नवी दिल्ली, 13 मे : आपण जे काही खातो त्याचा प्रभाव आपल्या त्वचेवर आणि केसांवर दिसत असतो. आपण आतून निरोगी असू तर केस आणि त्वचा देखील सुंदर आणि निरोगी दिसते. आपण लाइफस्टाइलमध्ये वनस्पती-आधारित आहाराचा समावेश केला तर आतून आणि बाहेरून निरोगी बनवण्यास मदत होते.
सायन्स डायरेक्टच्या मते, वनस्पती-आधारित अन्नामध्ये बायोएक्टिव्ह घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, बीटा कॅरोटीन, पॉलिफेनॉल आणि फेनोलिक ऍसिडचा समावेश आहे, जे ऑक्सिडंट संरक्षण, जळजळ आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात. जाणून घेऊया कोणत्या वनस्पती-आधारित आहारामुळे त्वचा सुधारण्यास (Plant Based Foods For Skin) मदत होते.
हे वनस्पती आधारित पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर असतात -
ओट्स -
ओट्समध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेवरील वृद्धत्वाच्या चिन्हे कमी करण्यासाठी काम करतात आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास देखील मदत करतात.
सूर्यफूल बिया -
सूर्यफुलाच्या बियांना अँटिऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस म्हटले जाऊ शकते. यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे केवळ सुरकुत्या कमी होत नाहीत तर त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.
अॅवोकॅडो -
हेल्दी फॅट, व्हिटॅमिन ई एवोकॅडोमध्ये मुबलक प्रमाणात आढळते, ते त्वचेला मऊ आणि पोषण देण्याचे काम करते. हे तुमच्या त्वचेला उन्हामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासही मदत करू शकते. त्यात उपलब्ध असलेले आवश्यक फॅटी अॅसिड्स त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणेही कमी करतात.
संत्री -
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे चेहरा अकाली वृद्ध दिसत नाही. याशिवाय संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवतात आणि त्यांना चमकदार आणि निरोगी ठेवतात.
हे वाचा -
जांभूळ खाऊन बिया फेकू नका; रक्तातील साखर नियंत्रणावर असा होतो उपयोग
अक्रोड -
अक्रोड खाल्ल्याने त्वचेचे पोषण होते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक टिकून राहते. या व्यतिरिक्त यात अँटी-इंफ्लेमेटरी अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि प्रोटीन्ससारखे पोषक घटक असतात, जे मुरुमे घालवण्यासाठीदेखील प्रभावी आहेत.
टोमॅटो -
टोमॅटोमध्ये बीटा-कॅरोटीन आणि लाइकोपीन आढळतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. तसेच त्वचा चमकदार आणि गुळगुळीत होण्यास मदत होते. याला अँटी-एजिंग सुपरफूड असेही म्हणतात.
हे वाचा -
रोजच्या या चुकीच्या सवयीमुळे अनेकांची सेक्शुअल लाइफ होतेय खराब; वेळीच Alert व्हा
ब्रोकोली -
ब्रोकोली शरीराला डिटॉक्सिफाय करते, ज्यामुळे मुरुम, बारीक रेषा आणि सुरकुत्या या समस्या कमी होतात. अशा प्रकारे या गोष्टींचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी आणि सुंदर बनू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.