मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Health Tips : जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम

Health Tips : जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम

जेव्हा आपली पचनसंस्था अन्नाचे नीट विघटन करू शकत नाही. तेव्हा पचनाच्या समस्या उद्भवतात. मग पुरेसे अन्न खाऊनही आपल्याला पुरेसे पोषण मिळत नाही. आपल्या काही सवयी आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात.

जेव्हा आपली पचनसंस्था अन्नाचे नीट विघटन करू शकत नाही. तेव्हा पचनाच्या समस्या उद्भवतात. मग पुरेसे अन्न खाऊनही आपल्याला पुरेसे पोषण मिळत नाही. आपल्या काही सवयी आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात.

जेव्हा आपली पचनसंस्था अन्नाचे नीट विघटन करू शकत नाही. तेव्हा पचनाच्या समस्या उद्भवतात. मग पुरेसे अन्न खाऊनही आपल्याला पुरेसे पोषण मिळत नाही. आपल्या काही सवयी आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 सप्टेंबर : योग्य पचन हे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही जे खाता त्याचे तुम्ही नेहमी निरीक्षण केले पाहिजे. तसेच तुम्ही तुमच्या पोटाला फक्त आवश्यक आणि पौष्टिक गोष्टी देत असल्याची खात्री करा. जेव्हा आपली पचनसंस्था अन्नाचे नीट विघटन करू शकत नाही. तेव्हा पचनाच्या समस्या उद्भवतात. मग पुरेसे अन्न खाऊनही आपल्याला पुरेसे पोषण मिळत नाही. आपल्या काही सवयी आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात.

बऱ्याच लोकांना दिवसातून अनेकवेळा आंघोळ करण्याची सवय असते. त्यामुळे ते केव्हाही अंघोळ करू शकतात त्यात काही गैर नाही. पण काही अशाही परिस्थिती असतात जेव्हा अंघोळ करणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अशीच एक परिस्थिती म्हणजे जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे. बरीच जणांना हा प्रश्नही पडतो की, जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

केसांपासून पायाच्या तळव्यापर्यंत कापूर तेलाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर

जेवणानंतर लगेच अंघोळ करण्याचे दुष्परिणाम

पचनसंस्थेवर परिणाम

आपण जेवल्यानंतर अन्न पचवण्यासाठी आपली पचनसंस्था सर्वात जास्त महत्वाची असते. पोटात अन्न असलेल्या अवस्थेत जर आपण अंघोळ केली तर अन्न व्यवस्थित पचत नाही. संपूर्ण शरीर ओले झाले की शरीर थंड होते आणि थंड शरीराचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामुळे आपल्याला वजन वाढीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

रक्ताभिसरणात अडचण

E Times मध्ये दिलेल्या माहितीनुसार, आयुर्वेदिक डॉक्टर रेखा राधामोनी यांच्या मते, जेव्हा कोणी अन्न खाल्ल्यानंतर आंघोळ करते तेव्हा रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. वैद्यकीय विज्ञानदेखील आयुर्वेदाशी सहमत आहे. त्यानुसार, जेवणानंतर लगेच अंघोळ केल्याने रक्त परिसंचरण वळवले जाते ज्यामुळे शरीराचे तापमान अचानक असंतुलित होते आणि पचन मंदावते.

थकवा जाणवणे

पचनक्रिया मंदावल्याने शरीराच्या काही भागांमध्ये गॅस तयार होतो. शिवाय पोटात अन्न असल्याने थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. शिवाय अन्न पोटात गेल्याने आपण कोणतेही काम नीट करू शकत नाही.

हात भाजल्यावर अनेकजण या चुका करतात; जखम त्यामुळं लवकर बरी नाही होत

जेवणानंतर किती तासांनी करावी अंघोळ

तज्ज्ञांचे असे मत आहे की, जेवल्यानंतर किमान 2-3 तासांनी अंघोळ करणे चांगले. त्याचबरोबर आंघोळ केल्यावर जेवण केले तर जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका. यामुळेही पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होते आणि हे तुमच्या आरोग्यांसाठी घातक ठरू शकते.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle