Home /News /news /

Numerology : अंकशास्त्रानुसार या क्षेत्रातील व्यक्तींसाठी लकी आहे आजचा दिवस; पाहा तुमचं क्षेत्र आहे का

Numerology : अंकशास्त्रानुसार या क्षेत्रातील व्यक्तींसाठी लकी आहे आजचा दिवस; पाहा तुमचं क्षेत्र आहे का

Numerology

Numerology

Numerology 13 May 2022 : तुमच्या जन्मतारखेनुसार आणि क्षेत्रानुसार तुमच्यासाठी आजचा दिवस लकी आहे का पाहा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 13 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजच्या दिवसाची सुरुवात गुरुमंत्राच्या जपाने करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल. आज भरपूर आत्मविश्वास बाळगा. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत पार पडतील. प्रवास यशस्वी होण्याची शक्यता भरपूर आहे. बांधकाम, शेती, पुस्तकं, औषधं आणि फायनान्स क्षेत्रातल्या व्यक्तींना आज फायदा होईल. विद्यार्थ्यांना शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून शाबासकी मिळेल. शुभ रंग : केशरी (Orange) शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 3 दान : कृपया भिक्षुकांना संत्री दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कामाच्या ठिकाणी तुमच्या संकल्पनांबाबत वरिष्ठांशी चर्चा होईल, त्यामुळे मीटिंग्ज टाळू नका. कायदेशीर चर्चा सुरळीतपणे पार पडतील. एखादी व्यक्ती तुमचा अपमान करू शकेल, तेव्हा सांभाळून राहा. महिलांनी फॅमिली फ्रेंड्सचं म्हणणं ऐकून घ्यावं. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी जुने कॉन्टॅक्ट वापरणं आज फायद्याचं ठरेल. एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यवसायातल्या व्यक्ती आणि राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. शुभ रंग : आकाशी निळा (Sky Blue) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरामध्ये तेल किंवा दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) खेळाडू आणि राजकीय नेते यांच्यासाठी आजचा दिवस अगदी भरभराटीचा आहे. तुमची कौशल्यं, हुशारी दाखवून देण्याची आज उत्तम संधी चालून येईल. तुमचं संभाषण कौशल्य आणि माहिती यामुळे लोकांवर चांगली छाप पडेल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आज केलेल्या गुंतवणुकीचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. संगीत आणि लेखन क्षेत्रातल्या व्यक्तींचे आज घेतलेले सर्व निर्णय फायद्याचे ठरतील. प्रेमात असलेले आपल्या मनातल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकतात. सरकारी नोकरदारांना आजचा दिवस लकी आहे. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी कपाळावर चंदनाचा टिळा लावा. तसंच, दिवसभरात आपल्या गुरूचं नाव जपत राहा. शुभ रंग : केशरी (Orange) शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : एखाद्या महिला मदतनीसाला केशर दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज वेळेचं अगदी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. आज केलेल्या कामाचं फळ भविष्यात मिळेल. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज प्रवास करणं टाळावं. बांधकाम आणि शेअर मार्केट व्यवसाय धीमा होऊ शकतो; मात्र मेडिकल आणि शेती व्यवसायामध्ये फायदा होईल. विद्यार्थ्यांनी आपली स्ट्रॅटेजी कागदावर लिहून काढणं उत्तम. यामुळे भविष्यातलं लक्ष्य निश्चित करण्यात मदत होईल. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींचं टार्गेट पूर्ण होईल. आज मांसाहार टाळल्यास उत्तम. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : कृपया न विसरता भिक्षुकाला चादर दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज आनंदी मूडमध्ये तुमच्या कामावर फोकस करा, ज्यामुळे तुम्हाला यश मिळणं सोपं जाईल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. तसंच त्याचा फायदाही दिसून येईल. एखादा मित्र वा नातेवाईक मदत मागेल, ती टाळू नका. बँक क्षेत्राशी निगडीत व्यक्तींसाठी आजचा दिवस लकी आहे. क्रीडा आणि सेल्स क्षेत्रातल्या व्यक्तींनी आपला वेग जास्त ठेवणं फायद्याचं आहे. विद्यार्थ्यांचंही नशीब आज जोरावर असणार आहे. शुभ रंग : समुद्री हिरवा (Sea Green) शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया हिरव्या पालेभाज्या दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घर आणि शेअर्स विकत घेण्यासाठी, तसंच महागड्या वस्तूंवर खर्च करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रवास आणि दानधर्म करण्यासाठी, टूर्नामेंट खेळण्यासाठी, ऑडिशन देण्यासाठी, प्रेझेंटेशन देण्यासाठी, चित्रपट साइन करण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी आजचा दिवस अगदीच योग्य आहे. आज मुलांसोबत वेळ व्यतीत कराल. व्हिसा येण्यासाठी वाट पाहत असाल, तर आज त्या संदर्भात चांगली बातमी मिळू शकते. नवीन फॅक्टरी सुरू करण्यासाठी जागा शोधत असाल, तर आज चांगलं लोकेशन मिळेल. अभिनेते आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना आज भरपूर यश मिळेल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या मनातली गुंतागुंत कमी होऊन भविष्याबद्दल स्पष्टता मिळेल. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत तुमची हुशारी कामी येईल. खेळ आणि शिक्षणात तुमच्या यशासाठी वरिष्ठांचे आशिर्वाद मिळतील. तुमचे नातेसंबंध अधिक चांगले होतील. तसंच भिन्नलिंगी व्यक्ती तुमच्यासाठी लकी ठरेल. आज गुरुमंत्राचा जप करणं फायद्याचं आहे. आज वाणी मृदू ठेवा. आजचा दिवस राजकीय व्यक्तींसाठी अतिशय फायद्याचा आहे. आज सभा घेण्यासाठी आणि पक्षातल्या वरिष्ठांवर छाप पाडण्यासाठी उत्तम दिवस आहे. शुभ रंग : केशरी (Orange) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरामध्ये कुंकू दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पैशांसंबंधी मोठे निर्णय घेताना आशावादी राहा. यश मिळवण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्याची गरज आहे. तुमच्या चांगल्या अशा ब्रँड इमेजमुळे तुम्हाला दिवसाच्या शेवटी चांगली बक्षीस मिळेल. ज्ञानार्जनासाठी आज वेळ व्यतीत कराल. डॉक्टर्सची एखाद्या सेमिनारमध्ये भरपूर प्रशंसा होऊ शकते. त्यामुळे असे सेमिनार टाळू नका. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना संध्याकाळपर्यंत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : समुद्री निळा (Sea Blue) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया भिक्षुकांना लिंबूवर्गीय फळं दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आपल्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करा. सरकारी ऑर्डर मिळवण्यासाठी आज चांगला दिवस आहे. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसंबंधी प्रकरणं पुढे न्यावीत. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू आणि हॉटेल व्यवसायातल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अगदी उत्तम आहे. शुभ रंग : लाल आणि केशरी शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया घरातील नोकरांना किंवा भिक्षुकांना डाळिंब दान करा. 13 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : श्री श्री रवीशंकर, असदुद्दीन ओवैसी, झरीन खान, बेन्नी दयाल, फखरुद्दीन अली अहमद
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या