Corona Vaccination : कोरोना लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय करावं आणि काय नाही?

Corona Vaccination : कोरोना लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय करावं आणि काय नाही?

Corona vaccination : कोरोना लशीचा (Corona Vaccine) शरीराला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

  • Share this:

मुंबई, 03 मे : देशात 1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं कोरोना लसीकरण (Corona Vaccination) सुरू झालं आहे. तरी कोरोना लसीकरण आणि कोरोना लशीबाबत (Corona Vaccine) नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहे. त्यापैकीत महत्त्वाचे प्रश्न म्हणजे कोरोना लस घेण्याआधी (What to do before corona vaccination) आणि घेतल्यानंतर काय करावं (What to do after corona vacccination) आणि काय नाही?

कोरोना लशीचा शरीराला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. काही गोष्टी या आवर्जून करायला हव्यात, तर काही टाळायला हव्यात. आता काय करावं आणि काय टाळावं ते आपण पाहूयात.

मद्यपान करणं टाळा

काही लोकांमध्ये लशीचे दुष्परिणाम कमी दिसतात आणि काही लोकांमध्ये ते गंभीर देखील असू शकतात. ताप, डोकेदुखी, थकवा, स्नायू दुखणे आणि उलट्या हे लशींचे सामान्य दुष्परिणाम आहेत. मद्यपान (Alcohol Drinking) करत असाल तर लस घेण्यापूर्वी काही दिवस मद्यपानापासून दूर रहा. लसीकरण झाल्यानंतर काही दिवसानंतर मद्यपान करू नका. अगदी कमी प्रमाणात मद्यपान केल्यानंतरही शरीरात डिहायड्रेशन (Dehydration) होऊ शकतं, ज्यामुळे काही न दुष्परिणाम होऊ शकतात.

हे वाचा - 18 Corona vaccination : खासगी रुग्णालयात तुमच्यासाठी कोरोना लशीची किंमत किती?

अल्कोहोल रोगप्रतिकारक शक्तीवर (Immunity) दबाव आणतो. अल्कोहोल रिसर्च (Alcohol Researchया जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, जास्त प्रमाणात अल्कोहोल घेण्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मद्यपान केल्याने लवकर आणि जास्त झोप येते. मद्यपानानंतरच्या गाढ झोपेने प्रतिकार शक्तीवर देखील परीणाम  होतो.

जेवण आणि झोपेची काळजी

लस घेण्याच्या एक दिवसआधीच शरीराला संपूर्ण विश्रांती (Body Rest) द्या. त्यामुळे आपली  रोगप्रतिकारक शक्ती (Immunity systemचांगली होते. क्लिनिकल स्लीप मेडिसीन (Clinical Sleep Medicine) या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार लस घेण्यापूर्वी एक दिवस आधी रात्री चांगली झोप घ्या आणि रात्रीचं जेवणही चांगलं असू द्या.

फायबरचं प्रमाण चांगलं असेलेला आहार

फायबरचं जास्त प्रमाण असलेले पदार्थ खाल्ल्यास चांगली झोप येते. लसीकरणापूर्वी आदल्या रात्रीपासून आणि कोशिंबीर यांच्या सेवनाचा प्रयत्न करा. ब्रोकोली, बीन्स किंवा फ्राय भाज्या खाणं अधिक फायदेशीर ठरेल. रात्रीचं जेवण लवकर झालं असेल आणि झोपण्यापूर्वी भूक लागली असेल तर त्यादरम्यान ताजी फळं किंवा काजू खा. मात्र झोपण्यापूर्वी खालेलं अन्न पूर्णपणे पचलं असायला हवं. काहीही खाल्ल्यानंतर लगेच झोपू नये. जेवण आणि झोपेत कमीतकमी तीन तासांचं अंतर ठेवा. झोपेच्या 6 तास आधी कॉफी पिणं टाळा. झोपेच्या आधी लिक्वीड घेऊ नका जेणेकरून आपण मध्यरात्री पुन्हा पुन्हा बाथरूममध्ये जावं लागल्याने झोपमोड होईल.

हायड्रेटेड रहा

लस घेण्यापूर्वी आणि नंतर शरीर हायड्रेटेड (Hydrated) असणं महत्त्वाचं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनच्या मते, महिलांना दररोज 2.7 लीटर (11 कपांपेक्षा जास्त) लिक्वीडची आवश्यकता असते आणि पुरुषांना 3.7 लीटर (15 कपांपेक्षा जास्त) लिक्वीडची आवश्यक असते. लस घेण्यापूर्वी शरीर हायड्रेट असायला हवं. व्हॅक्सिनेशननंतर झोप येत असली तरी पाणी प्यायला विसरू नका. ठराविक वेळेचा अलार्म लावा. त्या त्या वेळी पाणी प्या. साधं पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर लिंबू पाणी, काकडी आणि फळांचंही सेवन करू शकता.

तांदळाचं सेवन

ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार कोविड -19 च्या प्रतिबंधासाठी चांगल्या खाण्याच्या सवयी आवश्यक आहेत. न्यूट्रिशन आणि अँटी इन्फ्लामेट्री गुणधर्म असलेले तांदूळ खाल्याने इम्युनिटी सिस्टम मजबूत होते. व्हॅक्सिनेशननंतर आहारात त्याचा समावेश करा.

हे वाचा - होम आयसोलेशननंतर कोरोना टेस्ट करण्याची गरज नसते? AIIMS चे प्रमुख म्हणाले...

लस घेतल्यानंतर बर्‍याच लोकांना अशक्तपणा वाटतो. ताण किंवा अगदी वेदनांमुळे देखील अशक्तपणा जाणवू शकतो. अशक्तपणापासून वाचण्यासाठी, लस घेण्यापूर्वी पाणी प्या, लिक्वीड डाएट घ्या आणि पोट भर जेवण  करा. यामुळे लसीकरणानंतर ताण जाणवणार नाही. रक्तातील साखर कमी झाल्यामुळे काहीजणांना चक्कर येते. यासाठी लस घेण्यापूर्वी प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट असलेला आहार घ्या.

लसीकरणाआधी घ्या काळजी

जर सकाळीच लसीकरणासाठी अपॉयमेन्ट मिळाली असेल तर ओटस्, फळं आणि नट्स खा. अॅवोकॅडो किंवा ऑम्लेटही खाऊ शकता. दुपारी लसीकरण असेल तर भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या, डाळ आणि कोशिंबीर खा. लसीकरणाआधी जेवण जात नसेल तर, स्मुदी, दही, केळं आणि बेरीजही खाऊ शकता किंवा हिरव्या भाज्या आणि फळांचा रसही पिऊ शकता.

लसीकरणानंतर काय खावे आणि काय खाऊ नये ?

काही लोकांना लसीकरणानंतर मळमळ किंवा उलटीचा त्रास होतो. हे टाळण्यासाठी लस घेतल्यानंतर पचण्यास सोपे पदार्थ खावेत. सूप किंवा नारळ पाणी पिऊ शकता, केळी, टरबूज, ब्राऊन राईस किंवा बटाटे खावेत. लसीकरणानंतर भूक लागत नसेल तर थोड्याथोड्या वेळाने काहीतरी खाणं चालू ठेवा. लस घेतल्यानंतर तळलेले पदार्थ, नॉनवेज, गोड पदार्थ आणि भाजलेले पदार्थ खाणे टाळा.

हे वाचा - Corona Vaccination नंतर दिसली ही लक्षणं तर घाबरू नका, जाणून घ्या त्यामागची कारणं

लशीचे दुष्परिणाम काही दिवसातच कमी होतात, ण चांगल्या जेवणाच्या सवयींनी तुम्ही निरोगी राहू शकता. चांगलं जेवण आणि भरपूर पाणी पिणे हे आरोग्यासाठी नेहमीच फायद्याचं आहे.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 9:02 AM IST

ताज्या बातम्या