जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / त्वचेसाठी सूर्याची पहिली किरणं आहेत वरदान! फायदे कळल्यावर दररोज थांबाल उन्हात

त्वचेसाठी सूर्याची पहिली किरणं आहेत वरदान! फायदे कळल्यावर दररोज थांबाल उन्हात

त्वचेसाठी सूर्याची पहिली किरणं आहेत वरदान! फायदे कळल्यावर दररोज थांबाल उन्हात

आपण शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता सूर्याच्या किरणांनी चांगल्या पद्धतीनं भरून काढू शकतो. व्हिटॅमिन डी त्वचेची अ‌ॅलर्जी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. इतकंच नाही तर स्किनला ग्लोइंग करण्यासाठीही खूप (first sun rays for skin) फायदेशीर ठरतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 एप्रिल : सकाळच्या पहिल्या सूर्य किरणांमध्ये (first sun rays) व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात आढळतं. आपल्या हाडांसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन डी जीवनसत्व (Vitamin D) शरीरात आपोआप तयार होत नाही आणि आहारातूनही पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही. वेबमेडच्या माहितीनुसार, आपण शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता सूर्याच्या किरणांनी चांगल्या पद्धतीनं भरून काढू शकतो. व्हिटॅमिन डी त्वचेची अ‌ॅलर्जी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. इतकंच नाही तर स्किनला ग्लोइंग करण्यासाठीही खूप (first sun rays for skin) फायदेशीर ठरतं. 1. त्वचा तजेलदार - धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेवर खूप वाईट परिणाम होतात. त्यामुळे त्वचा निस्तेज होऊन खराब होते. पण, तुम्ही सकाळी 10 मिनिटे पहिल्या सूर्यकिरणांमध्ये बसता तेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी तयार होतं आणि रक्ताभिसरण चांगलं राहतं. त्यामुळे त्वचेवर चमक दिसून येते. 2. पिंपल्स-मुरुमे - टीन एजमधून जात असताना हार्मोनल बदल होणं, ही एक कॉमन समस्या आहे. त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे आणि पिंपल्स येतात. अशा परिस्थितीत सकाळची पहिले सूर्यकिरणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. 3. एक्जिमा कमी होतो- एक्जिमा हा त्वचेशी संबंधित आजार आहे. आपण सकाळच्या पहिल्या उन्हात 30 मिनिटे बसून याचा त्रास कमी करू शकता. दररोज किमान अर्धातास कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घेणं अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते. हे वाचा -  कोणत्याही रंगाच्या साबणाचा फेस पांढराच का असतो? जाणून घ्या… 4. फ्रेश लूक - सूर्याची पहिली किरणं त्वचेवर पडतात, तेव्हा रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. ऑक्सिजनची पातळी वाढल्यामुळे त्वचा फ्रेश दिसते आणि सूजही कमी होते. एवढेच नाही तर स्किन ग्लोइंग देखील दिसते. हे वाचा -  दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी आहारात घ्या या 5 गोष्टी; आरोग्यासाठीही आहेत उत्तम (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: skin , skin care
  • First Published :
जाहिरात
जाहिरात