Home /News /lifestyle /

अचानक आगीची घटना घडल्यास नेमकं काय करावं आणि वेळेवर मदत कशी मागवता येईल, वाचा संपूर्ण माहिती

अचानक आगीची घटना घडल्यास नेमकं काय करावं आणि वेळेवर मदत कशी मागवता येईल, वाचा संपूर्ण माहिती

आगीची घटना घडल्यास नेमकं काय करावं आणि वेळेवर मदत कशी मागवता येईल, याबाबत आपल्यापैकी बरेच जणांना माहिती नसते.

नवी दिल्ली, 24 जानेवारी: आजकालच्या काळात आपल्या आसपास कधी आणि कोणती आणीबाणीच्या घटना घडेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपल्याला अशावेळी नेमका कोणत्या क्रमांकांवर संपर्क साधायचा किंवा त्या काळात लगेच मदत कशी मिळेल, याबाबत माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. गेल्या काही महिन्यात आग लागल्यामुळे झालेल्या घटनांच्या (Fire Incident) बातम्या आपण पाहिल्या असतीलच. मग ती उंच इमारतीत लागलेली आग असो वा एखाद्या कारखान्यात लागलेली आग असो. मग अशावेळी नेमकं काय करता येईल, याबाबतच वृत टीव्ही 9 दिलं आहे. आगीची घटना घडल्यास नेमकं काय करावं आणि वेळेवर मदत कशी मागवता येईल, याबाबत आपल्यापैकी बरेच जणांना माहिती नसते. पण जर अग्निशमन विभागाला वेळेत माहिती मिळाल्यास त्यांची गाडी घटनास्थळी वेळेवर पोहचू शकेल. ज्यामुळे जीवितहानी टाळता येईल किंवा आगीमुळे होणारं नुकसान कमी होईल. अशा घटनेच्यावेळी पोलिसांची मदत घ्यायची असल्यास 100 या क्रमांकावर तर अग्निशमन दलासाठी 101 या क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक असते. ज्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दल वेळेवर घटनास्थळी पोहचू शकतील. आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीसाठी ‘हा’ क्रमांक आहे महत्त्वाचा 100 आणि 101 या क्रमांकाशिवाय अजून एक महत्त्वाचा क्रमांक म्हणजे 112 होय. या क्रमांकाबाबतची माहिती तुम्हाला सरकारी संकेळस्थळावर मिळू शकेल. 112 या क्रमांकावर संपर्क केल्यास तुम्हाला एकाच वेळी फायर ब्रिगेड, मेडिकल आणि पोलिसांची मदत मिळू शकेल. कारण तुम्ही या क्रमांकावर कॉल केल्यावर तुमचा संदेश हा योग्य त्या विभागाला पोचवण्यात येतो. केंद्र सरकारतर्फे देशभरातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतील आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एक देश एक आणीबाणी नंबर (One nation One Emergency Number) म्हणून 112 हा नंबर लाँच केला आहे. देशभरात कुठूनही या क्रमांकावर संपर्क साधल्यावर त्या राज्यातील स्थानिक भाषा, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तुम्हाला मदत मागता येईल. या क्रमांकावर तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लँडलाईनवरून संपर्क करू शकता. हा टोल फ्री क्रमांक अगदी मोफत आहे.

Apple Benefits: रोज या वेळी खायला सुरू करा 1 सफरचंद; कित्येक आजार राहतील दूर, मिळतील 10 जबरदस्त फायदे

 112 हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आधीपासूनच असल्याचं आढळून येईल. कारण संपूर्ण जगात खासकरून अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय देशांमध्ये 112 हा क्रमांक आणीबाणीच्या सेवेसाठी वापरला जातो. ज्यामध्ये सिंगल की प्रेस (Single Key Press) म्हणून हा क्रमांक डायल केला जातो. म्हणजे तीन वेगळी बटणं दाबावी लागत नाहीत. त्यामुळे आपल्या देशात 100 आणि 101 हे क्रमांक असूनही 112 हा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. हा क्रमांक ट्राय (TRAI) तर्फे 2015 साली इमर्जन्सी कॉल (Emergency Call) म्हणून अधिकृत करण्यात आला. हा क्रमांक वापरण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये 3 वेळा पॉवर बटन दाबून तो आधी सक्रिय करावा लागेल. याशिवाय कोणत्याही फिचर फोनमध्ये सतत 5 किंवा 9 या अंकावर प्रेस केल्यास पॅनिक बटण म्हणून 112 हा क्रमांक सक्रिय होईल. प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये हे पॅनिक बटन भारतीय सरकारद्वारे प्रकाशित केलेल्या राजपत्रानुसार 1 जानेवारी 2017 पासून कार्यरत झालं आहे.

Ayurvedic Plant: डॉक्टरांकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही; या हिवाळ्यात घरी लावाच ही 6 आयुर्वेदिक रोपं

मग तुम्हीही आजच आपल्या स्मार्टफोनमध्ये हा क्रमांक सक्रिय करून घ्या. तसेच सरकारी संकेतस्थळावर जाऊन याबाबतची माहितीही नीट जाणून घ्या. ज्यामुळे तुम्हाला आणीबाणीच्या परिस्थितीत नक्कीच उपयोग होईल.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Fire, Fire station

पुढील बातम्या