मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona Vaccination नंतर दिसली ही लक्षणं तर घाबरू नका, जाणून घ्या त्यामागची कारणं

Corona Vaccination नंतर दिसली ही लक्षणं तर घाबरू नका, जाणून घ्या त्यामागची कारणं

Covid 19 Vaccine Side Effects: कोरोना काळात त्यावरील लस (Vaccine) हाच एक प्रभावी उपाय आहे. काही संभावीत साईडइफेक्टचा विचार करून काहींना लसीबद्दल भीती वाटत आहे. जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली, ०1 मे: दररोज कोरोनाची (Corona)  रुग्णसंख्या वाढत आहे. दिवसाला 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. सध्या व्हॅक्सीन (Vaccine)  हाच कोरोनावरचा परिणामकारक उपाय आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. लसीकरणानंतर काही लक्षण (Symptoms)  दिसायला लागतात. काहींना व्हॅक्सीन घेतल्यानंतर चक्कर येणे, थोडा ताप येणे असा त्रास होतो. तर, काहींना बूस्टर डोस घेतल्यानंतरही काही लक्षणं दिसायला लागतात. पण कोरोनावर व्हॅक्सीन घेतल्यानंतर लक्षणं दिसत असतील तर थेट डॉक्टरांशी संपर्क करा.

साइड इफेक्टस धोकादायक आहेत का?

लसीकरणानंतर काही साईड इफेक्ट दिसत असतील तरी घाबरू नका. कारण शरीरावर व्हॅक्सीन परिणाम करत असताना शरीरात अशी लक्षणं दिसायला लागतात. याचा अर्थ असा आहे की व्हॅक्सीन तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि तुमची इम्युनिटी वाढायला लागली आहे. ही चांगली लक्षणं आहेत.

(हे वाचा- अमरावती पॅटर्न ठरतोय हिट! डब्ब्यात चिट्ठी टाकून घरी जा, असं होईल Vaccination)

साईड इफेक्ट नसल्यासही कोणतीही हानी नाही

व्हॅक्सीनेशन नंतर काहींना साईड इफेक्ट जाणवतात काही जाणवत नाहीत. साईड इफेक्ट जाणवत नसल्यास तुम्ही घेतलेली लस चांगल्या प्रकारे काम करत नाही असा अर्थ होत नाही. निरिक्षणानुसार लक्षणं दिसत नसलेल्यांच्या शरीरातही व्हॅक्सीनचा चांगला परिणाम झाला आहे. 90 टक्के लोकांमध्ये लक्षण नसली तरी व्हॅक्सीनचा परिणाम झालेला दिसतो.

(हे वाचा- अजबच! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृती स्थिर असल्याचा दावा)

लोकांमध्ये वेगवेगळे परिणाम कशामुळे?

लसीकरणानंतर शरीराच्या ताकदीनुसार, रोग प्रतिकाशक्ती नुसार लोकांमध्ये लक्षणं दिसतात. वय, जेंडर, वातावरण, न्युट्रीशन, जेनेटिक्स आणि अँटी इम्फ्लामेंट्री मेडिसीन याच्यानुसार परिणाम दिसतात. व्हॅक्सीनेशन नंतर वेगवेगळी लक्षणं किंवा परिणाम दिसतात. फ्लू व्हॅक्सीन नंतरही वेगवेगळ्या प्रतिक्रियांची नोंद झालेली आहे.

लक्षण दिसल्यानंतर हे करा

लस घेतल्यानंतर ताप आला, थकवा वाटत असेल तर भरपूर प्रमाणात लिक्विड प्या आणि विश्रांती घ्या. लस लावल्यानंतर हातावर सूज आल्यास बर्फ लावा.

(हे वाचा- औकात विचारत नर्सनं डॉक्टरांच्या कानशिलात लगावली; घटनेचा VIDEO व्हायरल)

व्हॅक्सीनेशन नंतर साइड इफेक्टस

लहान मुलांना लसं दिल्यानंतर डॉक्टर त्यांना पॅरासिटामोल देण्याचा सल्ला देतात. कारण लस घेतल्यानंतर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. इन्‍फ्लूएंजा,एमएमआर,टीडी/डीटीएपी या व्हॅक्सीन घेतल्यानंतर साईड इफेक्टची लक्षणं दिसत असतील तर, व्हॅक्सीनचा परिणाम शरीरावर होत आहे असं समजावं.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona patient, Corona updates, Corona vaccine, Coronavirus, Health Tips