दातांच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी लॅव्हेंडर खूप प्रभावी आहे. हे त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे अरोमाथेरपीमध्ये देखील वापरले जाते.
कॅमोमाइल एक औषधी वनस्पती आहे, ज्यामध्ये स्ट्रेसविरोधी गुणधर्म चांगले आहेत. औषध म्हणून ही वनस्पती सुरक्षित आणि उपयोगी देखील आहे. टी फ्लेवर म्हणूनही ही वनस्पती प्रसिद्ध आहे.
जवसमध्ये (Flaxseed) रक्तदाब आणि लठ्ठपणा कमी करण्याची क्षमता असते. तुम्ही ते सॅलड ड्रेसिंग म्हणून खाऊ शकता. जवसाच्या बियांमध्ये स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनच्या उत्पादनावर परिणाम करतात. जवसाच्या बिया भाजून किंवा शिजवून खाव्यात.
टी ट्री (Tea Tree) ऑयल चेहऱ्यावरील पिंपल्सला कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजंतूंची वाढ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, म्हणून ते मुख्यतः आवश्यक तेल म्हणून वापरले जाते.
हळदीमध्ये (Turmeric) कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत आणि ते डीएनए उत्परिवर्तन (म्युटेशन) रोखू शकतात. याव्यतिरिक्त, त्यात अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. सांधेदुखी बरा करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
पवित्र तुळशीची (Holy Basil) वनस्पती वातावरण शुद्ध राखण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मिनरल्स, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आपल्या आरोग्यासाठी विविधदृष्ट्या याचा फायदा होतो. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)