नवी दिल्ली, 20 एप्रिल : कोरोना महामारी (Corona Pandemic) सुरू झाल्यापासून लोक आरोग्याबाबत आणि भविष्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. आजकाल प्रत्येकाला आरोग्य विमा खरेदी करण्याची गरज समजू लागली आहे. परंतु, कोणताही आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. बहुतेक कंपन्या त्यांच्या विमा संरक्षणामध्ये काही आजारांचा समावेश करत नाहीत. जाणून घेऊया अशा (Health Insurance Claim) आजारांबद्दल. 1. दातांचे आजार - बहुतेक विमा कंपन्या आरोग्य विमा संरक्षणामध्ये दाताचे प्रॉब्लेम्स कव्हर करत नाहीत. याचे कारण म्हणजे दातांच्या समस्यांमुळे एखाद्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसते. पण, जर अपघात झाला असेल तर अशा परिस्थितीत दातांच्या समस्यांना विमा संरक्षण मिळू शकतं. 2. डोळे आणि कान संबंधित आजार - साधारणपणे, तुम्हाला कान आणि डोळ्यांचा त्रास असला तरीही आरोग्य विम्याचा दावा करता येत नाही. परंतु, अपघातामुळे तुमच्या डोळ्यात आणि कानात काही समस्या निर्माण झाल्यास, अशा परिस्थितीत तुम्ही विम्याचा दावा करू शकता. 3. अगोदरपासून असलेले आजार - जर एखादी व्यक्ती आधीच कोणत्या तरी आजाराने ग्रस्त असेल, तर अशा परिस्थितीत त्याला विमा दावा मिळत नाही. परंतु, अलिकडे बहुतांश विमा कंपन्या ठराविक प्रतीक्षा कालावधीनंतर आधीच्या आजारपणातही ग्राहकांना विमा संरक्षणाचा लाभ देतात. हे वाचा - कोणत्याही रंगाच्या साबणाचा फेस पांढराच का असतो? जाणून घ्या… 4. कॉस्मेटिक शस्त्रक्रिया आजकाल अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विमा कंपनी अशा शस्त्रक्रियेचा दावा ग्राहकांना देत नाही. इम्प्लांट, लिपोसक्शन इत्यादी कॉस्मेटिक शस्त्रक्रियांवर तुम्हाला कोणताही दावा मिळू शकत नाही. हे वाचा - दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी आहारात घ्या या 5 गोष्टी; आरोग्यासाठीही आहेत उत्तम 5. वंध्यत्व आणि गर्भपात बहुतेक विमा कंपन्या वंध्यत्व आणि गर्भपात यांसारख्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये महिलांना आरोग्य कवच देत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.