Home /News /coronavirus-latest-news /

होम आयसोलेशननंतर कोरोना टेस्ट करण्याची गरज नसते? AIIMS चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले...

होम आयसोलेशननंतर कोरोना टेस्ट करण्याची गरज नसते? AIIMS चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले...

अनेकदा होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांना कोरोनाच्या टेस्टसंदर्भात भीती असते. याबाबत AIIMS चे प्रमुखांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

    नवी दिल्ली, 1 मे : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान एम्स (AIIMS) चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी शुक्रवारी सांगितलं की, अधिकतर सौम्य आणि लक्षणं नसलेल्या कोविड-19 प्रकरणात व्हायरस 7 व्या किंवा 8 व्या दिवशी मरून जातो. त्यावेळी ती व्यक्ती दुसऱ्या कोणालाही संसर्ग पोहोचवू शकत नाही. मात्र जी व्यक्ती कोरोना मुक्त झाली आहे, तिचे पार्टिकल्स आरटी-पीसीआर टेस्टमध्ये दिसून शकतात आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे की, सौम्य लक्षणं असतील तर व्हायरस 6 किंवा 7 दिवसांनंतर मरून जातो. होम आइसोलेशनअँतर्गत कोरोनाच्या उपचाराच्या माध्यमातून नव्या गाइडलाइन्सनुसार, कोविड रुग्णांनी 10 दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये राहावे. ही वेळ संपल्यानंतर आयसोलेशन संपू शकतो. मात्र यामध्येही तीन दिवसांपूर्वी ताप आलेला नाही ना, हे तपासणं गरजेचं आहे. ते म्हणाले की, रेमेडेसिविरचेदेखील दुष्परिणाम असून त्यांमुळे हे औषध रुग्णालयातचं घेणं गरजेचं आहे. हे औषध होम आयसोलेशनदरम्यान घेण्याचा सल्ला दिला जातो. रेमेडेसिविर सौम्य आणि लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी अजिबात नाही. याचा फायदा तर होणार नाही, मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे. जर ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यामुळे वेळेत उपचार सुरू करता येऊ शकतात. हे ही वाचा-या' गोळ्या ऑक्सिजन लेवल वाढतात; व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये किती तथ्य? होम आयसोलेशनदरम्यान घ्या काळजी रणदीप गुलेरियांनी सांगितलं की, जर तुम्ही होम आयसोलेशनमध्ये असाल तर अशी कोणती लक्षणं आहेत, ज्यात तुम्हाला तातडीने मेडिकल सपोर्टची गरज पडू शकते. जर तुम्ही मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नसाल तर ऑक्सिजनची पातळी तपासून पाहायला हवी. अनेकदा रुग्ण घाबरल्यामुळे श्वास गुदमरत असल्याचं वाटतं राहतं. जर त्या वेळी ऑक्सिजनची पातळी 97-98 असेल तर ठीक, अन्यथा वैद्यकीय सल्ला घ्यावा. किमान 10 दिवसांचं होम आयसोलेशन ते म्हणाले की, ‘होम आइसोलेशन कधी संपवायलं हवं हेदेखील समजून घ्यायला हवं. यासाठी दिलेल्या गाइडलाइन्सनुसार कमीत कमी 10 दिवस होम आयसोलेशन आवश्यक आहे. जर काही लक्षणं असतील तर अधिक काळजी घ्यावी. त्यावेळी कमीत कमी शेवटचे तीन दिवस असे हवेत ज्यात तुम्हाला ताप किंवा दुसरं लक्षणं दिसत नसेल. त्यानंतर तुम्ही चाचणी करू शकता आणि घराबाहेर जाऊ शकता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona spread, Covid-19 positive, Home quarantine

    पुढील बातम्या