जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / खाण्या-पिण्याच्या सवयींचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

खाण्या-पिण्याच्या सवयींचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

eating habits

eating habits

आजकालच्या बदलत्या आणि धकाधकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना आपल्या आहाराकडे फार चांगलं लक्ष देता येत नाही. परिणामी, मानसिक त्रासामध्ये वाढ होते. विशेषत: तरुणांमध्ये हे प्रमाण लक्षणीय आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 30 ऑक्टोबर : आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या मानसिक आरोग्यावर विविध गोष्टींचा परिणाम होत असतो. यामध्ये आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींचाही समावेश होतो. सकस आहारामुळे आपलं मानसिक आरोग्य सुधारू शकतं हे गेल्या काही वर्षांत झालेल्या अनेक संशोधनांमधून सिद्ध झालं आहे. पण, आजकालच्या बदलत्या आणि धकाधकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना आपल्या आहाराकडे फार चांगलं लक्ष देता येत नाही. परिणामी, मानसिक त्रासामध्ये वाढ होते. विशेषत: तरुणांमध्ये हे प्रमाण लक्षणीय आहे. न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार, " परिपूर्ण अन्नपदार्थ आणि प्रक्रिया केलेलं जंक फूड यांचं योग्य संतुलन असलेल्या आहाराचा एकत्रितपणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो." आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करून खाण्याच्या माध्यमातून आपण आपला मूड कसा सुधारू शकतो, यासाठी अंजली मुखर्जी यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हेही वाचा - मधुमेह असेल तर दुधात हळद आणि या 2 गोष्टी घालून प्या, फरक तुम्हाला दिसून येईल आहारतज्ज्ञांच्या मते, हेल्दी फॅटी अ‍ॅसिड्स आपला मूड सुधारण्यास मदत करतात. सालमन, सार्डिन या माशांमध्ये आणि अक्रोडामध्ये मुबलक प्रमाणात हेल्दी फॅटी अ‍ॅसिड्स आढळतात. त्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. या शिवाय, मुख्यतः मासे, केळी, ड्रायफ्रुट्स आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या मॅग्नेशियममुळे आपल्या शरीरात सेरोटोनिन हॉर्मोन तयार होण्यास मदत होते. परिणामी, आपला मूड स्थिर राहतो. व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉलिक अ‍ॅसिडचं योग्य सेवन केल्याने मनस्थिती शांत होऊन स्थिर होते. म्हणून हे घटक असलेले अन्नपदार्थ आहारामध्ये घेतले पाहिजेत. तळलेले अन्नपदार्थ इतर अन्नपदार्थांच्या पचनाची प्रक्रिया रोखतात. ज्यामुळे मानसिक सतर्कता कमी होऊन डिप्रेशनमध्ये वाढ होते. अनेकजण कामाचा किंवा नातेसंबंधांमधील ताण कमी करण्यासाठी अल्कोहोलचं सेवन करतात. मात्र, याचा तुमच्या मूडवर वाईट परिणाम होऊन आणि नैराश्य येऊ शकतं. त्यामुळे डॉक्टर शक्य तितक्या लवकर अल्कोहोलची सवय सोडण्याचा सल्ला देतात.

    News18लोकमत
    News18लोकमत

    आहाराव्यतिरिक्त, तुमच्या दिनचर्येमध्ये काही बदल केल्यासही मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत होऊ शकते. आशावादी मानसिकता, झोप आणि कामाचे योग्य नियोजन केल्यास मनस्थिती सुधारण्यास मदत होते. दररोज व्यायाम केल्यानं एंडोर्फिन हॉर्मोन तयार होऊन तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होते. या शिवाय, मेलॅटोनिन या हॉर्मोनमुळे उदासीनता टाळण्यास मदत होते. जेव्हा आपलं शरीर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतं तेव्हा मेलॅटोनिनची निर्मिती होते. म्हणून काही काळ सकाळच्या कोवळ्या उन्हात बसलं पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. वरील गोष्टींचे आपल्या मानसिक आरोग्यावर चांगले-वाईट परिणाम होतात. त्यामुळे आपल्या दिनचर्येमध्ये त्यांचा योग्य समन्वय साधला पाहिजे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात