जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / High Cholesterol: कोलेस्ट्रॉल जास्त वाढतं तेव्हा पायावर अशी लक्षणं दिसतात; लगेच डॉक्टरांकडे जा

High Cholesterol: कोलेस्ट्रॉल जास्त वाढतं तेव्हा पायावर अशी लक्षणं दिसतात; लगेच डॉक्टरांकडे जा

1. पाय हलवणं - ज्योतिषशास्त्रानुसार, सतत पाय हलवण्याचा अर्थ असा होतो की, तुमचा चंद्र कमजोर आहे. पाय सतत हलत असतील, म्हणजे तुमच्या मनात सतत काहीतरी चालू आहे. जे लोक रिकाम्या वेळी किंवा बसून पाय हलवतात ते मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात आणि त्यांच्या या सवयींमुळे मानसिक तणाव निर्माण होतो.

1. पाय हलवणं - ज्योतिषशास्त्रानुसार, सतत पाय हलवण्याचा अर्थ असा होतो की, तुमचा चंद्र कमजोर आहे. पाय सतत हलत असतील, म्हणजे तुमच्या मनात सतत काहीतरी चालू आहे. जे लोक रिकाम्या वेळी किंवा बसून पाय हलवतात ते मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात आणि त्यांच्या या सवयींमुळे मानसिक तणाव निर्माण होतो.

अनेक लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल पातळीची लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणून याला सायलेंट किलर आजार असेही नाव देण्यात आले आहे. उच्च कोलेस्टेरॉलची पातळी रक्त तपासणीद्वारे शोधली जाते. पायांममध्ये दिसणाऱ्या लक्षणांविषयी जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 02 जून : शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढणे घातक आहे. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होण्याची शक्यता वाढते. तसेच, कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्ट अटॅक, स्ट्रोक होण्याचा धोकाही वाढू शकतो. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, चांगले आणि खराब कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात आणि ही लक्षणे आपल्या पायातही दिसू शकतात. अनेक लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल पातळीची लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणून याला सायलेंट किलर असेही नाव देण्यात आले आहे. उच्च कोलेस्टेरॉलची पातळी रक्त तपासणीद्वारे शोधली जाते. ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि शरीरात चरबीचे प्रमाण जास्त आहे, त्यांना कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते. आपल्या पायात दिसणारी काही लक्षणे देखील दर्शवतात की, आपलं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे. जाणून घेऊया (Symptoms of High Cholesterol in Legs) त्याविषयी. पाय थंड पडणे - TOI मध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, एखाद्याचे पाय आणि तळवे नेहमी थंड पडत असतील तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. काही लोकांचे तळवे उन्हाळ्यात किंवा प्रत्येक ऋतूमध्ये थंड राहतात, अशा लोकांनी डॉक्टरांशी जरूर संपर्क साधावा. उच्च कोलेस्टेरॉलची समस्या नसली तरी सर्दी इतर अनेक समस्यांमध्ये देखील असे होऊ शकते. डॉक्टरांकडून कोलेस्टेरॉलची पातळी तपासणे चांगले. पायांच्या त्वचेच्या रंगात बदल जेव्हा कोलेस्ट्रॉल जास्त असते तेव्हा शरीरातील रक्ताचा प्रवाहही कमी होतो. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. हे घडते कारण पोषक आणि ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे पेशींना योग्य पोषण मिळत नाही. पाय वर केले तर त्वचा फिकट दिसू शकते. टेबलवर पाय ठेवल्यानंतर त्वचेवर रंग जांभळा किंवा निळा दिसू शकतो. पाय दुखणे - काही दिवसांपासून सतत पाय दुखत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन समृद्ध रक्त शरीराच्या खालच्या भागात पोहोचू शकत नाही. यामुळे पायांमध्ये जडपणा आणि थकवा जाणवू शकतो. काही लोक उच्च कोलेस्ट्रॉलमुळे पायात दाह होत असल्याची तक्रार देखील करतात. कधीकधी ही वेदना नितंब, मांड्यांपासून तळापर्यंत पायांमध्ये होते. वेदना दोन्ही किंवा अगदी एका पायात असू शकते. चालताना, धावताना किंवा पायऱ्या चढताना ही समस्या अधिक जाणवते. वेदना विश्रांती घेतल्यानंतर निघून जाऊ शकते आणि हालचाली वाढल्यानंतर पुन्हा सुरू होऊ शकते, म्हणून डॉक्टरांना भेटणे चांगले. हे वाचा -  विवाहित पुरुषांनी यासाठी मनुके खायला हवेत; आरोग्याला असा होतो फायदा रात्रीच्या वेळी पायात पेटके येणे - रात्री झोपताना वारंवार पाय दुखत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे उच्च कोलेस्ट्रॉलमुळे देखील असू शकते. यामध्ये खालच्या अंगांच्या रक्तवाहिन्यांना नुकसान होते. ही समस्या रात्री अधिक तीव्र होते, त्यामुळे झोप येत नाही. तळवे, घोटे, बोटे, पाय यांच्या स्नायूंमध्ये पेटके येऊ शकतात. पाय अंथरुणावर लटकत ठेवल्यास किंवा बसून राहिल्यास क्रॅम्पपासून आराम मिळतो. कारण, गुरुत्वाकर्षण पायांना रक्त प्रवाहात मदत करतं. हे वाचा -  Type 2 Diabetes असेल तर या 4 प्रकारची हिरवी पानं चावून खा; दिसेल चांगला परिणाम तळवे किंवा पायाच्या जखमा भरत नाहीत - तळवे आणि पायात काही जखमा असतील, ज्या बऱ्या होत नसतील तर ते उच्च कोलेस्ट्रॉलमुळे देखील असू शकते. कधीकधी अशा समस्या रक्त परिसंचरण खराब झाल्यामुळे उद्भवतात. ज्या जखमा खूप हळूहळू बऱ्या होतात किंवा अनेक दिवस बऱ्या होत नाहीत, तर याचा अर्थ असा होतो की कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असल्याने पायांमध्ये रक्तप्रवाह नीट होत नाही. याबाबत डॉक्टरांना भेटणे चांगले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात