Home /News /lifestyle /

रंगामुळे वाढते पॉझिटिव्हिटी; कुठल्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे घालाल?

रंगामुळे वाढते पॉझिटिव्हिटी; कुठल्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे घालाल?

रंगामुळे व्यक्तिमत्त्व उठून दिसतं. रंगाचा प्रभाव व्यक्तीवर कळत-नकळत पडत असतो. कुठल्या दिवशी कुठल्या रंगाला महत्त्व हे जाणून घेतलं पाहिजे.

दिल्ली, 14 मे: एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याच्या बोलणं, चालणं आणि वागण्यावरून समजतं. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती कोणत्या रंगाचे कपडे, वस्तू वापरते यावरूनही त्याच्या व्यक्तिमत्वाचा (Personality) अंदाज घेता येतो. रोज आपण चांगले कपडे घालून घराबाहेर पडतो. यावेळी कपडे मॅचिंग आहेत ना याकडेही नीट लक्ष देतो. ड्रेसिंग सेन्सचा (Dressing Sense) विचार करता कपड्याच्या रंगाचा आपल्या जीवनाशी, व्यक्तिमत्वाशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे कपडे खरेदी करताना रंगाचा (Colour) विचार करणं आवश्यक आहे. रंग आणि आठवड्यातला प्रत्येक दिवस (Day) यांचं सखोल असं शास्त्र आहे. त्यामुळे दिवसानुसार योग्य रंगाचे कपडे परिधान करणं फायदेशीर ठरतं. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे. कपड्यांच्या रंगाचा (Colour Of Clothes) आपल्या जीवनाशी निकटचा संबंध असतो. वेगवेगळे रंग हे आपल्या मनावर परिणाम करत असतात. काही रंगांमुळे मनःशांती मिळते तर काही रंग ऊर्जादायी असतात. काही रंग मनाला जडपणा आणतात तर काही रंग मनाला आनंद देतात. साहजिकच या गोष्टींचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. त्यामुळे दिवसानुसार योग्य रंगाच्या कपड्याची निवड करणं आवश्यक आहे. सण-समारंभ, वाढदिवसानिमित्ताने आपण नवे कपडे खरेदी करतो. मात्र नवे कपडे शुक्रवारी परिधान करणं अतिशुभ मानलं गेलं आहे. याशिवाय तुम्ही बुधवारी किंवा गुरुवारी नवे कपडे परिधान करू शकता. नवे कपडे परिधान करण्यासाठी सोमवार हा मध्यम शुभ असतो. मंगळवारी आणि रविवारी नवे कपडे परिधान करू नयेत, तसेच खरेदी देखील करू नयेत. रविवार: रविवारी (Sunday) क्रिम कलरचे कपडे परिधान करणं सर्वोत्तम मानलं जातं. गरजेनुसार तुम्ही यासोबत गुलाबी, सोनेरी, हलका नारिंगी या रंगांचा कपडे कॉम्बिनेशन म्हणून वापरू शकता. मात्र यादिवशी निळ्या, काळ्या, राखाडी आणि तपकिरी रंगाचे कपडे परिधान करू नयेत. सोमवार (Monday): सोमवारी तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू शकतो. या दिवशी फिकट रंगाचे कपडे प्राधान्यानं वापरावेत. काळे आणि लालसर रंगाचे कपडे वापरणं टाळावं. मंगळवार (Tuesday) : या दिवशी तुम्ही लाल शेडचे कपडे परिधान केले तर तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक खुलेल. गुलाबी, लाल रंगाशी निगडीत कोणत्याही शेडचे कपडे तुम्ही यादिवशी परिधान करू शकता. लाल शेड व्यतिरिक्त क्रिम आणि लिंबासारख्या पिवळ्या रंगाचे कपडे ही निवडू शकता. मात्र या दिवशी गडद हिरव्या रंगाचे कपडे वापरू नये. बुधवार (Wednesday) : स्पोर्टी लूक असलेले हिरवे कपडे या दिवशी परिधान करणं योग्य ठरतं. यादिवशी सकाळी तुम्ही जर जॉगिंग किंवा खेळायला जात असाल तर ग्रीन ट्रॅक सूट वापरावा. ऑफिसला जाताना पिस्ता किंवा फिकट हिरव्या कलरचे कपडे परिधान करू शकता. यासोबत कॉम्बिनेशन म्हणून फिकट हिरवा किंवा काळ्या रंगाच्या कपड्याची निवड करता येऊ शकते. या दिवशी काळ्या रंगाची पॅंट, जीन्स वापरू नये. गुरुवार (Thursday) : या दिवशी तुम्ही केशरी कलरचे कपडे निवडू शकता. तसेच पिवळ्या रंगाचे कपडेही तुम्हाला सूट होतील. या रंगाला कॉम्बिनेशन म्हणून क्रिम, पांढरा किंवा गुलाबी रंगाचे कपडे निवडू शकता. गुरुवारी सर्वसामान्यपणे तुमचा पोशाख संस्कारी असावा. शुक्रवार (Friday) : शुक्रवारी पार्टी वेअर कपड्यांना अधिक महत्त्व द्यावं. कारण या दिवसाचा स्वामी शुक्र असतो. त्यामुळे थोडे स्टायलिश कपडे वापरले तरी चालू शकतात. गडद रंगाच्या सर्व शेड, काळे, निळे, फिकट हिरव्या रंगाचे कपडे तुम्ही यादिवशी परिधान करू शकता. मात्र शुक्रवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणं टाळावं. शनिवार (Saturday) : निळा, काळा, राखाडी आणि हिरव्या रंगाचे कपडे तुम्ही शनिवारी परिधान करू शकता. चौकोन असलेले किंवा पट्टेदार कपडेही या दिवशी घातले तरी चालतात. मात्र लाल रंगाचे आणि लाल-काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेले कपडे शनिवारी परिधान करणं टाळावं.
First published:

Tags: Astrology and horoscope, Skin color

पुढील बातम्या