जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / खेळाडूंच्या हृदयाचे ठोके असतात सामान्य लोकांपेक्षा कमी, पाहा त्यामागचे कारण

खेळाडूंच्या हृदयाचे ठोके असतात सामान्य लोकांपेक्षा कमी, पाहा त्यामागचे कारण

खेळाडूंच्या हृदयाचे ठोके असतात सामान्य लोकांपेक्षा कमी, पाहा त्यामागचे कारण

खेळाडू आणि अॅथलीटच्या हृदयाची गती प्रती मिनिट 30 ते 40 पर्यंत पोहोचू शकते. असे मानले जाते की ऍथलीट्सचे हे कमी हार्ट रेट त्यांची प्रकृती सामन्या असल्याचे दर्शवते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 ऑक्टोबर : अॅथलीटच्या हृदयाचे ठोके सामान्य लोकांपेक्षा कमी असतात हे तुम्हाला माहिती आहे का? साधारणपणे माणसाच्या हृदयाच्या ठोक्याची गती प्रती मिनिट 60 ते 80 दरम्यान असते. परंतु काही खेळाडू आणि अॅथलीटच्याबाबात याला अपवाद असतो. खेळाडू आणि अॅथलीटच्या हृदयाची गती प्रती मिनिट 30 ते 40 पर्यंत पोहोचू शकते. असे मानले जाते की ऍथलीट्सचे हे कमी हार्ट रेट त्यांची प्रकृती सामन्या असल्याचे दर्शवते.जेव्हा एखाद्या खेळाडूला चक्कर येत नाही किंवा थकवा जाणवत नाही तेव्हा तो निरोगी मानला जातो. आता प्रश्न असा उपस्थित होतो की अॅथलीटच्या हृदयाची गती सामान्य लोकांपेक्षा कमी का असते, त्यामागील कारण काय आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला या लेखातून त्याचे उत्तर देत आहोत. चला जाणून घेऊया हृदयाचे ठोके कमी होण्याची कारणे.

खाण्या-पिण्याच्या सवयींचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

अॅथलीटसाठी सामान्य लोकांपेक्षा कमी हृदय गती असणे सामान्य मानले जाते. तरुण निरोगी ऍथलीटची हृदय गती 30 ते 40 bps असू शकते. हेल्थलाइननुसार, व्यायाम केल्याने हृदयाचे स्नायू खूप मजबूत होतात. त्यामुळे हृदय अधिक रक्त पंप करू शकते. हृदय मजबूत असल्यामुळे ते स्नायूंना अधिक ऑक्सिजन प्रवाहित करण्यास सक्षम असते. परंतु व्यायामादरम्यान अॅथलीटच्या हृदयाचे ठोके 180 ते 200 बीट्स प्रती मिनिटांपर्यंत पोहोचू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

हृदयाची ठोके कमी असण्याची कारणे फिटनेस लेव्हल : खेळाडू सामान्य लोकांपेक्षा जास्त व्यायाम करतात. व्यायामामुळे त्याचे हृदय निरोगी आणि तंदुरुस्त असते. म्हणजेच अॅथलीटच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट सामान्य लोकांपेक्षा कमी असतात. औषधांचा प्रभाव : अनेक खेळाडू तंदुरुस्त राहण्यासाठी आणि शरीर मजबूत ठेवण्यासाठी औषधांचा वापर करतात. जास्त प्रमाणात औषधे घेतल्याने हृदयाच्या गतीवरही परिणाम होतो. औषधी हृदयाची गती कमी आणि जास्त दोन्ही होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. विशेषत: बीटा ब्लॉकर्स मेडिसिन हृदयाती गती कमी करू शकते. वयाचा प्रभाव : खेळाडू लहानपणापासूनच तंदुरुस्त राहण्यासाठी कठोर परिश्रम करतात. त्यामुळे त्यांची ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता इतर लोकांपेक्षा अधिक मजबूत असते. नॉन-एथलीट व्यक्ती शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे वयाच्या आधीच कमकुवत होऊ शकते आणि त्यामुळे त्यांचे हृदय कमकुवत होऊ शकते. मधुमेह असेल तर दुधात हळद आणि या 2 गोष्टी घालून प्या, फरक तुम्हाला दिसून येईल आदर्श हृदय गती काय आहे? : प्रत्येकाच्या हृदयाची गती वेगळी असते. सामान्यत: 90 ते 126 बीट्स प्रती मिनिट ही सामान्य गती मानली जाते. तसेच अनेक ऍथलीट्समध्ये हृदया गती कमी असते आणि ती सामान्य मानली जाते. ऍथलीट्समध्ये 30 ते 40 बीपीएम हार्ट रेट सामान्य मानले जाते, परंतु व्यायामादरम्यान ते 180 ते 200 पर्यंत पोहोचू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात