Home /News /lifestyle /

Apple Benefits: रोज या वेळी खायला सुरू करा 1 सफरचंद; कित्येक आजार राहतील दूर, मिळतील 10 जबरदस्त फायदे

Apple Benefits: रोज या वेळी खायला सुरू करा 1 सफरचंद; कित्येक आजार राहतील दूर, मिळतील 10 जबरदस्त फायदे

लाल सफरचंद

आरोग्यासाठी रोज एक सफरचंद खाण्याचे फायदे आपल्याला माहीत असतीलच. त्याचबरोबर लाल सफरचंदात आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्ससोबतच फायबरही मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि हृदय-विकारांमध्ये खूप फायदा होतो. यासोबतच आपली पचनसंस्थाही निरोगी राहते. शुगर आणि हायपरटेन्शन या मधुमेहाच्या रुग्णांसाठीही लाल सफरचंद खूप फायदेशीर ठरते.

लाल सफरचंद आरोग्यासाठी रोज एक सफरचंद खाण्याचे फायदे आपल्याला माहीत असतीलच. त्याचबरोबर लाल सफरचंदात आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्ससोबतच फायबरही मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि हृदय-विकारांमध्ये खूप फायदा होतो. यासोबतच आपली पचनसंस्थाही निरोगी राहते. शुगर आणि हायपरटेन्शन या मधुमेहाच्या रुग्णांसाठीही लाल सफरचंद खूप फायदेशीर ठरते.

सफरचंद हे जगभरात सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ आहे. त्याच्या उत्कृष्ट गुणधर्मांमुळं काही तज्ज्ञ याला जादूई फळदेखील म्हणतात. त्यात पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि रोगांशी लढणारे घटक असतात.

    नवी दिल्ली, 24 जानेवारी : सफरचंद (apples) हे असं फळ आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे केवळ भारतातच नव्हे तर, जगभरात सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ आहे. त्याच्या उत्कृष्ट गुणधर्मांमुळं काही तज्ज्ञ याला जादूचं फळदेखील म्हणतात. त्यात पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि रोगांशी लढणारे घटक असतात. जाणून घ्या सफरचंदाचे जबरदस्त (The benefits of eating apples) फायदे. सफरचंद खाण्याचे फायदे आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, सफरचंदातही असे काही घटक आढळतात, जे शरीरात नवीन पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात. मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. तसंच, ते तुमच्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करू शकतं. सफरचंद खाण्याचे 10 आश्चर्यकारक फायदे सफरचंदाचे नियमित सेवन केल्यानं कर्करोगाचा धोका कमी होतो. सफरचंदाच्या नियमित सेवनानं टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो. सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. मूतखड्याची समस्या टाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी सफरचंदाचं सेवन करू शकता. हे वाचा - Ration Card: रेशन कार्ड नसेल तरीही मोफत मिळेल अन्नधान्य, इथे वाचा सर्व प्रक्रिया सफरचंदाच्या सेवनानं वृद्धत्वामुळं मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते. सफरचंदातील फायबर तुमचे दात मजबूत ठेवण्यास मदत करतं. सफरचंद सेवन हृदयासाठी खूप चांगलं आहे. त्यामुळं बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. सफरचंदाचा नियमित वापर वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. सफरचंदाचा रस रोज सकाळी सेवन केल्यानं चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी होतात. हे वाचा - तुमचं मूलही खाताना चिडचिड करतंय का? हा Corona effect; संशोधकांनी केलं Alert सफरचंद खाण्याची उत्तम वेळ आपण सफरचंद कधीही खाऊ शकतो. मात्र, सकाळी सफरचंदाचं खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो. याचं कारण म्हणजे सफरचंदात फायबर आणि पेक्टिन मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळं रात्रीच्या वेळी याचं सेवन केल्यास ते पचण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळं सकाळची वेळ याचं सेवन करण्यासाठी सर्वोत्तम वेळ असू शकते. (येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या