आल्यानंतर पाय चांगले धुतल्यानंतर अँटी-बॅक्टेरियल क्रीम लावायला विसरू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात