मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'कोरोनाव्हायरस वुहानच्या लॅबमधून नाही पण...'; चीनला गेलेल्या WHO च्या टीमचा मोठा खुलासा

'कोरोनाव्हायरस वुहानच्या लॅबमधून नाही पण...'; चीनला गेलेल्या WHO च्या टीमचा मोठा खुलासा

चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा (China coronavirus) शोध घेण्यासाठी गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) टीमनं काही दावे केले आहेत.

चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा (China coronavirus) शोध घेण्यासाठी गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) टीमनं काही दावे केले आहेत.

चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा (China coronavirus) शोध घेण्यासाठी गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) टीमनं काही दावे केले आहेत.

बीजिंग, 12 मार्च: जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रसाराचा उगम चीनमधून झाला, हे खरं आहे; मात्र चीनमधल्या वुहान इथल्या प्रयोगशाळेत (Wuhan Laboratory) झालेल्या (किंवा घडवून आणलेल्या) अपघातातून त्याचा प्रसार झाला, असा जो समज पसरलेला आहे, तो चुकीचा आहे. तसं काही घडल्याचं सिद्ध होण्यासारखे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असं चीनमध्ये कोरोनाचा तपास करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) टीमने सांगितलं. चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा तपास करण्यासाठी गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या टीममध्ये असलेल्या मॅरिऑन कूपमन्स (Marion Koopmans) यांनी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली. चाथम हाउस या थिंक टँकने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कोरोना महामारीची सुरुवात नेमकी कशी झाली असावी, याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांच्या या टीमने शोधकार्य केलं. त्यात, वुहानमधल्या प्रयोगशाळेत अपघात (Wuhan Laboratory Accident) होऊन त्यातून कोरोना पसरल्याच्या समजासह अन्य अनेक शक्यता गृहीत धरून शोधकार्य करण्यात आलं. 'मात्र तशा काही अपघातातून कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता अगदीच नगण्य आहे,' असं कूपमन्स यांनी स्पष्ट केलं. मानवात आलेला एखादा विषाणू (Virus) प्राण्यांमधून आला असेल, तर त्याचा नेमका माग घेण्यासाठी बराच कालावधी लागतो. उदा. एबोला विषाणूची लागण मानवात पहिल्यांदा 1976 साली आढळली आणि तो विषाणू वटवाघळांमधून (Bat) माणसात आल्याचं मानलं जातं; मात्र आजपर्यंत कधीही वटवाघळांमध्ये तो विषाणू जिवंत स्वरूपात कधीही सापडलेला नाही. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचं नेमकं उगमस्थान शोधण्यासाठी काही वर्षांचा कालावधी जावा लागणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे वाचा - देशात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुण्यात; कडक निर्बंधांनंतर धक्कादायक आकडेवारी समोर कूपमन्स यांनी सांगितलं, 'वुहानमधल्या ह्युएनान मार्केटमध्ये पहिल्यांदा मानवी रुग्ण आढळले. त्या ठिकाणच्या तीन प्रयोगशाळांना शास्त्रज्ञांच्या चमूने भेट दिली. त्यांच्या कार्यक्रमांची, संशोधनाची, प्रोटोकॉल्सची कसून पाहणी केली. तसंच, फ्रोझन सीफूडमधून विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता गृहीत धरून त्या प्रयोगशाळांतल्या जेनेटिक सिक्वेन्सिंग डेटाचीही तपासणी करण्यात आली.' 'फ्रोझन सीफूडमधून (Frozen Seafood) कोरोनाचा प्रसार झाल्याची थिअरी बहुतांश शास्त्रज्ञांनी फेटाळून लावली आहे; आम्ही तशी शक्यता पूर्णतः फेटाळून लावत नाही; मात्र अख्ख्या जगात थैमान घातलेल्या विषाणूच्या प्रसाराचं अगदी नेमकं कारण ठरवणं अत्यंत अवघड आहे,' असं त्यांनी सांगितलं. त्या चमूचे दुसरे एक सदस्य पीटर डास्झॅक यांनी सांगितलं, की येत्या काही वर्षांत आम्ही कोरोनाचं (Corona Virus) उगमस्थान नक्की शोधून काढू. कोरोनाचं वहन करणाऱ्या प्रण्यांमधून वुहानमधल्या माणसांना पहिल्यांदा कोरोनाची लागण कशी झाली, हे नेमकेपणाने शोधणं कदाचित शास्त्रज्ञांच्या एकत्रित संशोधनातून शक्य होऊ शकेल, असं ते म्हणाले. हे वाचा - पुण्यात लॉकडाऊनची गरज आहे का? टाटा आणि प्रयास यांनी अहवालातून मांडली स्थिती वुहानकडून दक्षिण चीनमधल्या प्रांतांमध्ये नाला जातो. त्या ठिकाणी कोरोना विषाणूचे सर्वांत जवळचे प्रकार वटवाघळांमध्ये आढळतात, असंही डॅस्झॅक यांनी सांगितलं. इकोहेल्थ अलायन्स या न्यूयॉर्कमधल्या एका गटाचे ते अध्यक्ष आहेत. वन्यजीवांमधून कोविड-19 माणसांमध्ये आला असावा, हे सर्वांत जास्त पटणारं स्पष्टीकरण असू शकतं. तसंच त्याला जागतिक आरोग्य संघटना आणि चीन या दोन्ही बाजूंकडून समर्थनही मिळालं आहे. येत्या काही वर्षांत ते उगमस्थान आणि मानवात त्याचा प्रसार होण्याची क्रिया याचा शोध शास्त्रज्ञांना लागू शकेल, असा विश्वास डॅस्झॅक यांनी व्यक्त केला. डॅस्झॅक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वुहान दौऱ्यानंतर काढलेल्या प्राथमिक निष्कर्षांबद्दलचा अहवाल पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध केला जाणार आहे. हे वाचा -  Maharashtra Lockdown latest: महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकानंतर निर्बंध कडक; 15 मुद्द्यांत समजून घ्या लॉकडाउनविषयी सर्व काही कोरोनाच्या शोधाच्या शास्त्रीय मोहिमेत दुर्दैवाने राजकारण शिरल्याबद्दल डॅस्झॅक यांनी खेद व्यक्त केला. जागतिक आरोग्य संघटना चीनला मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेकांनी केला होता. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांची मोहीम अनेक महिने लांबली. तसंच, अन्य कार्यक्रमांप्रमाणेच या संशोधन कार्यक्रमालाही चीनची मंजुरी मिळणं आवश्यक होतं.
First published:

Tags: Corona hotspot, Coronavirus, Covid19, Fight covid, Who, Wild life

पुढील बातम्या