नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : भारतातच नाही तर जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मधुमेहाचा थेट परिणाम शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर होतो. जर एखाद्याला मधुमेह असेल तर त्याला खाण्यापिण्याबाबत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यासोबतच आहाराबाबत नेहमीच काळजी घ्यावी लागते. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहावर कोणताही इलाज नाही. डायबिटीजच्या रुग्णांना मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांसह गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह असणाऱ्यांनी दुधामध्ये हळद घालून प्यायल्याने फायदा होतो, त्याशिवाय खाली दिलेल्या आणखी दोन गोष्टी दुधात मिसळून घेतल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. हळद-दूध मधुमेह नियंत्रित ठेवते - HealthSite माहितीनुसार, हळद अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हळद ही एक उत्तम औषधी वनस्पती आहे. हळदीमध्ये असलेले लोह, व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. हळद-दुधाशिवाय त्यामध्ये आणखी कोणत्या दोन गोष्टी मिसळल्या जाऊ शकतात, चला जाणून घेऊया. हळदीसोबत आलं - हळदीसोबतच आल्याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. जर तुम्हाला साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर दुधात हळद आणि आले उकळून ते कोमट झाल्यावर प्या. त्यामुळे मधुमेहही आटोक्यात राहून इतर आजारही होणार नाहीत.
हळदीसोबत काळी मिरी - मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी एक ग्लास दुधात अर्धा चमचा कच्ची हळद आणि काळी मिरी पावडर टाकून प्या. मधुमेहाच्या रुग्णांनी ते नियमित प्यायल्यास साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे वाचा - विविध रोगांवर रामबाण औषध आहे तुळस, जाणून घ्या फायदे मधुमेह कोणत्याही वेळी आणि कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. हा आजार कायमचा संपवता येत नाही, पण दुधात हळद टाकून या दोन गोष्टी प्यायल्या तर नक्कीच आटोक्यात ठेवता येतो.