मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /खाल्लेल्याचं नीट digestion होतंय की नाही? तुम्ही स्वत: या गोष्टींवरून ओळखू शकता

खाल्लेल्याचं नीट digestion होतंय की नाही? तुम्ही स्वत: या गोष्टींवरून ओळखू शकता

पचनासाठी चांगले - 
पोटाच्या समस्यांनी त्रस्त असाल तर भेंडी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, भेंडीमध्ये भरपूर फायबर असतात, जे पचनशक्ती मजबूत ठेवण्यास आणि पोट साफ करण्यास मदत करतात.

पचनासाठी चांगले - पोटाच्या समस्यांनी त्रस्त असाल तर भेंडी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, भेंडीमध्ये भरपूर फायबर असतात, जे पचनशक्ती मजबूत ठेवण्यास आणि पोट साफ करण्यास मदत करतात.

प्रथिने आणि कर्बोदकांसारख्या इतर पोषक घटकांप्रमाणेच चरबी देखील एक अतिशय महत्त्वाचा मॅक्रोन्यूट्रिएंट आहे, ज्याची शरीराला दररोजची कामे योग्यरित्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक असते.

नवी दिल्ली, 20 एप्रिल : कित्येक लोक वजन वाढण्याच्या भीतीनं आहारात चरबीयुक्त पदार्थ खाण्यास घाबरतात. साहजिकच, अनेकांना असं वाटतं की, चरबीचे पदार्थ जास्त खाल्ले गेल्याने लठ्ठपणासोबत हृदयविकाराचा धोका वाढेल. परंतु, प्रत्यक्षात तसं होत नाही. प्रथिने आणि कर्बोदकांसारख्या इतर पोषक घटकांप्रमाणेच चरबी देखील एक अतिशय महत्त्वाचा मॅक्रोन्यूट्रिएंट आहे, ज्याची शरीराला दररोजची कामे योग्यरित्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. हा एक प्रकारचा लिपिड प्रोटीन आहे, जो शरीराला ऊर्जा देतो, अवयवांचे संरक्षण करतो, पेशी वाढण्यास आणि नवीन निर्माण होण्यास (Whether the food you eat is digested properly or not) मदत करतो, शरीराची हीट राखतो.

आपण दिवसभर जे काही खात असतो त्यात फॅटचे प्रमाण थोडे तरी असतेच. फरक एवढाच की काही फॅट्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात, तर काही अनेक शारीरिक आजारांना कारणीभूत असतात. शरीरातील अंतर्गत अवयव निरोगी राहण्यासाठी, व्यवस्थित कार्य करण्यासाठी जेवढ्या निरोगी चरबीची आवश्यकता असते, तेवढ्याच प्रमाणात चरबी शरीरात पचण्यासाठी देखील आवश्यक असते (fat indigestion). बर्‍याचदा आपण चरबीयुक्त पदार्थ खात असतो, परंतु ते नीट पचत नाहीत, खाल्लेले नीट पचले आहे की, नाही ते काही लक्षणांवरून ओळखू शकतं, त्याविषयी जाणून घेऊया.

खाल्लेले पचन होतंय की नाही?

मल-शौच्यावरू असं ओळखा

TOI मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, तुम्ही मलावरून तुमच्या आरोग्याची स्थिती कशी आहे ते जाणून घेऊ शकता. टॉयलेट बाऊलमध्ये मल पडल्यानंतर पाण्यात वर तरंगत असेल तर याचा अर्थ शरीरातील चरबीचे पचन व्यवस्थित होत नाही. तुम्ही मलाच्या रंगाकडेही लक्ष दिलं पाहिजे, काहीवेळा मलाचा हलका रंग असतो आणि फ्लश केल्यानंतरही परत वर येतो. असे अधूनमधून होत असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही. पोटात चरबीचे नीट पचन होते, तेव्हा मलाचा रंग मध्यम ते गडद तपकिरी रंगाचा असतो आणि त्यातून उग्र वास येतो.

हे वाचा - Health Insurance मध्ये या 5 गोष्टींना कव्हर केलं जात नाही! अगोदरच माहीत असावं

छातीत जळजळ होऊ शकते -

जे लोक जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ खातात किंवा घाई-गडबडीत खातात त्यांना छातीत जळजळ होण्याची समस्या जाणवू शकते. पण, जेव्हा तुम्हाला निरोगी आणि पौष्टिक अन्न खाल्ल्यानंतरही छातीत जळजळ किंवा हार्टबर्नचा त्रास होतो, तेव्हा ते चरबी न पचण्याचे लक्षण असू शकते. असं वारंवार होत असल्यास, विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधा. छातीत जळजळ होण्याची समस्या कधीकधी हृदयविकार असू शकतो.

हे वाचा - त्वचेसाठी सूर्याची पहिली किरणं आहेत वरदान! फायदे कळल्यावर दररोज थांबाल उन्हात

बरगड्यांच्या खाली वेदना -

जेव्हा शरीराला चरबी पचवण्यासाठी आवश्यक एंझाइम तयार करण्यात अडचण येते राहते. तेव्हा एखाद्याला बरगड्यांच्या खाली वेदना जाणवू शकतात. असे गॅस तयार झाल्यावर आणि लो-ग्रेड इंफ्लेमेशनमुळे होतं. विशेषत: स्निग्ध पदार्थ खाल्ल्यानंतर वेदना साधारणतः 30 किंवा 40 मिनिटे जाणवतात.

(सूचना : य़ेथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Weak digestive system